Pages

Monday, August 4, 2014

वनामकृविचे विस्‍तार शिक्षण संचालकपदी डॉ बी बी भोसले

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालक पदी डॉ बी बी भोसले यांची नियुक्‍ती विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले असुन दि १ ऑगस्‍ट रोजी डॉ अशोक ढवण यांच्‍या कडुन पदभार स्‍वीकारला आहे. डॉ बी बी भोसले हे किटकशास्‍त्रज्ञ म्‍हणुन शेतक-यांमध्‍ये प्रसिध्‍द असुन त्‍यांना विद्यापीठाच्‍या कृषि शिक्षण, संशोधन व विस्‍तार शिक्षण क्षेत्रातील विविध पदावर ३४ वर्षाचा अनुभव आहे. केंद्र शासनाचा ई-प्रशासन पुरस्‍कार प्राप्‍त महाराष्‍ट्र शासनाचा महत्‍त्‍वकांक्षी क्रॉपसॅप प्रकल्‍पाच्‍या राज्‍यस्‍तरीय सुकाणू समितीचे ते प्रमुख सदस्‍य असून मराठवाडा विभागीय पातळीवरील सुकाणू समितीचे अध्‍यक्ष  आहेत. अखिल भारतीय स्‍तरावरील कापुस तंत्रज्ञान मिशन प्रकल्‍पाचे मुख्‍य समन्‍वयक म्‍हणुन सध्‍या ते कार्यरत आहेत. त्‍यांच्‍या मार्गदर्शनाखाली संकलीत केल्‍या गेलेल्‍या विविध पिकांवरील किडकांच्‍या छायाचित्रणास बेंगलौर येथे झालेल्‍या चौथ्‍या आंतरराष्‍ट्रीय किटकशास्‍त्र कॉंग्रेस मध्‍ये २०१२ चा व २०११ मध्‍ये झालेल्‍या लुधीयाना येथील राष्‍ट्रीय किटकशास्‍त्र कॉंग्रेस मध्‍ये उत्‍कृष्‍ट छायाचित्रण म्‍हणुन सन्‍मानीत करण्‍यात आले आहे. त्‍यांची आजपर्यंत आंतरराष्‍ट्रीय व राष्‍ट्रीय पातळीवर ५० पेक्षा जास्‍त शोध निबंधे, २५० पेक्षा जास्‍त मराठी लेख व १४ पुस्‍तके प्रसिध्‍द केलेले असुन आकाशवाणीवर शंभर पेक्षा जास्‍त कार्यक्रम प्रसारीत झालेली आहेत. विद्यापीठात त्‍यांनी कृषि अधिकारी, सहायक प्राध्‍यापक, प्राध्‍यापक, विभाग प्रमुख, विद्यापीठाचे कुलसचिव तसेच लातुर येथील जैव तंत्रज्ञान महाविद्यालय व परभणी येथील कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य म्‍हणुन विविध पदावर कार्य केले आहे. त्‍यांचा नियुक्‍तीबद्ल विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी तसेच विविध स्‍तरातुन अधिकारी, कर्मचारी, शेतकरीवर्ग व‍ विद्यार्थ्‍यांनी त्‍यांचे अभिनंदन केले आहे.