Pages

Tuesday, March 11, 2014

येत्‍या दोन दिवसात वादळी वा-यासह काही-काही ठिकाणी पावसाची शक्‍यता

लक्षव्‍दीप ते मध्‍य-उत्‍तर कर्नाटक या भुप्रदेशावर 900 मीटर उंचीवर वा-याची द्रोणीय स्थिती निर्माण झाली असुन अरबी समुद्रात मध्‍यभागात व दक्षिण गुजराथ भुप्रदेशावर भुपृष्‍ठापासुन दीड किलोमीटर उंचीवर वा-याची द्रोणीय स्थिती आहे. यास्‍तरात हवेतील आर्द्रता अधिक असुन वा-याचा वेग अधिक राहणार आहे. याचा परिणाम म्‍हणुन येत्‍या दोन दिवसात आकाश ढगाळ राहुन वादळी वा-यासह मराठवाडयातील सर्व जिल्‍हयात तुरळक ठिकाणी वादळी वा-यासह पाऊस पडण्‍याची शक्‍यता आहे, अशी अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या कृषि हवामानशास्त्र विभागाच्‍या ग्रामिण कृषि मौसम सेवाचे मुख्‍य प्रकल्‍प समन्‍वयक प्रा. प्रल्‍हाद जायभाये यांनी दिली.  उस्‍मानाबाद, लातुर, नांदेड व हिंगोली जिल्‍हयात तुरळक ठिकाणी हलकी ते मध्‍यम सवरूपाच्‍या गारांचा पाऊस पडण्‍याची शक्‍यता असुन शुक्रवार नंतर हवामान स्‍वच्‍छ होऊन अवकाळी पाऊस व गारपीट याची तीव्रता कमी होण्‍याची शक्‍यता असल्‍याचा अंदाज त्‍यांनी व्‍यक्‍त केला.