Pages

Thursday, August 22, 2013

गाजर गवत निर्मुलन सप्‍ताहाची सांगता



मॅक्सिकन भुंगे गाजर गवतावर नागपुर येथील महाराष्‍ट्र पशु व मत्‍स्‍य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु मा डॉ. ए. के. मिश्रा व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. के. पी. गोरे यांच्‍या हस्‍ते सोडण्‍यात आले त्याप्रसंगी  शिक्षण संचालक डॉ. विश्‍वास शिंदे, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. एन. डी. पवार, डॉ. मदन पेंडके, डॉ. बि. व्‍ही. आसेवार, डॉ. अशोक जाधव, डॉ. महेश देशमुख, प्रा. अनिस कांबळे, प्रा. व्हि. बी. जाधव आदी  

गाजर गवत निर्मुलन बाबतच्‍या माहिती पत्रकाचे विमोचन करतांना महाराष्‍ट्र पशु व मत्‍स्‍य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु मा डॉ. ए. के. मिश्रा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. के. पी. गोरे,  शिक्षण संचालक डॉ. विश्‍वास शिंदे, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. एन. डी. पवार, डॉ. मदन पेंडके, डॉ. बि. व्‍ही. आसेवार, डॉ. अशोक जाधव, डॉ. महेश देशमुख, प्रा. अनिस कांबळे, प्रा. व्हि. बी. जाधव आदी  
  वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत असलेल्‍या तण व्‍यवस्‍थापन केंद्र व कृषि महाविद्यालयाच्‍या राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या संयुक्‍त विद्यामाने गाजर गवत निर्मुलन सप्‍ताह दि. 16 ते 22 ऑगस्‍ट दरम्‍यान पाळण्‍यात आला. या सप्‍ताहाची सांगता दि.22.08.2013 रोजी करण्‍यात आली. यावेळी नागपुर येथील महाराष्‍ट्र पशु व मत्‍स्‍य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु  मा डॉ. ए. के. मिश्रा व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. के. पी. गोरे यांच्‍या हस्‍ते गाजर गवत खाणारा मॅक्सिकन भुंगे विद्यापीठातील प्रशासकीय इमारतीच्‍या परिसरातील गाजर गवतावर सोडण्‍यात आले.
  या प्रसंगी माफसुचे मा. कुलगुरू डॉ. ए. के. मिश्रा म्‍हणाले की, गाजर गवतामुळे शेतपिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान होते तसेच हे मनुष्‍यांना व जनावरांच्‍या आरोग्‍याला हानीकारक आहे. याच्‍या निर्मुलनासाठी सामुदायीक उपाय योजना करणे आवश्‍यक आहे. राष्‍ट्रीय सेवा योजनेअंतर्गत गाजर गवत निर्मुलन सप्‍ताहात विविध जनजागृतीचे उपक्रम राबवीण्‍यात आले हा विद्यापीठाचा निश्चितच चांगला उपक्रम आहे.
  मा. कुलगुरु डॉ. के. पी. गोरे म्‍हणाले की, राष्‍ट्रीय सेवा योजनेअंतर्गत राबविण्‍यात येणारे विविध कार्यक्रमामुळे विद्यार्थ्‍यामध्‍ये समाजाप्रती असलेली बांधीलकी याची जाणीव होते. गाजर गवतामुळे देशाचे व शेतक-याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या गवताच्‍या निर्मुलनाकरीता फक्‍त सप्‍ताहामध्‍ये जणजागृती न करता यासाठी वर्षभर कार्य करावे असा सल्ला त्‍यांनी दिला.
  याप्रसंगी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते  गाजर गवत निर्मुलन बाबतच्‍या माहिती पत्रकाचे विमोचन करण्‍यात आले. कार्यक्रमास शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ. विश्‍वास शिंदे, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. एन. डी. पवार, कोरडवाहू संशोधन केंद्राचे शास्‍त्रज्ञ डॉ. मदन पेंडके, डॉ. बि. व्‍ही. आसेवार, डॉ. अशोक जाधव, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ. महेश देशमुख हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी राष्‍ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अनिस कांबळे व प्रा. व्हि. बी. जाधव यांच्‍या नेतृत्‍वाखाली स्‍वयंसेवक व स्‍वयंसेविका यांनी परिश्रम घेतले.