Pages

Wednesday, October 23, 2013

गृहविज्ञान तंत्रज्ञानाचे प्रदर्शन


महिलांना मार्गदर्शन करतांना गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या प्रभारी प्राचार्या डॉ. हेमांगिनी सरंबेकर व्यासपीठावर डॉ. विजया नलवडे, डॉ. प्रभा अंतवाल व समन्‍वयक डॉ. शंकर पुरी 

गृहविज्ञान तंत्रज्ञानाचे प्रदर्शनाची पाहणी करतांना गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या प्रभारी प्राचार्या डॉ. हेमांगिनी सरंबेकर व्यासपीठावर डॉ. विजया नलवडे, डॉ. प्रभा अंतवाल

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या ग्रामीण गृहविज्ञान कार्यानुभव कार्यक्रम नृसिंह पोखर्णी येथे दोन महिन्‍यापासून राबविण्‍यात येत असुन या कार्यक्रमामध्‍ये येथील महिलांना महाविद्यालयाच्‍या विद्यार्थीनींनी अन्‍न व पोषण, कौटुंबिक साधनसंपत्‍ती व्‍यवस्‍थापन, मानव विकास व कौटुंबिक अभ्‍यास, वस्‍त्र व परिधान अभिकल्‍पना तसेच संदेशवहन याबाबतीत नाविन्‍यपुर्ण गृहविज्ञान तंत्रज्ञानाची माहिती दिली. या माहितीची महिलांनी भरपूर लाभ झाला तसेच महिलांनी आत्‍मसात केलेल्‍या तंत्रज्ञानाचा वापर करुन त्‍यांनी विविध खाद्य पदार्थ, बांधणी काम, शोभिवंत वस्‍तू तयार केल्‍या आणि याचे प्रदर्शन पोखर्णी येथील नृसिंह मंदिर संस्‍थान सभागृहात आयोजित करण्‍यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घघाटन महाविद्यालयाच्‍या प्रभारी प्राचार्या डॉ. हेमांगिनी सरंबेकर यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. या प्रसंगी त्‍यांनी उपस्थित महिलांना विविध गृहविज्ञान तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले. तसेच महा‍विद्यालयातील अन्‍न व पोषण विभागाच्‍या प्रमुख डॉ. विजया नलवडे यांनी जागतिक अन्‍न दिनानिमित्‍त अन्‍न व पोषण आहार यावर तर डॉ. प्रभा अंतवाल यांनी विद्यापीठाच्‍या विविध कार्याविषयी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केल्रे. या प्रसंगी उपस्थित महिलांनी मनोगतात सांगितले कि महाविद्यालयाच्‍या विद्यार्थींनी कडून विविध पाककृती, मानव विकास, वस्‍त्र अभिकल्‍पना, कौटूंबिक व्‍यवस्‍थापन, निरोगी रहाण्‍यासाठी तसेच विविध आजारामध्‍य आहाराचे नियोजन इ. बद्दल सखोल माहिती मिळाली व त्‍यांच्‍या ज्ञानात भर पडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रेश्‍मा मल्‍लेशा यांनी केले तर आभार वेदांती मुळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी कार्यानुभव कार्यक्रमाचे समन्‍वयक डॉ. शंकर पुरी यांच्‍या मार्गदर्शनाखाली अनुराधा डोके, शमशाद शेख, संध्‍या देशमुख, गीता सामला, स्‍नेहल कारले आणि मिनाक्षी मगर यांनी परिश्रम घेतले. तसेच कार्यक्रमासाठी नृसिंह मंदिर समितीचे विशेष सहकार्य मिळाले. कार्यक्रमात महिलांनी मोठ्या प्रमाणात उत्‍स्‍फुर्तपणे सहभाग नोंदवला.