Pages

Monday, December 2, 2013

राष्‍ट्रीय सेवा योजनातर्फे जागतिक एड़स दिनानि‍मित्‍त सकस आहाराचे वाटप


वसंतराव नाईक मराठवाडा क़षि विदयापीठांतर्गंत कृषि अभियांत्रिकी महाविदयालयाच्‍या राष्‍ट्रीय सेवा योजनातर्फे जीवनरेखा बालसुधार गृहातील एड़सग्रस्‍त बालकांना सकस आहाराचे वाटप करण्‍यात आले. एड़सग्रस्‍त बालकांचे भविष्‍य उज्‍वल घडविण्‍याकरीता तसेच त्‍यांना समाजाच्‍या मुख्‍य प्रवाहात सामावून घेण्‍याकरीता सर्वस्‍तरातून जाणीव जाग़ृती घडवून एकत्रित प्रयत्‍नांची आवश्‍यकता असल्‍याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्‍यक्ष सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ उदय खोडके यांनी केले. प्रमुख पाहुणे डॉ. पवन चांडक व किर्तीकुमार बुरांडे यांनी रासेयोच्‍या या उपक्रमाबद़दल गौरवोद़गार काढले व अशा प्रकारे एड़सग्रस्‍त पिडीत बालकांसाठी वेगवेगळया माध्‍यमातून मदतीचा ओघ यावा अशी आशा त्‍यांनी व्‍यक्‍त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रमाकांत कारेगावकर यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यक्रम अधिकारी प्रा. रवींद्र शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्‍या यशस्वितेकरीता स्‍वयंसेवक राहुल शेळके, कु. मयुरी काळे, कु. अश्विनी नितनवरे, कु. आकांक्षा कुलकर्णी, अमर‍दीप हत्‍तीअंबीरे, गौतम वाव्‍हळे आदीनी परिश्रम घेतले.