आज शासनाने अनेक सवलती स्त्रीयांना उपलब्ध
करून दिल्या, परंतु राजकारणात व समाजकारणाच्या निर्णय प्रक्रियेत महिला आजही
सक्रिय सहभाग घेत नाहीत, सावित्रीबाई फुलेंनी समाजातील कुचेष्ठांना तोंड देत
महिला शिक्षणासाठी मोठे कार्य केले, असे प्रतिपादन बारामती येथील कृषि
विकास प्रतिष्ठाणाच्या विश्वस्त तथा भिमथडीच्या संयोजिका
मा श्रीमती सुनंदाताई राजेंद्र पवार यांनी केले.
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासनाचा
कृषि विभाग व गृह विज्ञान महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त दिनांक 3 जानेवारी, 2014 रोजी आयोजित महिला शेतकरी मेळाव्याच्या उदघाटनाप्रसंगी
त्या बोलत होत्या. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्रभारी
कुलगूरू मा डॉ विश्वास शिंदे होते तर विस्तार शिक्षण संचालक
डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक
डॉ दत्तप्रसाद वासकर, अकलुज येथील सावि फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती सविताताई
व्होरा, लातुर येथील महिला उद्योजिका तथा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या
सदस्या श्रीमती आशाताई भिसे, गृहविज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता
प्रा. विशाला पटनम व आत्माचे प्रकल्प संचालक श्री अशोक काळे यांची प्रमुख
उपस्थिती होती.
मा श्रीमती सुनंदाताई पवार पुढे म्हणाल्या की, सावित्रीबाई, अहिल्यादेवी, जिजाबाई या
स्त्रियांनी विपरीत परिस्थितीत समाज घडविण्याचे महान कार्य केले. परंतु आज अशा
महान स्त्रिया घडण्याची प्रमाण कमी होत आहेत. समाजाला स्त्री भ्रुणहत्याचा
हिशोब द्यावा लागणार आहे. सावित्रीबाईच्या पावलावर पाऊल टाकुन महिलांनी पुढे जाण्याची
गरज आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
समारोपीय भाषणात प्रभारी कुलगूरू मा डॉ विश्वास शिंदे म्हणाले की, सावित्रीबाई फुले ह्या चुल व मूल यात गुंतून न रहाता स्त्री शिक्षणाचे महान कार्य केले. संपुर्ण देशात विज्ञान, प्रशासन, उद्योग, राजकारण, समाजकारण या विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करीत आहेत. तसेच कृषि क्षेत्रातही महिलांचा मोलाचा वाटा आहे. स्त्रीयांचा आर्थिक सामाजिक व राजकीय सबलीकरणासाठी अधिक कार्य करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील स्त्रीयांमध्ये बचत गटाद्वारे होणारी मोठी क्रांती होत आहे. ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी व उद्योजकतेचे गुण विकसीत करण्यासाठी विद्यापीठ सदैव प्रयत्नशील आहे. ग्रामीण महिलाच ख-या अन्नपुर्णा असुन दुस-या हरीत क्रांतीसाठी ग्रामीण महिलांचा सहभाग महत्वाचा आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
समारोपीय भाषणात प्रभारी कुलगूरू मा डॉ विश्वास शिंदे म्हणाले की, सावित्रीबाई फुले ह्या चुल व मूल यात गुंतून न रहाता स्त्री शिक्षणाचे महान कार्य केले. संपुर्ण देशात विज्ञान, प्रशासन, उद्योग, राजकारण, समाजकारण या विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करीत आहेत. तसेच कृषि क्षेत्रातही महिलांचा मोलाचा वाटा आहे. स्त्रीयांचा आर्थिक सामाजिक व राजकीय सबलीकरणासाठी अधिक कार्य करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील स्त्रीयांमध्ये बचत गटाद्वारे होणारी मोठी क्रांती होत आहे. ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी व उद्योजकतेचे गुण विकसीत करण्यासाठी विद्यापीठ सदैव प्रयत्नशील आहे. ग्रामीण महिलाच ख-या अन्नपुर्णा असुन दुस-या हरीत क्रांतीसाठी ग्रामीण महिलांचा सहभाग महत्वाचा आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
अकलुज येथील सावि फाउंडेशनच्या अध्यक्षा
श्रीमती सविताताई व्होरा आपल्या भाषणात म्हणाल्या की, मुलींनी स्वत:चा सन्मान
स्वत:च करायला पाहिजे, जो पर्यंत स्वत:चा सन्मान करणार नाहीत तो पर्यंत समाज
तुमचा सन्मान करणार नाहीत. स्त्री जन्माचे स्वागत करु या, स्त्रीभ्रूणहत्या
बंद झाल्या पाहिजेत यासाठी सर्वांनी प्रयत्न करु या, अशी शपथ उपस्थितांना
देवविली.
लातुर येथील
महिला उद्योजिका श्रीमती आशाताई भिसे मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की, महिलांच्या पाठीवर
पुरुषांनी थाप दिली तर महिलांचे हातुन महान कार्य घडेल. आज बचत गटातील महिला
मोठ्या ताकतीने उभी आहे. ही आर्थिक ताकद ख-या अर्थाने खेड्यातुन उभी राहीली आहे.
बचत गटातुन ग्रामीण महिला सक्षम होत आहेत. स्त्रियांवर अन्याय करणा-यावर सामाजिक
बहिष्कार टाकला पाहिजे..
विस्तार शिक्षण
संचालक डॉ अशोक ढवण प्रास्ताविकात म्हणाले की, कृषि विद्या
शाखेत मुलींची लक्षणीय वाढ होताना दिसत आहे, हेच सावित्रीबाई फुले यांच्या महान
कार्याचे फलीत आहे. महिलांचे शेतीतील काबाडकष्ट कमी करण्यासाठी कृषि विद्यापीठाने
अनेक औजारे विकसीत केलेले आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन
डॉ माधुरी कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन मुख्य
विस्तार शिक्षण अधिकारी डॉ राकेश अहिरे यांनी केले. विभागप्रमुख डॉ. बी. एम. ठोंबरे व श्री वाय. एस. सोनवणे यांनी संपादीत केलेल्या कृषी दिनदर्शिकाचे
प्रकाशन तसेच शेतीभाती मासिकाचा महिला विशेषांकाचे
व विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या प्रकाशनाचे
विमोचन मान्यवराच्या हस्ते करण्यात आले. चर्चासत्रात विद्यापीठातील
शास्त्रज्ञ प्रा. विशाला पटनम, डॉ. विजया नलावडे, डॉ.
जयश्री झेंड, डॉ. जया बंगाळे व डॉ. हेमांगिनी सरंबेकर यांनी उपस्थित महिलांना
मार्गदर्शन केले. याप्रसंगी कृषि
प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते, त्यास उपस्थित
शेतकरी महिलाचा उत्स्फुर्त प्रतिसाद होता. मेळाव्यात महिला
शेतकरी, शेतकरी बांधव
व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक करतांना विस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण |