भारतीय हवामान विभाग, मुबई यांचेकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार, मराठवाडा विभागामध्ये पुढील आठवडयात आकाश पुर्णतः ढगाळ राहून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाउस पडण्याची शक्यता आहे. कमाल
तापमान २९.० ते ३१.० अंश सेल्सीअस राहील
तर किमान तापमान २१.० ते २३.० अंश सेल्सीअस राहील. वारा ताशी ११.० ते १८.० कि.मी.
प्रति तास वेगाने वाहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७९.० ते ९१.० टक्के तर दुपारची
सापेक्ष आर्द्रता ५२.० ते ८८.० टक्के राहील.
विशेष सुचना : या आठवडयात आकाश ढगाळ राहून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाउस पडण्याची शक्यता आहे.
कृषी सल्ला
- खरीप ज्वारीचे पिकातील पावसाचे अतिरीक्त पाणी पीका बाहेर काढून देण्यात
यावे. वापसा आल्यानंतर पिकात कोळपणी करून तणाचे नियंत्रण करावे. एक महिना झालेल्या
खरीप ज्वारी पिकास ४० किलो नत्र हेक्टरी कोळपणीद्वारे देण्यात यावे.
- तण नियंत्रणासाठी
सोयाबीनचे पिक २१ दिवसाचे झाले असल्यास ईमॅझिथॅफर या तणनाशकाची ०.६ किलो
क्रियाशिल घटक प्रति हेक्टर या प्रमाणात फवारणी करावी. पाने खाणा-या
आळयाच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस २५ टक्के २० मिली किंवा क्लोरोपायरीफॉस २०
टक्के प्रवाही २० मिली किंवा इमामेक्टिन बेन्झोएट ५एस.जी. ३.५ ग्रॅम प्रति १०
लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.
- उसाचे पिकातील पावसाचे अतिरीक्त पाणी पीका बाहेर काढून देण्यात यावे.
- कापसाचे पिकातील पावसाचे अतिरीक्त पाणी पीका बाहेर काढून द्यावे. बागायती
कापूस पिकास उर्वरित दूसरी नत्र खताची मात्रा ६० किलो देण्यात यावी. रसशोषण
करणा-या किडींच्या नियंणासाठी अॅसिफेट ७५ टक्के, २० ग्रॅम किंवा डायमिथोएट ३० टक्के, १० मिली प्रति १०
लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.
- पावसाचे अतिरीक्त पाणी बागेबाहेर काढून देण्यासाठी निच-याची व्यवस्था
करावी.
- झेंडू, जिलार्डीया, काकडा, मोगरा, गुलाब इत्यादी फुल पिकाची लागवड करावी. गुलाबाच्या ग्लॅडीयटर, सुपरस्टार, फ्रेंडशीप, पीस, मोगरा सिंगल व डब्ल मोगरा, मदनवान तर काकडयाच्या
मुदखेड लोकल या वाणांची निवड करावी.
- जनावरांना घटसर्प व फ-या रोगांचे लसिकरण करून घ्यावे.
जनावरांना हिरव्या चा-या सोबत वाळलेला चारा खावू घालावा.
केंद्र प्रमुख
एकात्मिक कृषि हवामान सल्ला सेवा योजना
पञक क्रमांकः २७
दिनांकः १६.०७.२०१३