Pages

Friday, September 27, 2013

जिल्‍हाधिकारी मा. श्री एस. पी. सिंग यांची वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठास सदिच्‍छा भेट

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या मध्‍यवर्ती ग्रंथालयास भेट दिली त्‍याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन करतांना जिल्‍हाधिकारी मा. श्री एस. पी. सिंग, सोबत कुलगूरू डॉ किशनराव गोरे, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर,  प्रभारी ग्रंथपाल डॉ जे बी जगताप आदी
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रास जिल्‍हाधिकारी मा. श्री एस. पी. सिंग यांनी भेट दिली त्‍याप्रसंगी विद्यापीठाच्‍या विस्‍तार कार्याबाबत मा‍हिती देतांना कुलगूरू डॉ किशनराव गोरे व व्‍यवस्‍थापक डॉ. आनंद गोरे आदी
परभणी जिल्‍ह्याचे जिल्‍हाधिकारी मा. श्री एस. पी. सिंग  यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठास दिनांक 27 सप्‍टेंबर 2013 रोजी सदिच्‍छा भेट दिली. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. किशनरावजी गोरे, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री का. वि. पागीरे, ग्रंथपाल डॉ. जे. बि. जगताप, डॉ. मेहत्रे आदि उपस्थित होते.
विद्यापीठांतर्गत असलेल्‍या मध्‍यवर्ती ग्रंथालय, बिजोत्‍पादन प्रक्षेत्र, शेततळे, उद्यानविद्या विभाग व कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र या उपक्रमास भेट देवुन समाधान व्‍यक्‍त केले. विद्यापीठाच्‍या मध्‍यवर्ती ग्रंथालयातील अद्यावत सुविधांची पाहाणी करुन उपस्थित विद्यार्थ्‍यांशी संवाद साधला. विद्यार्थ्‍यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करतांना मा. श्री एस. पी. सिंग म्‍हणाले की, स्‍पर्धा परिक्षांमध्‍ये यश प्राप्‍त करण्‍यासाठी विद्यार्थ्‍यांनी प्रामाणिक प्रयत्‍न व कठोर परिश्रम करावेत. कृषि पदविधरांनी शेतीवर प्रेम करण्‍याचा सल्लाही त्‍यांनी दिला. तसेच त्‍यांनी स्‍वत:चे अनुभव विद्यार्थ्‍यांना सांगितले. कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रात भेटी प्रसंगी व्‍यवस्‍थापक डॉ. आनंद गोरे यांनी विद्यापीठाच्‍या विस्‍तार कार्याबाबत मा‍हिती दिली.