Pages

Wednesday, January 8, 2014

रासेयोचे स्‍वयंसेवक विशेष साहसी क्रिडा शिबीराकरीता रवाना

रासेयो स्‍वयंसेवकांसाठी राष्ट्रिय स्‍तरावर केंद्र शासनाच्‍या युवा विकास व क्रिडा मंत्रालय अंतर्गंत यावर्षापासुन विशेष साहसी शिबीराच्‍या माध्‍यमातून साहसी नैपुण्‍य निर्माण करण्‍यासाठी शिबीर आयोजीत करण्‍यात आले आहे. वसंतराव नाईक मराठवाडा क़षि विद्यापीठांतर्गंत राष्ट्रिय सेवा योजनेचे स्‍वयंसेवक हे अमरावती येथे आयोजीत हनुमान व्‍यायाम प्रसारक मंडळ साहसी क्रिडा शिबीराकरीता विद्यापीठातील कु. मयुरी काळे, कु. अश्विनी नितनवरे, संतोष दशरथे, सदाशिव भालेराव या स्‍वयंसेवकांची निवड करण्‍यात येऊन, ते रवाना झाले. स्‍वयंसेवक निवडीकरीता व रवानगीकरीता विद्यार्थी कल्‍याण अधिकारी प्रा. महेश देशमुख यांच्‍यासह कार्यक्रम अधिकारी प्रा. रविंद्र शिंदे, प्रा. अनिश कांबळे प्रा.विजय जाधव, प्रा. संजय प्रवार यांनी मार्गदर्शन केले. सदरील शिबीराकरीता स्‍वयंसेवकांना कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ.बी.बी. भोसले व कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. यु.एम.खोडके यांनी शुभेच्‍छा दिल्‍या.