Pages

Saturday, September 7, 2013

गृह विज्ञान महाविद्यालयात व्‍यक्तिमत्‍व व शैक्षणिक संपादणुक वृध्दींगत क्लबचे उद् घाटन

गृह विज्ञान महाविद्यालयाच्‍या पदवीपुर्व व पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍याचे व्‍यक्तिमत्‍व व शैक्षणिक संपादणुक वृध्दींगत क्‍लबच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करतांना संचालक शिक्षण तथा अधिष्‍ठाता मा. डॉ विश्‍वास शिंदे, व्यासपीठावर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर व महाविद्यालयाच्‍या प्राचार्या प्रा विशाला पटनम आदी 
गृह विज्ञान महाविद्यालयाच्‍या पदवीपुर्व व पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍याचे व्‍यक्तिमत्‍व व शैक्षणिक संपादणुक वृध्दींगत क्‍लबच्या उद्घाटन प्रसंगी दीप प्रज्वलन करतांना संचालक शिक्षण तथा अधिष्‍ठाता मा. डॉ विश्‍वास शिंदे, व्यासपीठावर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, महाविद्यालयाच्‍या प्राचार्या प्रा विशाला पटनम व जिमखाना उपाध्‍यक्षा डॉ सुनिता काळे आदी 
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या गृह विज्ञान महाविद्यालयाच्‍या पदवीपुर्व व पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍याचे व्‍यक्तिमत्‍व व शैक्षणिक संपादणुक वृध्दींगत क्‍लबची स्‍थापना करण्‍यात आली. या क्‍लबचे उद्घाटन संचालक शिक्षण तथा अधिष्‍ठाता मा. डॉ विश्‍वास शिंदे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. या प्रसंगी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्या प्रा विशाला पटनम यांची विशेष उपस्थिती होती.
विद्यार्थ्‍यांचा सर्वागीण विकास घडवण्‍यासाठी त्‍यांच्‍या अभ्‍यासक्रमाव्‍यतीरिक्‍त या प्रकारच्‍या नावीण्‍यपुर्ण उपक्रमांची जोड देणे आवश्‍यक असल्‍याचे मत संचालक शिक्षण तथा अधिष्‍ठाता मा. डॉ विश्‍वास शिंदे यांनी व्‍यक्‍त केले. याबाबत त्‍यांनी महाविद्यालयाच्‍या प्राचार्या प्रा विशाला पटनम यांचे अभिनंदन केले. तसेच विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण व संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी विद्यार्थ्‍यांनी स्‍वत:ची जीवन कौशल्‍ये वृध्‍दींगत करणे ही काळाची गरज आहे असे मत व्‍यक्‍त केले.
कार्यक्रमात महाविद्यालयाच्‍या विद्यार्थी संसदेच्‍या नुतन सदस्‍यांचे मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. तसेच महाविद्यालयाच्‍यावतीने घेण्‍यात आलेल्‍या विविध स्‍पर्धतील विजेत्‍यांना प्रशस्‍तीपत्र प्रदान करण्‍यात आले.  
पदवीपुर्व विद्यार्थ्‍याचे व्‍यक्तिमत्‍व व शैक्षणिक संपादणुक वृध्दींगत तथा अध्‍ययन गती मंदित्‍वाना न्‍याय देण्‍यासाठी विशेष उपचारात्‍मक वर्गात अॅड सुवर्णमाला गायकवाड यांनी कौटुंबिक हिंसाचार - कारणे व निवारण,  मुंबईच्‍या सामाजिक कार्यकर्त्‍या श्रीमती संगीता सोळंके यांनी ग्रामीण महिलांच्‍या आर्थिक सबलीकरणामध्‍ये युवकांचा सहभाग व निरामय स्‍वास्‍थासाठी योगा तर विद्यापीठाच्‍या महिला तक्रार निवारण समितीच्‍या सद्स्‍या श्रीमती आशा ढालकरी यांनी उद्योजकतेव्‍दारे स्‍वत:च विकास या विषयावर मार्गदर्शन केले.
शिक्षक दिनाचे औचित्‍य साधुन विद्यार्थ्‍यानी सर्व शिक्षकांचे पुष्‍पगुच्‍छ देवुन कृतज्ञता व्‍यक्‍त केली. कार्यक्रमाचे आयोजन जिमखाना उपाध्‍यक्षा तथा संशोधिका डॉ सुनिता काळे व विद्यार्थी संसद सदस्‍य यांनी केले.  
मार्गदर्शन करतांना मुंबईच्‍या सामाजिक कार्यकर्त्‍या श्रीमती संगीता सोळंके,  व्यासपीठावर अॅड सुवर्णमाला गायकवाड, महाविद्यालयाच्‍या प्राचार्या प्रा विशाला पटनम, जिमखाना उपाध्‍यक्षा डॉ सुनिता काळे आदी