Public Relations Officer,
Directorate of Extension Education,
Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth,
Parbhani - 431 402 (M.S.)
(Maharashtra) INDIA
Pages
▼
Monday, November 18, 2013
गुजरात येथील नवसारी कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यानी दिली वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठास भेट
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात आलेल्या
गुजरात येथील नवसारी कृषि विद्यापीठच्या ८४ विद्यार्थ्यानी दि १८.११.२०१३ रोजी कृषी
तंत्रज्ञान माहिती केंद्रास भेट दिली.या प्रसंगी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे
व्यवस्थापक डॉ. आनंद गोरे यांनी "विद्यापीठ आपल्या दारी, तंत्रज्ञान
शेतावारी" या महत्वाकांशी उपक्रमाबद्दल माहिती दिली. तसेच विद्यापीठाने
संशोधित केलेल्या विविध पिकांच्या जाती / बी -बियाणे बद्दल माहिती दिली.कृषी विषयी माहिती
देणारे विविध प्रकाशने, घडीपत्रिका, माहिती पुस्तिका या बद्दल मार्गदर्शन केले. ऑडीवो
कॉन्फेर्सिंग आणि दर मंगळवारी सकाळी १० ते १२ या वेळेत प्रसारित होणा-या "कृषी
वाहिनी" व स्पर्श पटल (टच स्क्रीन) या सेवेबदल मार्गदर्शन केले. विद्यापीठ
आणि कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राने सुरु केलेल्या नवीन ब्लोग बदल व कृषी
तंत्रज्ञान माहिती केंद्र मध्ये शेतकरीसाठी नवीन सुरु केलेल्या संगणक विभाग बद्दल
माहिती दिली. याप्रसंगी
केंद्राचे कर्मचारी डी. डी. पटाईत, सतीश जाधव, दयानंद दिक्षित, रंजना लांडगे, सचिन रनर, श्री कठारे हे उपस्थित होते. सदरिल विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील
उती-संवर्धन, पशु-संवर्धन व
दुग्ध व्यवसाय, कृषी अन्न
तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी विभाग, उद्यानविद्या विभागास भेटी दिल्या.