Pages

Monday, June 30, 2014

स्‍व. वसंतराव नाईक - हरितक्रांतीचा दूत ................. डॉ. अशोक ढवण

हरित क्रांतीचे प्रणेते स्‍व वसंतराव नाईक यांचा जन्‍मदिन  1 जुलै रोजी संपुर्ण राज्‍यात 'कृषि दिन' म्‍हणुन साजरा केला जातो, त्‍या निमित्‍याने वनामकृविचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ.अशोक ढवण यांनी लिहीलेला लेख

डॉ. अशोक ढवण




Sunday, June 29, 2014

बाभळगावच्या शेतक-यांनी साधला ऑडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातुन कृषि विद्यापीठाशी संवाद

बाभळगावचे शेतकरी बाधव ऑडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातुन कृषि विद्यापीठाच्‍या शास्‍त्रज्ञांशी संवाद साधतांना 

परभणी तालुक्‍यातील मौजे बाभळगाव येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठामार्फत कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या मार्गदर्शनानुसार हवामान बदलानुरूप राष्‍ट्रीय कृषि उपक्रम राबविण्‍यात येत असुन विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतक-यांच्‍या शेतापर्यंत पोहचविण्‍याचे कार्य होत आहे. कोरडवाहु शेतीच्‍या तंत्रज्ञानावर आधारित विविध पीक प्रात्‍यक्षिके गावात राबविण्‍यात आले असुन कोरडवाहू तंत्रज्ञानाचा मोठा प्रसार व प्रचार होण्‍यास मदत झाली आहे. नुकतेच विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी बाभळगांव येथील दिलेल्‍या भेटी दरम्‍यान शेतक-यांना ऑडीओ कॉनफरन्सिंगच्‍या माध्‍यमातुन विद्यापीठाशी जोडावे असे सुचित केले होते. विद्यापीठ तंत्रज्ञानाचा लाभ केवळ लाभार्थी शेतक-यांनाच नव्‍हे तर संपुर्ण गावातील शेतक-यांना व्‍हावा यादृष्‍टीने बाभळगांव येथे दि 21 जुन रोजी खरीप पुर्व शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. या मेळावात कोरडवाहु शेती संशोधन केंद्रातर्फे डॉ एस बी चौलवार यांच्‍या मार्गदर्शनाखाली बाभळगांव येथील शेतक-यांसाठी कृषि विद्यापीठ व रिलायन्‍स फांऊडेशन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने ऑडीओ कॉन्‍फरन्सिंगचे आयोजन करण्‍यात आले होते. या कार्यक्रमात परभणी येथुन कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातुन वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ आनंद गोरे यांनी बाभळगांव येथील शेतक-यांना खरिप पिकांचे लागवड तंत्रज्ञान व कोरडवाहु शेती तंत्रज्ञान यावर मार्गदर्शन केले. तसेच शेतकरी बांधवानी विचारलेल्‍या विविध प्रश्‍नांना विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी उत्‍तरे दिली. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी शेतकरी श्री माऊली पारथे, रिलायन्‍स फाऊडेशनचे दिपक केकान, निलेश डंबारे, अमोल मोते यांनी परिश्रम घेतले. हा कार्यक्रम अतिशय उपयुक्‍त असल्‍याची प्रतिक्रीया ज्ञानोबा पारधे, विठ्ठल पारधे, गुलाब दळवे, विजय घोरपडे, कैलास धुमाळ, उत्‍तम दळवे, ज्ञानोबा दळवे यांनी व्‍यक्‍त केले. 

Saturday, June 28, 2014

कृषि दिनी “कृषि सांज वाहिनी” शेतक-यांच्‍या सेवेत

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा उपक्रम

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रामार्फत दर मंगळवारी सकाळी ते ११ या वेळेत कृषि माहिती वाहिनी ही सेवा शेतक-यांसाठी नियमित चालविली जाते. या सेवेतंर्गत ०२४५२-२२९००० या दुरध्‍वनी क्रमांकावर मोठया संख्‍येने शेतकरी शेतीबाबतच्‍या विविध शंकाचे निरासन करण्‍यासाठी विद्यापीठाच्‍या तज्ञांशी संपर्क साधत असतात. सदरिल सेवा सायंकाळीच्‍या वेळेत सुरू करण्‍याची मागणी शेतकरी बांधवांनी केली. तसेच विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यकंटेश्‍वरलु यांच्‍या संकल्‍पनेतुन व निर्देशानुसार तसेच विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण यांच्‍या मार्गदर्शनाखाली कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या माध्‍यमातुन कृषि माहिती वाहिनी ही दर मंगळवारी सकाळी ते ११  या वेळे शिवाय दि. जूलै २०१४ रोजी वसंतराव नाईक यांच्‍या जन्‍मदिनी व कृषि दिनाचे औचित्‍य साधुन दर मंगळवारी सायंकाळी ते या वेळेत शेतकरी बंधु-भगिनींसाठी चालविण्‍यात येणार आहे. यावेळेत विद्यापीठाचे विविध विषयातील तज्ञ शेतक-यांचे प्रश्‍न, समस्‍या सोडविण्‍यासाठी व तंत्रज्ञान प्रसारासाठी उपलब्‍ध असणार आहेत. या वाहिनीचे काम कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्‍यवस्‍थापक डॉ. आनंद गोरे व त्‍यांचे सहकारी श्री. डी.डी. पटाईत व श्री. एस. बी. जाधव हे पाहणार असुन विद्यापीठातील विविध विषयतज्ञ त्‍यांना सहकार्य करणार आहेत. यासाठी माध्‍यम मार्गदर्शक म्‍हणुन पुणे येथील अॅग्रोवनचे वरिष्‍ठ उपसंपादक श्री. मंदार मुंडले सहकार्य करणार आहेत.
या प्रकाराची कृषि सांज वाहिनी सुरू करणारे कदाजीत देशातील पहिले कृषि विद्यापीठ असावे. या वाहिनी मुळे शेतकरी बाधव आपली शेतीची कामे आटोपुन गावात एकत्र बसुन सायंकाळाच्‍या वेळी वाहिनीवर प्रश्‍न विचारू शकतील. तरी या वाहिनीचा लाभ अधिकाधिक शेतकरी बांधवांनी घ्‍यावा असे आवाहन केंद्र प्रमुख डॉ आनंद गोरे यांनी केले आहे.
विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ डॉ. पी एन सत्‍वधर, प्रा. दिलीप मोरे, पशुसंवर्धन व दुग्‍धशास्‍त्राचे डॉ. ए. टी. शिंदे, कोरडवाहु संशोधन केंद्राचे डॉ एस बी चौलवार, किटकशास्त्रज्ञ डॉ. आनंद बडगुजर, डॉ दयानंद मोरे, डॉ पी बी केदार, वनस्‍पती विकृ‍ती शास्त्रज्ञ डॉ जी पी जगताप, डॉ एस एल बडगुजर, कृषि अभियांत्रिकी विभागाचे प्रा एस डी पायाल, प्रा डी डी टेकाळे, उद्यानविद्या शास्‍त्रज्ञ डॉ शिवाजी शिंदे, डॉ ए एम भोसले, मृदशास्‍त्रज्ञ प्रा यु एन कराड, कृषि विद्या विभागाचे प्रा पी के वाद्यमारे, प्रा सौ एस यु पवार, डॉ विशाल अवसरमल शेतक-यांना मार्गदर्शन करण्‍यासाठी निवडक दिवशी उपलब्‍ध असणार आहेत.
वाहिनीची संकल्‍पना कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांची असुन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांच्‍या मार्गदर्शनाखाली डॉ आनंद गोरे यांनी याचा नियोजन आराखडा तयार केला असुन शिक्षण संचालक डॉ विश्‍वास शिंदे, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, डॉ बी बी भोसले, डॉ डी एन गोखले, डॉ बी व्‍ही आसेवार, डॉ यु एम खोडके, प्रा विशाला पटनम, डॉ व्‍ही डी पाटील, डॉ जी एम वाघमारे, डॉ बी बी ठोंबरे, डॉ डी एन धुतराज, डॉ ए पी सुर्यवंशी, डॉ आर डी आहिरे यांचेही मार्गदर्शन लाभले आहे. ¦Ê®úÉÊ#

Friday, June 27, 2014

क्रॉपसॅप प्रकल्‍प कृषि क्षेत्रातील देशासाठी मार्गदर्शक प्रकल्‍प ......... कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

क्रॉपसॅप प्रकल्‍पांतर्गत दोन दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन
कृषि विभाग व वनामकृविचा किटकशास्‍त्र विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने क्रॉपसॅप प्रकल्‍पांतर्गत आयोजित दोन दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटनाप्रसंगी मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु, व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, परभणी जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. साहेबराव दिवेकर, लातुर जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. अशोक किरनाळी, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. बी. भोसले आदी.

क्रॉपसॅप प्रकल्‍पामुळे गेल्‍या चार-पाच वर्ष राज्‍यातील शेतक-यांना विविध पिकांतील कीड व रोगांचे व्‍यवस्‍थापन करतांना निश्चितच मोठा फायदा झाला असुन हा प्रकल्‍प महा‍राष्‍ट्र शासनाच्‍या कृषि विभाग व कृषि विद्यापीठे यांचा एक महत्‍वकांक्षी प्रकल्‍प राष्‍ट्रीय पातळीवर देशासाठी मार्गदर्शक ठरत आहे, असे प्रतिपादन वनामकृविचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले.
ते महाराष्‍ट्र शासनाचा कृषि विभाग व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कीटकशास्‍त्र विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने सोयाबीन, कापुस, तुर व हरभरा पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्‍ला (क्रॉपसॅपप्रकल्‍पांतर्गत दिनांक २७ व २८ जुन रोजी आयोजित दोन दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटना प्रसंगी बोलत होते. व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, परभणीचे जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. साहेबराव दिवेकर, लातुरचे जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. अशोक किरनाळी, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. बी. बी. भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, सदर प्रकल्‍पात राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठे, कृषि विभाग तसेच राष्‍ट्रीय स्‍तरावरील आठ संस्‍थाचा सुयोग्‍य सहभाग असलेला इतर राज्‍यांना अनुकरणीय प्रकल्‍प आहे. या प्रकल्‍पासाठी प्रती हेक्‍टरी केवळ सतरा रूपये खर्च करण्‍यात आला, पंरतु गेल्‍या चार-पाच वर्ष राज्‍यातील शेतक-यांना या प्रकल्‍पांतर्गत देण्‍यात आलेल्‍या योग्‍य सल्‍लामुळे विविध पिकांतील कीड व रोगाचे वेळीच नियंत्रण करण्‍यास मोठी मदत झाली आहे. यामुळे कृषि विभाग व कृषि विद्यापीठावरील शेतक-यांमध्‍ये विश्‍वासहर्ता वाढीस लागण्‍यास हातभार लाभला आहे. याधर्तीवर फळ व भाजीपाला पिकांसाठी हॉर्टीसॅप प्रकल्‍प राबविण्‍याचा राज्‍य शासनाचा मानस आहे. क्रॉपसॅप प्रकल्‍पात प्राप्‍त झालेल्‍या गेल्‍या चार-पाच वर्षातील आकडेवारीच्‍या आधारे हवामान अंदाजाप्रमाणे कीड-रोग पुर्व अनुमान यंत्रणा तयार करण्‍यात यावी म्‍हणजे भविष्‍यात शेतक-यांना अधिक फायदा होईल, असा सल्‍लाही त्‍यांनी यावेळी दिला.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविकात प्राचार्य डॉ. बी. बी. भोसले यांनी क्रॉपसॅप प्रकल्‍पाची माहिती देतांना सांगितले की, किड व रोगांचे सर्वेक्षकांकडुन ऑनलॉईन भरण्‍यात आलेल्‍या अहवालावर आधारीत माहितीचे विश्‍लेषण आठवडयातुन दोनदा कृषि विभागाच्‍या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध करून देण्‍यात येते, त्‍याची माहिती कृषि विभागातील कर्मचा-यांव्‍दारे तसेच एस.एम.एस. सेवा व प्रसारमाध्‍यमाव्‍दारे वेळोवेळी शेतक-यांना दिली जाते. शेतक-यांना कीड व रोगांची ओळख होण्‍यास मदत होत असुन विनाकारण अयोग्‍य किटकनाशक न वापरता योग्‍य किटकनाशके वापरण्‍याचा सल्‍ला वेळेवर दिला जातो आहे. या प्रकल्‍पांर्गत कृषि कर्मचा-यासाठी प्रत्‍यक्ष शेतावर कीड रोगांची ओळख होण्‍यात येणा-या अडचणी लक्षात घेऊन विद्यापीठाच्‍या किटकशास्‍त्र विभागाव्‍दारे दर्जेदार छायाचित्रे व उपयुक्‍त माहितीचा समावेश असलेली पुस्‍तके व घडीपत्रिका उपलब्‍ध करून दिल्‍या असुन प्रकल्‍पास राष्‍ट्रीय पातळीवरील सन 2012 चा ई-गर्व्‍हर्नस अवार्ड प्राप्‍त झाला आहे.
याप्रसंगी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण व परभणीचे जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. साहेबराव दिवेकर यांनीही मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. दयानंद मोरे यांनी तर आभार प्रदर्शन सेलु तालुका कृषि अधिकारी श्री. राम रोडगे यांनी केले. यावेळी कृषि विभागातील व विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी एस टी शिंदे, डॉ. श्रध्‍दा धुरगुडे, व्‍ही व्‍ही खोबे, एम.एस.भारती, टी.बी.धोपटे, कृषि विभागाचे आनंदराव आदींनी परिश्रम घेतले.
तांत्रिक सत्रात डॉ. के एस बेग, डॉ ए के गोरे, डॉ ए डी पांडागळे, डॉ पी आर झंवर, डॉ पवन ढोके, डॉ हरिहर कौसडीकर, डॉ डी जी हिंगोले, प्रा. बी. व्‍ही. भेदे, डॉ. ए. जी. बडगुजर आदी विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी मार्गदर्शन केले.  
कृषि विभाग व वनामकृविचा किटकशास्‍त्र विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने क्रॉपसॅप प्रकल्‍पांतर्गत आयोजित दोन दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटना प्रसंगी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु, शिक्षण संचालक डॉ. विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, परभणी जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. साहेबराव दिवेकर, लातुर जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. अशोक किरनाळी, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. बी. भोसले आदी.
मार्गदर्शन करतांना विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक करतांना कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. बी. बी. भोसले
मार्गदर्शन करतांना जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. साहेबराव दिवेकर
उपस्थित कृषि विभागचे व वनामकृविचे अधिकारी व कर्मचारी

Wednesday, June 25, 2014

कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांनी शेतक-यांची शेती समजुन घ्‍यावी ........डॉ. बी. बी. भोसले

यावर्षी ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत होणार पिक संरक्षण तंत्रज्ञानाचा प्रसार

कृषिदुत व कृषिकन्‍यांना मार्गदर्शन करतांना कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. बी. बी. भोसले

कृषिदुत व कृषिकन्‍यांना मार्गदर्शन करतांना ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाचे प्रभारी डॉ. राजेश कदम

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषि महावि‍द्यालयाच्‍या बी.एस्‍सी. (कृषि) पदवीच्‍या सातव्‍या सत्रात ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम (रावे) असतो. हा कार्यक्रम राबविण्‍यांसाठी कृषिदुत व कृषिकन्‍यांसाठी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन दि. २४ जुन रोजी कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. बी. बी. भोसले होते तर विविध विषयतज्ञ व्‍यासपीठावर उपस्थित होते.

या प्रसंगी कृषिदुत व कृषिकन्‍यांना मार्गदर्शन करतांना  प्राचार्य डॉ. बी. बी. भोसले म्‍हणाले की, ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम हा विद्यार्थ्‍यांनी तीन वर्षात पदवीपुर्व अभ्‍यासक्रमात शिकलेल्‍या ज्ञानचे मुल्‍यमापन कार्यक्रम असुन प्रत्‍यक्ष शेतक-यांचे जीवनमान अनुभवाची संधी आहे. अनेक शेतकरी हे आधुनिक शेती करून चांगले उत्‍पादन घेणारे असुन त्‍यांची शेती करण्‍याचे कसब तसेच ग्रामीण भागातील शेतक-यांच्‍या समस्‍या जवळुन अनुभवयास मिळणार आहे. या कार्यक्रमाचा शेतकरांना देखित फायदा असुन यावर्षी कृषिदुत व कृषिकन्‍यांनी पिक संरक्षण तंत्रज्ञानाचा प्रसार करण्‍यावर भर दयावा, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.

कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाचे प्रभारी डॉ. राजेश कदम ह्यांनी रावेबाबत सविस्‍तर माहिती दिली तसेच गेल्‍या चार वर्षात रावे अंतर्गत ६२४ कृषिदुतांनी व कृषिकन्‍यांनी ८० विविध गावांमध्‍ये कृषि तंत्रज्ञानाचा प्रसार केले असुन त्‍याचा निश्चितच शेतक-यांना त्‍याचा फायदा झाला असे त्‍यांनी नमुद केले. विस्‍तार शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख तथा सह समन्‍वयक डॉ. राकेश अहिरे यांनी विद्यार्थ्‍यांना ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम राबविण्‍याबाबतचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. राजेश कदम यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. प्रशांत. देशमुख यांनी केले.   तांत्रीक सत्रामध्‍ये विविध विषयतज्ञ डॉ. के. पी. आपेट, डॉ. हानवते डॉ. एस. जी. नरवाडे, प्रा. सौ. पवार, डॉ. शिवाजी शिंदे, प्रा. एस. एच. कांबळे, प्रा. मोहमद ईलीयास, डॉ. एल. एन. जावळे, प्रा. ए. एम. कांबळे व डॉ. पी. आर. देशमुख यांनी विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन केले. 

कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी विस्‍तार शिक्षण विभागातील डॉ. जे. व्‍ही. एकाळे, श्री सी. एस. नखाते, श्री विठ्ठल खताळ, श्री जी. के. जोशी आदींनी परिश्रम घेतले. तसेच यावेळी डॉ. ए.एस. कारले व कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. डब्‍ल्‍यु. देशमुख, डॉ. दयानंद मोरे, डॉ. ए.टी. शिंदे, प्रा. पवार, डॉ. प्रा. बडगुजर, डॉ. नागरगोजे, प्रा. कल्‍याणकर, डॉ. भोसले, प्रा. मंत्री डॉ. एकाळे आदी  उपस्थित होते. यावेळी कृषिदुत व कृषिकन्‍या मोठया संख्‍येने उपस्थित होते.

ग्रामीण भागातील शेतक-यांचे जीवनमान व त्‍यांचे कृषि क्षेत्रातील अनुभव याचा जवळून अभ्‍यास करण्‍यासाठी ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाचा पदवी अभ्‍यासक्रमात समाविष्‍ट करण्‍यात आलेला असुन  यावर्षी या कार्यक्रमात परभणी कृषि महाविद्यालयांच्‍या सातव्‍या सत्रातील २०० विद्यार्थीचा समावेश असून ते परभणी तालुक्‍यातील निवडलेल्‍या  २० गावामध्‍ये पुढील २० आठवडे जाउन त्‍यांनी पदवी अभ्‍यासक्रमात आत्‍मसात केलेले कृषीचे ज्ञान व कृषि विद्यापीठाने विकसीत केलेले नवीन तंत्रज्ञानाबाबत पाल्‍य शेतक-यांसोबत विचारांची देवाणघेवाण करणार आहेत. 

Thursday, June 19, 2014

वनामकृविच्या २७ शिफारशींना संयुक्त कृषि संशोधन व विकास समितीच्या बैठकीत मान्यता

महाराष्‍ट्रातील चारही कृषि विद्यापीठांनी केलेले संशोधन शेतक-यापर्यंत पोहोचविण्‍यासाठी महत्‍वाचा टप्‍पा  मानल्‍या जाणा-या संयुक्‍त कृषि संशोधन व विकास समितीची ४२ वी बैठक दापोली (जि. रत्‍ना‍गिरी) येथील  डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे १२ ते १४ मे या कालावधीत संपन्‍न झाली. तीन दिवस झालेल्‍या शास्‍त्रज्ञांच्‍या या संशोधन समिती बैठकीत राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठांच्‍या विविध शिफारशींना मान्‍यता देण्‍यात आली. वसंतराव नाईक  मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या एकुण २७ शिफारशींना मान्‍यता देण्‍यात आली असुन यात २ वाण, ३ शेती यंत्रे व औजारे व २२ इतर तंत्रज्ञान शिफारशींचा समावेश आहे.
करडईचा पीबीएनएस-८६ (पुर्णा) वाणास मान्‍यता
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने विकसित केल्‍या करडईचा पीबीएनएस-८६ (पुर्णा) वाणाची बागायती व कोरडवाहू लागवडीसाठी मराठवाडा विभागासाठी प्रसारित करण्‍याची शिफारस करण्‍यात आली. हा वाण पीबीएनएस-१२ व शारदा या तुल्‍यबळ वाणांपेक्षा बागायतीसाठी व कोरडवाहू लागवडीसाठी दाण्‍यांच्‍या उत्‍पादनात अधिक सरस आढळून आला असुन या वाणामध्‍ये ३०.१३ टक्‍के तेलाचे प्रमाण असून हा वाण मररोग व पानावरील ठिपके (अल्‍टरनेरिया) रोगास तसेच मावा किडीस सहनशील आहे.
सिताफळाचा धारूर-6 वाणास मान्‍यता
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने विकसित केल्‍याला सिताफळाचा धारुर-6 वाणाची महाराष्‍ट्रात लागवडीसाठी प्रसारित करण्‍याची शिफारस करण्‍यात आली. या वाणाची फळे आकारांनी मोठी असून गराचे प्रमाण चांगले (गराचे वजन १८०.३४ ग्रॅम) आहे. हा वाण फळाचे अधिक उत्‍पादन देणारे असुन एकूण विद्राव्‍य घटकांचे प्रमाण चांगले  (२४.४९ डिग्री ब्रिक्‍स) असुन एकुण साखरेचे प्रमाण २०.१२ टक्‍के असल्‍याचे आढळून आले आहे.

तसेच विद्यापीठाने विकसित केलेले तीन कृषि यंत्रे व औजारांमध्‍ये बैलचलित धसकटे गोळा करण्‍याचे अवजार, बैलगाडी व वखर जु, सौरचलित फवारणी यंत्राच्‍या शिफारशींना मान्‍यता देण्‍यात आली. याव्‍यतिरिक्‍त कृषि अभियांत्रिकीच्‍या सात शिफारशी, कृषिविद्याच्‍या चार, पीक संरक्षणाची एक, अन्‍न तंत्रज्ञानाच्‍या तीन, मृद विज्ञानाच्‍या दोन, गृहविज्ञानच्‍या तीन तर कृषि अर्थशास्‍त्राच्‍या दोन अशा एकुण २२ तंत्रज्ञान शिफारशींना मान्‍यता देण्‍यात आली.

सौजन्‍य - संशोधन संचालनालय, वनामकृवि, परभणी

मान्‍य झालेल्‍या इतर शिफारशी पाहाण्‍याकरिता Read More वर क्लिक करा

Tuesday, June 10, 2014

वनामकृविचा मदतीचा हात


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या कृषिविद्या विभागात पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमाच्‍या दुस-या सत्राचा विद्यार्थी प्रविण प्र‍भाकरराव गायकवाड हा दिनांक १३ मे रोजी विद्यापीठाच्‍या व्‍यायामशाळेत व्‍यायाम करीत असतांना डोक्‍यावर पडुन गंभीर जखमी झाला होता. या अपघातानंतर त्‍यास उपचारासाठी खाजगी रूग्‍णालयात उपचार करून अकोला ये‍थील नोबेल हॉस्‍पीटल मध्‍ये हलविण्‍यात आले होते. प्रविण हा शिरपुर जैन ता. मालेगांव येथील अल्‍पभुधारक शेतकरी कुटुंबातील होतकरू विद्यार्थ्‍यी असुन त्‍याच्‍या उपचारासाठी मोठा खर्च येणार आहे. त्‍याच्‍या उपचा-यासाठी मदतीचा हात म्‍हणुन वनामकृवितील विद्यार्थीवर्ग, प्राध्‍यापकवृंद व कर्मचारीवर्ग सर्वांनी मिळुन निधी जमा केला. दि. ९ जुन रोजी जमा झालेला निधी एकुण रक्‍कम रू. ७८,०७५/- हा प्रविण गायकवाड यांचे चुलते श्री. पुरूषोत्‍तम गायकवाड यांना विद्यापीठाचे कुलगूरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते देण्‍यात आला. त्‍यावेळी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, जिमखाना अध्‍यक्ष तथा कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. बी. भोसले, जिमखानाचे सचिव डॉ. डी. आर. कदम तसेच विद्यार्थी प्रतिनिधी कल्‍पेश शिंदे, किशोर चव्‍हाण, पांडुरंग पावडे, महेश मुकदम, बद्रीना‍थ वैद्य आदी उपस्थित होते.

Sunday, June 8, 2014

अफगाणी विद्यार्थ्‍यांना पदवी प्रदान


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत कृषि महाविद्यालयातुन पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रम पुर्ण केलेल्‍या तीन अफगाणी विद्यार्थ्‍यांना दि. ८ जुन रोजी विद्यापीठाचे कुलगूरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते तात्‍पुरते पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्‍यात आले. यावेळी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ. बी. बी. भोसले, विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब ठोंबरे, आंतरराष्‍ट्रीय वसतीगृह अधिक्षक प्रा. रणजीत चव्‍हाण व जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रविण कापसे उपस्थित होते. रफीउल्‍हा फजल हक, हक्‍कीम मुल्‍ला अजिजी व अब्‍दुल्‍ला अजिज हकीमीय हे तीन अ‍फगाणी विद्यार्थ्‍यी असुन रफीउल्‍हा फजल हक यांनी डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांच्‍या मार्गदर्शनाखाली पशुसंवर्धन व दुग्‍धव्‍यवसाय विभागातुन तर हक्‍कीम मुल्‍ला अजिजी व अब्‍दुल्‍ला अजिज हकीमीय यांनी अनुक्रमे डॉ. बी. व्‍ही. आसेवार व डॉ. डी. एन. गोखले यांच्‍या मार्गदर्शनाखाली कृषिविद्या विभागातुन संशोधन करून पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रम पुर्ण केला. कृषि विद्यापीठातुन प्राप्‍त केलेल्‍या ज्ञानाचा शिक्षणाच्‍या व संशोधनाच्‍या माध्‍यमातुन अफगाणीस्‍थानातील कृषि विकासात योगदान देण्‍याचा सल्‍ला कुलगूरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू यांनी याप्रसंगी विद्यार्थ्‍यांना दिला. तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील शैक्षणीक कालावधीत उच्‍च दर्जोचे शैक्षणिक व संशोधनाची संधी प्राप्‍त झाल्‍याची भावना अफगाणी विद्यार्थ्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केली. 

Sunday, June 1, 2014

वनामकृविचे कुलसचिव श्री. का. वि. पागीरे सेवानिवृत्‍त


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलसचिव श्री. का. वि. पागीरे दि. 3१ मे रोजी सेवानिवृत्‍त झाले, त्‍यानिमित्‍य विद्यापीठाच्‍या वतीने निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजीत केला होता. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विद्यापीठाचे कुलगूरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु होते, तर व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, नियंत्रक श्री. अप्‍पासाहेब चाटे व विद्यापीठ अभियंता श्री. अब्‍दुल रहिम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्‍यक्षीय भाषणात कुलगूरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, श्री. का. वि. पागीरे हे एक अष्‍टपैलु व्‍यक्‍तीमत्‍व असुन सर्वांना सोबत घेऊन काम करणारा व्‍यक्‍ती अशी त्‍यांची प्रतिमा आहे. त्‍यांच्‍या सकारात्‍मक दृष्टिकोनामुळे विद्यापीठातील त्‍यांच्‍या दिड वर्षाच्‍या सेवाकाळात विद्यापीठ अडजणीच्‍या प्रसंगी कुलसचिव या नात्‍याने त्‍यांनी योग्‍य निर्णय घेतले. विद्यापीठातील रिक्‍त पदे, जमिनीवरील अतिक्रमण, प्रकल्‍पग्रस्‍तांचा प्रश्‍न, प्रशासकीय प्रश्‍न आदी अनेक समस्‍या विद्यापीठासमोर असुन विद्यापीठास सक्षम कुल‍सचिवांची निश्चितच उणीव भासेल, अशी प्रतिक्रीया त्‍यांनी व्‍यक्‍त केली.
सत्‍काराला उत्‍तर देतांना कुल‍सचिव श्री. का. वि. पागीरे म्‍हणाले की, शासकीय सेवेत कार्य करतांना समाजाला आपण काय देतो हे महत्‍वाचे असुन सकारात्‍मक दृष्टिकोन व कठोर परिश्रमाच्या आधारे नौकरी कालावधीत चांगले योगदान देता आले. विद्यापीठाच्‍या सेवेत असतांना विद्यापीठातील विविध पदांची बिंदुनामावली व सेवा जेष्‍ठता यादीचे अद्यावतीकरण हे महत्‍वाचे कार्य करू शकलो.
श्री. का. वि. पागिरे यांनी अहमदनगर येथे विस्‍तार अधिकारी या पदावर शासकीय सेवेची सुरूवात करून गट विकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, तंत्र अधिकारी, कृषि उपसंचालक, उपविभगीय कृषि अधिकारी आदी या विविध पदावर कार्य केले. शासकीय सेवेत त्‍यांनी ३५ वर्षे कार्य केले असुन पुणे येथील कृषि आयुक्‍तालयात कार्यरत असतांना राज्‍यस्‍तरीय कृषि क्षेत्राची तांत्रिक माहिती संकलीत करण्‍याच्‍या कार्यात त्‍यांनी मोलाचे योगदान दिले­­­.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक सहायक कुलसचिव श्री. व्‍ही एन नागुला यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. आशा आर्या यांनी केले तर आभार प्रदर्शन सहायक नियंत्रक श्री जी यु उबाळे यांनी केले. याप्रसंगी विविध महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य, प्राध्‍यापकवृंद व कर्मचारीवर्ग मोठया संख्‍येने उपस्थित होते.

विस्तार शिक्षण विभागाचे प्रा. अण्णासाहेब रामराव वैद्य सेवानिवृत्त

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालयातील विस्‍तार शिक्षण विभागाचे सहाय्यक प्राध्‍यापक प्रा. अण्‍णासाहेब रामराव वैद्य दिनांक ३१ मे रोजी सेवानिवृत झाले. प्रा. वैद्य यांनी विद्यापीठ सेवेत वरिष्‍ट संशोधन सहायक म्‍हणुन परभणी येथे सुरूवात करून ग्राम सेवक प्रशिक्षण केंद्र, जालना, कृषि संशोधन केंद्र, बदनापुर तसेच बाजरा संशोधन केंद्र, वैजापुर, कृषि महाविद्यालय, उस्‍मानाबाद तसेच कृषि विज्ञान केंद्र, औरंगाबाद आदी ठिकाणी विविध पदावर कार्य केले. प्रा. वैद्य विद्यापीठाच्‍या सेवेचे 33 वर्षे पुर्ण केले.त्‍यानिमित्‍त त्‍यांना विस्‍तार शिक्षण विभागाच्‍या वतीने निरोप देण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विभाग प्रमुख डॉ. राकेश अहिरे होते तर विभागातील डॉ. पी. आर. देशमुख, डॉ. जयश्री एकाळे, डॉ राजेश कदम, डॉ. प्रविण कापसे, श्री. सोनवणे, श्री. जोशी, श्री खताळ आदी उपस्थित होते.