Pages

Sunday, March 2, 2014

कृषिविद्या विभागात राष्‍ट्रीय विज्ञान दिन साजरा

     वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या कृषि विद्या विभाग व भारतीय कृषि विद्याविद्या संस्‍था शाखा परभणी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दि. 28 फेब्रुवारी 2014 रोजी डॉ.सी.बी.रमण यांच्‍या संशोधन कार्यानिमित्‍त राष्‍ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्‍यात आला. या प्रसंगी कृषि विद्या विभागातील विद्यार्थ्‍यांसाठी लेखी प्रश्‍न मंजुषा आयोजित करण्‍यात आली होती. स्‍पर्धेत सर्वाधिक गुण प्राप्‍त करुन श्री जी. एस. काझी हा विद्यार्थी प्रथम पारितोषिक मिळविण्‍याचा मानकरी ठरला, त्‍यास विभाग प्रमुख डॉ. बी. व्‍ही. आसेवार यांच्‍या हस्‍ते मा‍नचिन्‍ह देऊन सत्‍कार करण्‍यात आला. 
     या प्रसंगी डॉ. ए. एस. जाधव, डॉ. के. टी. जाधव, प्रा. एन.जी.कु-हाडे व प्रा. जी. डी. गडदे यांनी उपस्थित विद्यार्थ्‍याना मार्गदर्शन केले. अध्‍यक्षीय समारोपात डॉ. बी. व्‍ही. आसेवार यांनी विद्यार्थ्‍यांना सचोटी व सातत्‍य ठेवुन काम केल्‍यास यश संपादन करणे सहज शक्‍य आहे असे सांगीतले. प्रश्‍न मंजूषा पार पाडण्‍यासाठी डॉ. एस. एस. जाधव, डॉ. के. टी. जाधव आणि प्रा. पी. के. वाघमारे यांनी विशेष प्रयत्‍न केले. कार्यक्रमाचे सूचसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. पी. के. वाघमारे यांनी केले. या कार्यक्रमात कृषिविद्या विभागाचे प्रा. डॉ. अवसरमल, प्रा. पवार मॅडम, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी उपस्थित होते.