Pages

Thursday, January 23, 2014

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या दालनास केंद्रीय कृषिमंत्री मा ना श्री शरदचंद्रजी पवार यांची भेट


बारामती येथील कृषी प्रदर्शनामध्‍ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या दालनास केंद्रीय कृषिमंत्री मा ना श्री शरदचंद्रजी पवार यांनी भेट देऊन पिकांच्‍या विविध वाणांची चौकशी केली. 
भारतीय कृषि संशोधन परिषद, बारामती कृषी विकास प्रतिष्‍ठान यांच्‍या तर्फे दि 18 ते 20 जानेवारी दरम्‍यान बारामती येथील कृषि विज्ञान केंद्रामध्‍ये देशातील कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, भारतीय कृषी संशोधन परिषदेच्‍या संचालकांची बैठक आयोजित करण्‍यात आली होती. यानिमित्‍त अखिल भारतीय कृ‍षी प्रदर्शनाचे आयोजन करण्‍यात आले होते. यात देशातील कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र, कृषी संशोधन संस्‍थांनी सहभाग घेतला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा श्री संजीव जयस्‍वाल, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांच्‍या मार्गदर्शनाखाली दालन उभारण्‍यात आले होते. यात विद्यापीठाने विकसित केलेले वाण, तंत्रज्ञान, पिकांचे व बियांणाचे नमुने, प्रक्रिया पदार्थ, सोयाबीन दुध, नोनी रस ठेवण्‍यात आला होता. दालनास मा ना श्री शरदचंद्रजी पवार, उपमुख्‍यमंत्री मा ना श्री अजितदादा पवार, विविध वि‍द्यापीठांचे कुलगुरू, संचालक आदींनी भेट दिली. विद्यापीठाने विकसित केलेल्‍या ज्‍वारी, चिंच, तुर, सोयाबीन दुध प्रक्रियेबाबत माहिती घेतली. विद्यापीठाच्‍या दालनाचे मुख्‍य आकर्षण तुर बीडीएन 711 हे होते, याबाबत मा ना श्री शरदचंद्रजी पवार यांनी विशेष चौकशी केली.
याप्रदर्शनाचे उदघाटन राष्‍ट्रपती मा ना श्री प्रणव मुखर्जी यांच्‍या हस्‍ते झाले. यावेळी केंद्रीय कृषिमंत्री मा ना श्री शरदचंद्रजी पवार, कृषी राज्‍यमंत्री मा ना श्री चरणदास महंत, मुख्‍यमंत्री मा ना श्री पृथ्‍वीराजजी चव्‍हाण, उपमुख्‍यमंत्री मा ना श्री अजितदादा पवार, कृषि व पणन मंत्री मा ना श्री राधाकृष्‍णजी विखे पाटील आदी उपस्थित होते. विद्यापीठाच्‍या विस्‍तार शिक्षण संचालनालयातर्फे श्री वैजनाथ सातपुते व डॉ किशोर झाडे यांनी दालनाची माहिती दिली.