Pages

Tuesday, May 13, 2014

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठामध्‍ये खरीप शेतकरी मेळावाचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या ४२ व्‍या वर्धापन दिनानिमित्‍त विस्‍तार शिक्षण संचालनालय, वनामकृवि, परभणी व महा‍राष्‍ट्र शासनाचा कृषि विभाग यांच्‍या  संयुक्‍त विद्यमाने दि. १८ मे २०१४ रविवार रोजी सकाळी ११.०० वाजता विद्यापीठाच्‍या प्रशासकीय इमारती जवळील नविन पद्व्‍युत्‍तर वसतीगृह मैदानावर खरीप शेतकरी मेळावा आयोजित करण्‍यात आला आहे. या मेळाव्‍याचे उद् घाटन नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि अनुसंधान संस्‍थेचे माजी संचालक तथा धारवाड कर्नाटक येथील कृषि विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. डॉ. एस. ए. पाटील यांच्‍या हस्‍ते होणार असुन विशेष अतिथी म्‍हणुन जालना येथील मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे विश्‍वस्‍त मा. श्री. विजयअण्‍णा बोराडे हे उपस्थिती राहणार आहेत. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. वेंकटेश्‍वरलु राहणार आहेत. या प्रसंगी विद्यापीठ शास्‍त्रज्ञ उपस्थित शेतक-यांना खरीप पीक तंत्रज्ञानावर मार्गदर्शन करणार असुन कृषि प्रदर्शनीचेही आयोजन करण्‍यात आले आहे. मेळाव्‍यास शेतकरी बंधुभगिनींनी मोठया संख्‍येने उपस्थित राहण्‍याचे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. साहेबराव दिवेकर व मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ. राकेश अहिरे यांनी केले आहे.