Pages

Saturday, September 14, 2013

पत्रकार परिषद संपन्न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने मराठवाडा मुक्‍तीदिनी दिनांक 17-09-2013 रोजी रबी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले असून त्‍यानिमित्‍य विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. किशनरावजी गोरे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली पत्रकार परिषद संपन्‍न झाली, याप्रसंगी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ विश्‍वास शिंदे, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, मुख्‍य विस्‍तार शिक्षणाधिकारी डॉ राकेश आहिरे, विस्‍तार शिक्षणाधिकारी प्रा पी एस चव्‍हाण उपस्थित होते. याप्रसंगी प्रसारमाध्‍यमांचे प्रतिनिधी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

कुलगूरू मा. डॉ किशनराव गोरे यांची प्रेस नोट

मराठवाडा मुक्‍तीसंग्राम दिनाचे औचित्‍त साधुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठामार्फत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भव्‍य रबी शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन 17 सप्‍टेंबर 2013 रोजी सकाळी 10.30 वा कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात करण्‍यात आले आहे. मेळाव्‍यात तांत्रिक चर्चासत्र, बि-बियाणे वाटप, कृषि प्रदर्शन, शिवार फेरीचे आयोजन करण्‍यात आले आहे. सदरील मेळाव्‍यास उद् घाटन नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषदेचे उपमहानिदेशक (शिक्षण) मा. डॉ. अरविंद कुमार यांच्‍या हस्‍ते होणार असुन अध्‍यक्षस्‍थानी कुलगूरू मा डॉ किशनरावजी गोरे राहणार आहेत. महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणेचे उपाध्‍यक्ष मा.ना.श्री. विजयरावजी कोलते, कृषि शास्‍त्रज्ञ निवड मंडळ, नवी दिल्‍लीचे माजी अध्‍यक्ष तथा वनामकृवि चे माजी कुलगुरु डॉ. चारुदत्‍त मायी व अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ गोंविदरावजी भराड यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असुन ते शेतक-यांना मार्गदर्शन करणार आहेत.
ग्रीष्‍म वसतीगृह व विद्यापीठ ग्रं‍थालयाच्‍या नुतनीकरणाचे उद् घाटन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते होणार आहे. ग्रंथालयात विद्यार्थ्‍यासाठी अत्‍याधुनिक सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात आल्‍या असुन ऑन लाईन ई-रिसोर्स कक्षाची स्‍थापना करण्‍यात आली आहे.  
मेळाव्‍यात तांत्रिक सत्राचे आयोजन करण्‍यात आले असुन यामध्‍ये विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ रबी हंगामातील विविध पिके रबी ज्‍वार, गहु, हरभरा, करडई इत्‍यादीच्‍या लागवड तंत्रज्ञानावर उपस्थितीत शेतक-यांना मार्गदर्शन करणार आहेत.
आयोजित कृषि प्रदर्शनामध्‍ये विविध नामांकित कंपन्‍याचे व विद्यापीठ प्रसारीत तंत्रज्ञान, विविध पिकांच्‍या वाणांचे तसेच शेतक-यांना उपयुक्‍त असे अवजारांची दालने असणार आहेत. तसेच सार्व‍ज‍निक-खाजगी भागीदारी तत्‍वावर आधारीत कृषि अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालय व झेन नॅचरल अग्रो प्रा. लि. यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने सुरु असलेल्‍या प्रकल्‍पाअंतर्गत तयार करण्‍यात आलेले विविध फळ प्रक्रिया पदार्थाचे नाविन्‍यपुर्ण दालन असणार आहे. या प्रकल्‍पाअंतर्गत तयार करण्‍यात आलेले विविध फळ प्रक्रिया पदार्थाची 20 टनाचे प्रत्‍येकी दोन कंटेनर नुकतेच परदेशात निर्यात केली आहेत. या नाविण्‍यपुर्ण प्रकल्‍पामुळे या भागातील शेतकरी, विद्यार्थी व उद्योजक यांना फायदा होणार असून या भागात कृषि उद्योजकता वाढीस गती प्राप्‍त होणार आहे.
विद्यापीठामध्‍ये विविध नाविण्‍यपुर्ण उपक्रम कार्यरत असुन यामध्‍ये कृषि अवजारे चाचणी, निर्मिती व प्रशिक्षण केंद्र, पिंगळगड नाला सिंचन प्रकल्‍प, अन्‍न तंत्रज्ञान महाविद्यालायातील फळ प्रक्रिया प्रकल्‍प तसेच कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, विविध संशोधन केंद्र व त्‍याचप्रमाणे विद्यापीठाच्‍या प्रक्षेत्रावर शिवार फेरीचे आयोजन करण्‍यात आले आहे.
विद्यापीठाने विकसीत केलेले व शेतकरी बांधवांची प्रचंड मागणी असलेले रबी ज्‍वार, हरभरा, करडई इत्‍यादी पिकांचे उपलब्‍ध बियाणे शेतक-यांना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते उद् घाटन करुन विक्री करण्‍यास सुरुवात करण्‍यात येणार आहे.
राज्‍यामध्‍ये जवळपास 82 टक्‍के क्षेत्र कोरडवाहु असुन या भागाच्‍या कृषि विकासासाठी कोरडवाहु शेती अभियानाचा शुभारंभ नुकताच कृषिमंत्री मा ना श्री राधाकृष्‍णजी विखे-पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद येथे संपन्‍न झाला आहे. तसेच विद्यापीठाचे मा. कुलगूरू डॉ किशनरावजी गोरे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली गठीत केलेल्‍या कृषि हवामान विभागनिहाय अभ्‍यास गट क्रमांक 3 च्‍या बैठका तथा कार्यशाळा मराठवाडयातील आठ जिल्‍हयासह सोलापुर, जळगांव, वाशिम, बुलढाणा ईत्‍यादी जिल्‍हयात घेण्‍यात येउन त्‍याचा अंतरिम अहवाल महाराष्‍ट्र शासनास सादर करण्‍यात आला आहे. यामुळे कृषि हवामान विभागनिहाय आधारीत कृषि धोरण आखण्‍यास शासनास मदत होणार आहे.
नुकतेच गोळेगांव येथील कृषि महाविद्यालयातील 65 पदे व चाकुर येथील पद्वव्‍युत्‍तर कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन संस्‍थेचे 38 पदे शासनाने मंजुर केले आहेत. त्‍यामुळे विद्यापीठातील शैक्षणिक कार्यास बळकटी प्राप्‍त होणार आहे. याबद्दल राज्‍याचे मुख्‍यमंत्री मा.ना.श्री. पृथ्‍वीराजजी चव्‍हाण व कृषि मंत्री मा.ना.श्री. राधाकृ‍ष्‍णजी विखे पाटील यांचे आभार व्‍यक्‍त करतो.या रबी मेळाव्‍यास शेतकरी व कृषि उद्योजकांनी मोठया संख्‍येने उपस्थितीत रहावे असे आवाहन करण्‍यात येते व येत्‍या रबी हंगामासाठी शुभेच्‍छा.