स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या 29 व्या स्मृती दिनानिमित्त दि.
24 ते 28 नोव्हेबर 2013 दरम्यान कराड येथे 10 वे यशवंतराव चव्हाण कृषि औद्योगीक
व पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असुन या प्रदर्शनाचे उदघाटन मा मुख्यमंत्री
मा ना श्री पृथ्वीराजजी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात या
प्रदर्शनात राज्यातील चारही कृषि विद्यापीठे, कृषि विभाग, विविध कंपन्या आदीचे
दालने उभारण्यात आले असुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे दालनास
महाराष्ट्र राज्याच्या मा मुख्यमंत्री मा ना श्री पृथ्वीराजजी चव्हाण व मा
उपमुख्यमंत्री मा ना श्री अजितदादा पवार यांनी दि 25 नोव्हेबर रोजी भेट दिली. विद्यापीठाच्या
दालनात विद्यापीठाने विकसीत केलेले विविध तंत्रज्ञान, पिकांचे विविध वाणे व नमुणे,
अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयाचे विविध प्रक्रिया पदार्थ ठेवण्यात आलेले आहेत. या
दालनास मा मुख्यमंत्री व मा उपमुख्यमंत्री यांच्यासह कृषि व पणन मंत्री मा ना श्री राधाकृष्णजी
विखे पाटील, वनमंत्री मा. ना. श्री पतंगराव कदम, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय
मंत्री मा. ना. श्री मधुकरराव चव्हाण, कृषि आयुक्त मा. श्री उमाकांतजी दांगट आदि
मान्यवरांनी भेटी दिल्या. मा. मुख्यंमंत्री यांनी विद्यापीठाचा सोयाबीनच्या
एमएयुएस-162 या वाणाची विशेष चौकशी केली.
या विद्यापीठाच्या दालनास शेतक-यांनी मोठ्या
संख्येनी शेतक-यांनी भेटी दिल्या असुन विद्यापीठाने विकसीत केलेल्या सोयाबीनचे
वाण एमएयुएस-71 व एमएयुएस-162 या वाणाची विशेष मागणी करीत आहेत. विद्यापीठाचे विस्तार
शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण यांच्या मार्गदर्शनाखाली या कृषि प्रदर्शनात
विद्यापीठाचे दालण मांडण्यात आले असून श्री वैजनाथ सातपुते व श्री संजय मोरे हे
शेतक-यांना माहिती देत आहेत.