Pages

Saturday, August 16, 2014

विद्यापीठ परिसर पॉलिथीनमुक्त करण्याचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांचे रासेयोच्या स्‍वयंसेवकांना आवाहन

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या वतीने भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औजित्‍यासाधुन परिसर स्वच्छता व गाजरगवत निर्मुलन अभियान दि. १५ ऑगस्त २०१४ रोजी घेण्‍यात आले. या अभियानाचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले, याप्रसंगी शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता (कृषि) डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ डी ए  जाधव, परभणी कृषि म‍‍हाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन गोखले, गोळेगांव, कृषि म‍‍हाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विलास पाटील, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ. महेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. 
राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या स्‍वयंसेवकांना मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, गाजरगवत व पॉलिथीन पर्यावरणास व जनावरांच्‍या आरोग्‍याला हानीकारक असुन यामुळे गंभीर समस्या निर्माण होत आहेत, यासाठी वर्षभर विद्यापीठ परिसर पॉलिथीनमुक्त ठेवण्यासाठी स्‍वयंसेवक व स्‍वयंसेविका यांनी कार्य करावे.
याप्रसंगी शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ. अशोक ढवण म्‍हणाले की, राष्‍ट्रीय सेवा योजनेअंतर्गत राबविण्‍यात येणारे विविध कार्यक्रमामुळे विद्यार्थ्‍यामध्‍ये समाजाप्रती असलेली बांधीलकीची जाणीव होते. यात विद्यार्थ्‍यांनी सक्रिय सहभाग घ्‍यावा.
कार्यक्रम यशस्वितेसाठी राष्‍ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. ए.एम.कांबळे व प्रा. व्हि. बी. जाधव यांच्‍या नेतृत्‍वाखाली स्‍वयंसेवक व स्‍वयंसेविका यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यापीठातील विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.