Pages

Tuesday, July 22, 2014

कृषि अभियांत्रिकी महाविदयालयात गुणगौरव व निरोप समारंभ संपन्‍न

कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविदयालयाच्या निरोप समारंभात प्रसंगी प्रभारी शिक्षक संचालक डॉ. बी. बी. भोसलेव्‍यासपीठावर गोळेगाव कृषि महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. व्हि. डी. पाटीलप्राचार्य डॉ. यु. एम. खोडकेप्रा.व्हि.एम.भोसलेअनंता हांडे आदी.
कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविदयालयाच्या निरोप समारंभात मार्गदर्शन करतांना प्रभारी शिक्षक संचालक डॉ. बी. बी. भोसलेव्‍यासपीठावर गोळेगाव कृषि महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. व्हि. डी. पाटील, प्राचार्य डॉ. यु. एम. खोडकेप्रा.व्हि.एम.भोसलेअनंता हांडे आदी.
**************************************************************
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यपीठातंर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविदयालयाच्या सन २०१३-१४ वर्षात बी. टेक. (कृषि अभियांत्रिकी) पदवी प्राप्‍त केलेल्‍या विदयार्थ्‍यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम दि १० जुलै २०१४ रोजी आयोजित करण्‍यात आला होत. कार्यक्रमास विदयापीठाचे प्रभारी शिक्षक संचालक व अधिष्‍ठाता (कृषि) डॉ. बी. बी. भोसले, गोळेगाव कृषि महाविदयालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. व्हि. डी. पाटील प्रमुख पाहूणे म्‍हणुन उपस्थित होते तर महाविदयालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. यु. एम. खोडके अध्‍यक्षस्‍थानी होते.
      यावेळी प्रभारी शिक्षक संचालक डॉ. बी बी भोसले विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन करतांनी म्‍हणाले की, आज शेतीचे मोठया प्रमाणावर यांत्रिकीकरण होत असुन कृषि अभियतांची शेतक-यांना मोठी गरज आहे. कृषि अभियांत्रिकी विद्यार्थ्‍यांनी शेतक-यांना केंद्रबिंदु मानुन कार्य करावे.
प्राचार्य डॉ. व्हि. डी. पाटील आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, कृषि अभियांत्रिकी विदयार्थ्‍यानी पदवी अभ्‍यासक्रमात संपादन केलेल्‍या ज्ञानाचा उपयोग कृषि क्षेत्रामध्‍ये कौशल्‍याने करावा. याप्रसंगी त्‍यांनी महाविद्यालयातील विद्यार्थींनीनीच्‍या यशाचे विशेष कौतुक केले.
अध्‍यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. यु एम खोडके म्‍हणाले की, सद्य परिस्‍थीतीत कृषि विकासात कृषि अभियंत्‍यांचे योगदान अत्‍यंत महत्‍वाचे असुन कृषि अभियांत्रिकी महाविदयालय प्‍लेसमेंट व समुपदेशन आदी विविध योजना राबवुन विदयार्थ्‍यासाठी चांगल्‍या संधी उपलब्‍ध करण्‍याचा प्रयत्‍न करील.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक जिमखाना उपाध्‍यक्ष प्रा.व्हि.एम.भोसले यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विदयार्थी प्रतिनिधी रघुनाथ जगताप यांनी तर आभार प्रदर्शन विदयार्थी कृषि समितीचे अध्‍यक्ष अनंता हांडे यांनी केले.
कार्यक्रमात कृषि अभियांत्रिकी महाविदयालयास व विदयापीठास देश व राज्‍य क्रिडा, सांस्‍कृतिक व शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात विशेष यश संपादन करून दिल्‍याबददल विदयार्थ्‍याचा सत्‍कार करण्‍यात आला. यामध्‍ये देशपातळीवर भारतीय कृषि अनुसंधान परिषदेची कनिष्‍ठ संशोधन फेलोशिप प्राप्‍त विदयार्थ्‍यांचा समावेश होता. कार्यक्रमात महाविदयालयातील पदवी प्राप्‍त केलेल्‍या विदयार्थ्‍यांनी आपल्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या. कार्यक्रमास महाविद्यालयातील विभागप्रमुख, प्राध्‍यापक, अधिकारी, कर्मचारी व विदयार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.