परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या
गृह विज्ञान महाविद्यालयाच्या वस्त्र व परिधान अभिकल्पना विभागात दि. २० ते २६
मे २०१४ या कालावधीत कपड्यावरील बांधणीकाम विषयावर प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात
आले होते. या प्रशिक्षण शिबीरात बांधणीकाम विषयाचे संपुर्ण मार्गदर्शन करण्यात
येऊन या कलेचा वापर करुन प्रत्यक्ष बांधणीकाम रुमाल, स्कार्फ, दुपट्टा, टॉप आणि
साडया तयार करण्यात आले. या प्रशिक्षणात दहा विद्यार्थ्यींनी सहभाग नोंदविला
होता. प्रशिक्षण शिबीराचे निर्देशक म्हणुन डॉ. प्रा. इरफाना सिद्यीकी काम पाहिले
तर विभाग प्रमुख प्रा. मेघा उमरीकर यांचे शिबीरासाठी मार्गदर्शन लाभले. दि. २६ मे २०१४
रोजी सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य प्रा. विशाला पटनम यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थ्यांना
प्रशस्तीपत्रकाचे वितरण करण्यात आले.
Public Relations Officer, Directorate of Extension Education, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani - 431 402 (M.S.) (Maharashtra) INDIA
Pages
▼
Wednesday, May 28, 2014
Friday, May 23, 2014
Sunday, May 18, 2014
महाराष्ट्रातील शेतक-यांमध्ये उद्योजकता विकास होणे आवश्यक ....... मा. डॉ. एस. ए. पाटील
खरीप शेतकरी मेळावास शेतकरी बांधवाचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वनामकृवित आयोजीत खरीप पीक श्ेातकरी मेळाव्यानिमित्त कृषि प्रदर्शनाचे उदघाटन करतांना भारतीय कृषि संशोधन
परिषदेचे माजी संचालक मा. डॉ. एस. ए. पाटील, कुलगुरू मा. डॉ. बी. वेंकटेश्वरलु, मराठवाडा शेती साहाय्य मंडळाचे विश्वस्त मा. श्री. विजयअण्णा
बोराडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव श्री. का.
वि. पागीरे, डॉ राकेश आहीरे, प्रा दिलीप मोरे, प्रा पी एस चव्हाण आदी
**********************************************
शेतक-यांनी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाची कास धरली पाहिजे,
तंत्रज्ञानाच्या जोरावरच शेतक-यांची प्रगती झालेली आहे, महाराष्ट्रातील शेतक-यांमध्ये
उद्योजकता विकास होणे आवश्यक असुन शेतीमध्ये अधिक गुंतवणुक करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन
नवी दिल्ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषदेचे माजी संचालक तथा धारवाड (कर्नाटक) येथील कृषि विज्ञान
विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. डॉ. एस. ए. पाटील यांनी केले. ते वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ४२ व्या वर्धापन दिनानिमित्त विस्तार शिक्षण
संचालनालय व कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खरीप शेतकरी मेळाव्याच्या उदघाटनाप्रसंगी बोलत होते.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे
कुलगुरू मा. डॉ. बी. वेंकटेश्वरलु होते तर विशेष अतिथी म्हणुन
जालना येथील मराठवाडा शेती साहाय्य मंडळाचे विश्वस्त मा. श्री. विजयअण्णा
बोराडे यांची उपस्थिती होती. तर कृषि परिषदेचे उपाध्यक्ष मा. श्री विजयरावजी
कोलते, विस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ. विश्वास शिंदे, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद
वासकर, कुलसचिव श्री. का. वि. पागीरे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री.
साहेबराव दिवेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मा. डॉ. एस. ए. पाटील पुढे
म्हणाले की, जगाचा पोशींदा असलेल्या शेतक-यांची परिस्थिती बिकट असुन आपल्या
शेतीधोरणात बदल करावे लागतील. शेतकरी आपल्या हुशार मुलांना वैद्यकीय व
अभियांत्रीकी शिक्षण देण्यास प्राधान्य देतात परंतु आज शेतीला हुशार मनुष्यबळाची
गरज आहे. इस्त्राईलमध्ये कमी पाऊस पडतो परंतु तंत्रज्ञानाच्या जोरावर आपल्यापेक्षा
अनेक पटीने शेती उत्पादनात पुढे आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. वेंकटेश्वरलु म्हणाले की, मराठवाडयातील
शेती कोरडवाहु शेती असुन पाण्याचा वापर शास्त्रीय पध्दतीने करणे आवश्यक आहे. विहीर
पुर्नभरण व शेततळे या सोबतच शेतक-यांसमोर मजुरांच्या टंचाईचा मोठा प्रश्न असुन
त्यासाठी यांत्रीकीकरणावर भर द्यावा लागणार आहे. यावर्षी पाऊस सरासरी इतकाच पडण्याचा
अंदाज आहे, परंतु तो असमान पडण्याची शक्यता दर्शविण्यात आली आहे. विद्यापीठाच्या
बियाणास शेतक-यांमध्ये असलेली मागणी पाहता, यावर्षी विद्यापीठ पुर्णक्षमतेने
बिजोत्पादनाचा कार्यक्रम हाती घेईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
जालना येथील मराठवाडा शेती
सहाय्य मंडळाचे विश्वस्त मा. श्री. विजयअण्णा बोराडे आपल्या भाषणात म्हणाले की, विद्यापीठाचे नामविस्तार वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ असे केल्यानंतर हा पहिलाच शेतकरी मेळावा असुन यामुळे विद्यापीठाची
उंची वाढणार आहे. हवामान बदलामुळे शेतीपुढे मोठे प्रश्न निर्माण झाले असुन हे
सोडविण्यासाठी विद्यापीठ निश्चीतच प्रयत्न करील. या विषयाचा गाड अभ्यासक
असलेले राष्ट्रीय पातळीवरील शास्त्रज्ञ कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलू
यांच्याकडे विद्यापीठाची धुरा आहे, याचा निश्चीतच फायदा मराठवाड्यातील
शेतक-यांना होईल. हवामान बदलाच्या परिस्थितीत रेशीमउद्योग व फुलशेती ही छोट्या
शेतक-यांना अत्यंत उपयोगी आहे. विद्यापीठाने विविध पिकांची अनेक वाणे शेतक-यांना
दिली, यापुढे अवर्षणात तग धरणारे पिकांचे वाण विद्यापीठाला विकसीत करावे लागतील. विद्यापीठाने
सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्वावर शेतक-यांना विद्यापीठाची जमीन कसण्यासाठी
द्यावी. आज जग शेतीला प्रतिष्ठा देत असुन शेतीची प्रतिष्ठा कधीही कमी होणार
नाही. शेतीचा कारभार महिलांकडे दिल्यास त्या सक्षमपणे ही जबाबदारी पेलू शकतात,
असे विचार त्यांनी मांडले.
जिल्हा अधिक्षक कृषि
अधिकारी श्री साहेबराव दिवेकर यांनी आपल्या भाषणात शेतक-यांनी सोयाबीनची उगवणक्षमता तपासुन घरच्या
घरी बियाण्याचा वापर करण्याचा सल्ला दिला. कार्याक्रमाचे प्रास्ताविकात विस्तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण यांनी
विद्यापीठाच्या विस्तार कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. विना
भालेराव यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. राकेश
अहिरे यांनी केले.
तांत्रिक सत्रात विविध खरीप पीक लागवड तंत्रज्ञान, किडी व रोग
व्यवस्थापन, कोरडवाहु शेती व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन,
शेतीचे यांत्रिकीकरण, शेततळे, तण नियंत्रण आदी विषयावर विद्यापीठाच्या शास्त्रज्ञ
डॉ बी बी भोसले, डॉ के एस बेग, डॉ काळपांडे, डॉ पडागळे आदींनी शेतक-यांना
मार्गदर्शन करून शेतक-यांच्या शंकाचे समाधान केले. तांत्रीक सत्राचे सूत्रसंचालन डॉ. आनंद गोरे यांनी केले.
मेळाव्यात विद्यापीठाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सन २०१२ मधील मराठवाडा विभागातील महाराष्ट्र शासन कृषि पुरस्कार
प्राप्त प्रगतशील शेतकरी बांधव व भगीनींचा सत्कार करण्यात आला. विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेले तंत्रज्ञानावर
आधारीत विविध प्रकाशनाचे व श्ेातीभाती मासिकाचे विमोचन यावेळी करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कृषि प्रदर्शनीतील दालनास शेतक-यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. विद्यापीठ विकसित विविध पिकांचे बियाणे विक्रीचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते
करण्यात आले. मेळाव्यास राज्यातील शेतकरी बांधव, कृषि उद्योजक मोठया संख्येने
उपस्थित होते. मेळावा
यशस्वीतेसाठी विद्यापीठ अशिकारी, प्राध्यापक व कर्मचारी इत्यादीनी परिश्रम
घेतले.
प्रास्ताविक करतांना विस्तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण |
Saturday, May 17, 2014
वनामकृवित खरीप शेतकरी मेळाव्यात शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ४२ व्या वर्धापन दिनानिमित्त
विस्तार शिक्षण संचालनालय, वनामकृवि, परभणी व महाराष्ट्र शासनाचा कृषि विभाग
यांच्या संयुक्त
विद्यमाने दि. १८ मे २०१४ रविवार रोजी सकाळी ११.००
वाजता विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारती जवळील नविन पद्व्युत्तर वसतीगृह मैदानावर
खरीप शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला असुन या मेळाव्याचे उद्घाटन नवी दिल्ली
येथील भारतीय कृषि संशोधन परिषदेचे माजी संचालक तथा धारवाड (कर्नाटक) येथील कृषि विज्ञान विद्यापीठाचे
माजी कुलगुरू मा. डॉ. एस. ए. पाटील यांच्या हस्ते होणार आहे. विशेष अतिथी म्हणुन
जालना येथील मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे विश्वस्त मा. श्री. विजयअण्णा बोराडे
यांची उपस्थिती लाभणार असुन अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे
कुलगुरू मा. डॉ. बी. वेंकटेश्वरलु राहणार आहेत.
तांत्रिक सत्रात शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन
या प्रसंगी
विद्यापीठाचे शास्त्रज्ञ तांत्रिक सत्रात सोयाबीन लागवड तंत्रज्ञान, खरिप पिकातील
किडी व रोग व्यवस्थापन, बीटी कापुस लागवड, कडधान्य आधारित पीक पध्दती, खरिप ज्वार
लागवड तंत्र व प्रक्रिया उद्योग, आपतकालीन पीक नियोजन व कोरडवाहु शेती व्यवस्थापन,
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, ऊस, हळद व आद्रक लागवड, शेतीचे यांत्रिकीकरण,
शेततळे, तण नियंत्रण, शेडनेट/हरितगृह तंत्रज्ञान आदी विषयावर मार्गदर्शन करणार
असुन शेवटी शेतक-यांच्या शंकाचे समाधान विद्यापीठ
शास्त्रज्ञ करणार आहेत तसेच कृषि प्रदर्शनीचेही आयोजन करण्यात आले आहे.
विद्यापीठ बियाणे विक्रीचे उदघाटन
दरवर्षी प्रमाणे विद्यापीठ विकसित विविध पिकांचे बियाणे विक्रीचे उदघाटन
मान्यवरांच्या हस्ते होणार असुन मुग, उडीद, तुर, खरीप ज्वारी आदी पिकांच्या
विविध वाणाचे बियाणे मर्यादित स्वरूपात विक्रिसाठी उपलब्ध होणार आहे. परंतु मागील
हंगामातील सोयाबीन पीक काढणीच्या काळात झालेल्या वादळी पाऊस व अतिवृष्टीमुळे
सोयाबीनच्या बियाण्याच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम झाला असुन उगवण क्षमता कमी असल्या
कारणाने यंदा सोयाबीन बियाणाची उपलब्धता विद्यापीठाकडुन होऊ शकणार नसल्याचे
प्रशासनाने कळविले असुन विद्यापीठाने त्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे
शेतकरी बांधवानी स्वत:चे घरगुती सोयाबीन बियाणाचा वापर करण्याचे आवाहन विस्तार
शिक्षण संचालक यांनी केले असुन याबाबतचे सविस्तर मार्गदर्शन विद्यापीठ शास्त्रज्ञ
मेळाव्यात करणार आहेत.
पुरस्कार प्राप्त शेतक-यांचा सत्कार
मेळाव्या प्रसंगी विद्यापीठाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सन 2012 मधील मराठवाडा विभागातील महाराष्ट्र शासन कृषि पुरस्कार
प्राप्त प्रगतशील शेतकरी बांधवाचा सत्कार करण्यात येणार आहे.
मेळाव्यास शेतकरी बांधवानी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
विस्तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री.
साहेबराव दिवेकर व मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. राकेश अहिरे यांनी केले
आहे.
Tuesday, May 13, 2014
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठामध्ये खरीप शेतकरी मेळावाचे आयोजन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या
४२ व्या वर्धापन दिनानिमित्त विस्तार शिक्षण संचालनालय, वनामकृवि, परभणी व महाराष्ट्र
शासनाचा कृषि विभाग यांच्या संयुक्त
विद्यमाने दि. १८ मे २०१४ रविवार रोजी सकाळी ११.०० वाजता विद्यापीठाच्या प्रशासकीय
इमारती जवळील नविन पद्व्युत्तर वसतीगृह मैदानावर खरीप शेतकरी मेळावा आयोजित करण्यात
आला आहे. या मेळाव्याचे उद् घाटन नवी
दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान संस्थेचे माजी संचालक तथा धारवाड कर्नाटक
येथील कृषि विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. डॉ. एस. ए. पाटील यांच्या हस्ते
होणार असुन विशेष अतिथी म्हणुन जालना येथील मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे विश्वस्त
मा. श्री. विजयअण्णा बोराडे हे उपस्थिती राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. वेंकटेश्वरलु राहणार
आहेत. या प्रसंगी विद्यापीठ शास्त्रज्ञ उपस्थित शेतक-यांना खरीप पीक
तंत्रज्ञानावर मार्गदर्शन करणार असुन कृषि प्रदर्शनीचेही आयोजन करण्यात आले आहे.
मेळाव्यास शेतकरी बंधुभगिनींनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विस्तार
शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. साहेबराव दिवेकर
व मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. राकेश अहिरे यांनी केले आहे.
Saturday, May 10, 2014
कसा करावा सोयाबीनच्या स्वत:च्या बियाण्याचा वापर
सोयाबीनची उगवणक्षमता तपासणी व
बीजप्रक्रिया
मागील हंगामातील सप्टेंबर व आक्टोबर
महिन्यात सोयाबीन पीक काढणीच्या काळात झालेल्या वादळी पाऊस व अतिवृष्टीमुळे
सोयाबीन बियाणे उत्पादन घटले असुन सोयाबीनच्या बियाण्याच्य गुणवत्तेवर मोठा
परिणाम झाला आहे. येत्या हंगामात सोयाबीन बियाणाची कमतरता पडण्याची दाट शक्यता
आहे. तथापी सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पीक असुन पेरलेल्या वाणाचे गुणधर्म व त्यापासुन
उत्पादीत सोयाबीन बियाणे यामध्ये अधिक तफावत आढळत नाही. सोयाबीन पीकाच्या
लागवडीमध्ये वापरण्यात येणारे बियाणे हे सरळ वाण असल्याने बियाणे प्रत्येक
वर्षी बदलण्याची गरज नसते. एकदा प्रमाणित बियाणे पेरल्यानंतर त्यापासुन उत्पादीत
बियाणे सतत तीन वर्षापर्यंत वापरता येते. यासाठी शेतक-यांनी विविध कंपनीचे बाजारात
विक्रीसाठी आलेले बियाण्याचा आग्रह न धरता स्वत:कडील बियाणे वापरावे. याच बरोबर
आपल्या घरचे बियाणे वापरल्यामुळे बियाणे खर्चात बचत करता येईल. यासाठी
शेतक-यांनी खरीप हंगामासाठी आपल्या शेतामध्ये गेल्यावर्षी प्रमाणित बियाण्यांपासुन
घेतलेल्या सोयाबीनच्या उत्पादनातुन स्वत:कडील बियाणे पेरणीसाठी वापरावे.
सोयाबीन पिकाच्या पेरणीसाठी प्रती हेक्टरी ७५ कि. ग्रॅ. बियाणे म्हणजेच एकरी ३०
कि. ग्रॅ. बियाणे लागते, याप्रमाणे आपल्या क्षेत्रानुसार बियाणे पेरणीपुर्वी
उपलब्ध करून स्वच्छ करून ठेवावे.
उगवणशक्ती तपासणी
सोयाबीन पिकाच्या बियाण्यात
अंकुर हे आवरणालगतच असुन ते अतिशय नाजुक असते. बाहेरून होणा-या आघातामुळे बियाण्यास
नुकसान होऊन त्याची उगवणक्षमता कमी होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे
सोयाबीनचे बियाणे असणारे पोते उंचीवरून फेकु नयेत किंवा बियाणे आपटणार नाही याची
काळजी घ्यावी. येत्या हंगामामध्ये आपण मागील वर्षी उत्पादीत घरचे बियाणे
वापरणार असल्यास त्याची उगवणक्षमता तपासणे आवश्यक आहे. याकरीता घरच्याघरी
उगवणशक्ती तपासता येते. यासाठी आपण जे सोयाबीन बियाणे म्हणुन वापरणार आहोत त्यातुन
काडीकचरा निवडुन बिया मोजुन घ्याव्यात. हे बियाणे ओले कापड किंवा रद्दीपेपरमध्ये
चार ते पाच दिवसांसाठी गुंडाळुन ठेवावे. बियाणे ठेवलेल्या कापडवरती किंवा पेपरवर १
ते २ दिवसाआड नियमितपणे पाणी हलके शिंपडावे. बियाणे उगवण्यासाठी सोयाबीन पीकात ४
ते ५ दिवस लागतात. पाच दिवसांनंतर बियाणे अंकूरलयास ठेवलेले कापड किंवा पेपर काढुन
त्यातील उगवण झालेल्या सोयाबीनच्या बियाण्यांची संख्या मोजावी. सोयाबीन
पिकासाठी उगवणशक्ती किमान ७० टक्के असावी. म्हणजेच अंकूरण्यासाठी टाकलेल्या १००
पैकी किमान ७० बियांची उगवण होणे आवश्यक आहे. घरचे बियाणे वापरताना अशा प्रकारे
उगवणक्षमता तपासणीतुन योग्य असलेले बियाणेच पेरणीसाठी वापरावे.
सोयाबीन बीजप्रक्रिया
कोणत्याही पिकासाठी बीजप्रक्रिया
प्रामुख्याने किड व रोगांचा प्रादुर्भाव कमी करणे व अन्नद्रव्यांची उपलब्धता
वाढविण्यासाठी केली जाते. सोयाबीन पिकांत बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी
करण्यासाठी बावीस्टीन 3 ग्रॅम किंवा थायरम 4.5 ग्रॅम प्रती कि. ग्रॅ. बियाणे
याप्रमाणे बियाण्यास हलक्या हाताने चोळावे.
अन्नद्रव्यांची उपलब्धता
वाढविण्यासाठी नत्र स्थिरीकरण करणारे रायझोबीयम व स्फुरद विद्राव्य करणारे
पीएसबी या जीवाणुसंवर्धकांची बीजप्रक्रिया करावी. जीवाणुसंवर्धकांची बीजप्रक्रिया
करण्यासाठी रायझोबीयम जापोनिकम व पीएसबी हे जीवाणूसंवर्धके प्रती १० कि. ग्रॅ.
बियाण्यास २५० ग्रॅम याप्रमाणात वापरावे. सदरील प्रक्रिया करण्यासाठी गुळाचे पाण्यात
द्रावण तयार करावे. याकरीता एक लिटर गरम पाण्यासाठी साधारणत: २५० ग्रॅम गुळ टाकुन
चिकट द्रावण तयार करावे जेणे करून यामाध्यमामूळे जिवाणु संवर्धक बियाण्यावर
चिकटेल. गुळाचे द्रावण तयार झाल्यानंतर बियाणे पोत्यावर सावलीत पातळ थरामध्ये
पसरवुन त्यावर गुळाचे द्रावण हलके शिंपडावे व नंतर रायझोबीयम जपोनिकम व पीएसबी हे
जिवाणु संवर्धन २५० ग्रॅम प्रती १० किलो बियाण्यास याप्रमाणात शिंपडुन हलक्या
हाताने चोळुन बियाणे सावलीत वाळवावे. बुरशीनाशक व जीवाणु संवर्धके या दोन्हींची
बीजप्रक्रीया करतांना बुरशीनाशकांची प्रक्रिया अगोदर करून जीवाणु संवर्धकाची
बीजप्रक्रिया करावी. अशाप्रकारे बीजप्रक्रीया पेरणीच्या पुर्वी तीन ते चार तास
अगोदर करावी.
सौजन्य
डॉ. आनंद गोरे
व्यवस्थापक
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठ, परभणी
मोबाईल क्र ७५८८०८२८७४
Monday, May 5, 2014
जागतिक कामगार दिनानिमित्त गृहविज्ञान महाविद्यालयातील कामगारांचा गौरव
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्या गृहविज्ञान महाविद्यालयात दिनांक १ मे
रोजी महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर जागतिक कामगार दिनानिमित्त महाविद्यालयातील सहा कामगारांना त्यांनी त्यांचे सेवेमध्ये शिस्तीचे
पालन करून कार्यालयामध्ये उत्कृष्ठ काम केल्याबद्दल सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्या
प्रा. विशाला पटणम यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.