बाभळगावचे शेतकरी बाधव ऑडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातुन कृषि विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांशी संवाद साधतांना |
परभणी तालुक्यातील मौजे बाभळगाव येथे
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठामार्फत कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु
यांच्या मार्गदर्शनानुसार हवामान बदलानुरूप राष्ट्रीय कृषि उपक्रम राबविण्यात
येत असुन विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतक-यांच्या शेतापर्यंत पोहचविण्याचे कार्य
होत आहे. कोरडवाहु शेतीच्या तंत्रज्ञानावर आधारित विविध पीक प्रात्यक्षिके गावात
राबविण्यात आले असुन कोरडवाहू तंत्रज्ञानाचा मोठा प्रसार व प्रचार होण्यास मदत
झाली आहे. नुकतेच विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु यांनी
बाभळगांव येथील दिलेल्या भेटी दरम्यान शेतक-यांना ऑडीओ कॉनफरन्सिंगच्या माध्यमातुन
विद्यापीठाशी जोडावे असे सुचित केले होते. विद्यापीठ तंत्रज्ञानाचा लाभ केवळ
लाभार्थी शेतक-यांनाच नव्हे तर संपुर्ण गावातील शेतक-यांना व्हावा यादृष्टीने
बाभळगांव येथे दि 21 जुन
रोजी खरीप पुर्व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळावात कोरडवाहु
शेती संशोधन केंद्रातर्फे डॉ एस बी चौलवार यांच्या मार्गदर्शनाखाली बाभळगांव
येथील शेतक-यांसाठी कृषि विद्यापीठ व रिलायन्स फांऊडेशन यांच्या संयुक्त
विद्यमाने ऑडीओ कॉन्फरन्सिंगचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात परभणी
येथुन कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातुन वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ आनंद गोरे यांनी
बाभळगांव येथील शेतक-यांना खरिप पिकांचे लागवड तंत्रज्ञान व कोरडवाहु शेती
तंत्रज्ञान यावर मार्गदर्शन केले. तसेच शेतकरी बांधवानी विचारलेल्या विविध प्रश्नांना
विद्यापीठ शास्त्रज्ञांनी उत्तरे दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शेतकरी श्री
माऊली पारथे, रिलायन्स
फाऊडेशनचे दिपक केकान, निलेश
डंबारे, अमोल मोते यांनी परिश्रम
घेतले. हा कार्यक्रम अतिशय उपयुक्त असल्याची प्रतिक्रीया ज्ञानोबा पारधे, विठ्ठल पारधे, गुलाब दळवे, विजय घोरपडे, कैलास धुमाळ, उत्तम दळवे, ज्ञानोबा दळवे यांनी व्यक्त
केले.