Pages

Thursday, August 7, 2014

विद्यार्थ्‍यांचे यशच विद्यापीठाची खरी ओळख असते .............. कुलगूरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

वनामकृवित विद्यापीठ खेळाडुंचा गुणगौरव सोहळा संपन्‍न
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्‍या विद्यार्थी कल्‍याण अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने आयोजित विद्यापीठ खेळाडु, अधिकारी व कर्मचारी यांचा गुणगौरव सोहळाच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून बोलतांना कुलगूरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदी. 
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्‍या विद्यार्थी कल्‍याण अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने आयोजित विद्यापीठ खेळाडु, अधिकारी व कर्मचारी यांचा गुणगौरव सोहळाप्रसंगी कुलगूरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदी. 
***********************
परभणी : विद्यार्थ्‍यांनी अभ्‍याससोबतच खेळांना ही तितकेच महत्‍व दयावे, वि‍द्यार्थ्‍यांचे शैक्षणिक क्षेत्रातील व विविध स्‍पर्धेतील यशच विद्यापीठाची ओळख असते, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगूरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्‍या विद्यार्थी कल्‍याण अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने आयोजित विद्यापीठ खेळाडु, अधिकारी व कर्मचारी यांचा गुणगौरव सोहळा दि ६ ऑगस्‍ट रोजी संपन्‍न झाला, त्‍या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. या प्रसंगी व्‍यासपीठावर शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता (कृषि) डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख यांची उपस्थिती होती.
कुलगूरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, खेळांमुळे विद्यार्थ्‍याचा व्‍यक्‍तीमत्‍व विकास होऊन संघ भावना वाढीस लागते व स्‍पर्धेात्‍मकतेचा विकास होतो. विविध खेळ हे आरोग्‍य चांगले राहण्‍यास मदत करतात. भावी काळात विद्यापीठ विद्यार्थ्‍यांना खेळासाठी विविध अद्यावत सुविधा पुरविण्‍याचा प्रयत्‍न करील त्‍याचा विद्यार्थ्‍यांनी उपयोग करून राष्‍ट्रीय पातळीवर मोठे यश संपादन करतील, असे आशा त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केली.
शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता (कृषि) डॉ अशोक ढवण आपल्‍या मनोगतात म्‍हणाले की, विद्यापीठाचे वि‍द्यार्थ्‍यी विविध खेळ व सांस्‍कृतीक क्षेत्रात प्राविण्‍य मिळवीत आहेतच येणा-या काळात उत्‍तरोत्‍तर प्रगती होऊल.
कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख यांनी सन २०१६ मध्‍ये अश्‍वमेध क्रीडा स्‍पर्धा व २०१७ मधील इंद्रधनुष्‍य क्रीडा स्‍पर्धेचे आयोजन विद्यापीठात होणार असल्‍याची माहिती दिली. यावेळी सम्‍यका अंभोरे व राहुल कांबळे या विद्यार्थ्‍यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. सन २०१३-१४ मध्‍ये विविध क्रीडा व सांस्‍कृतिक स्‍पर्धेत प्राविण्‍य मिळविलेल्‍या विद्यार्थी व विद्यार्थीनीं तसेच विविध क्रीडा प्रकारातील संघ व्‍यवस्‍थापक, प्रशिक्षक व परिक्षक यांचा देखिल मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला.   
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ आशाताई देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. शाहू चौहान यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठांतर्गत असलेल्‍या मराठवाडा विभागातील संलग्‍न व घटक महाविद्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्‍यी-विद्यार्थ्‍यीनी व पालक मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी प्रा. डी एफ राठोड, प्रा. गणेश गुळभीले, यांच्‍यासह श्री जगताप, श्री सुयवंशी, श्री अन्‍वर यांनी परिश्रम घेतले.  
गुणगौरव सोहळयात सत्‍कार झालेले विद्यापीठ खेळाडू
जोहरट येथील आसाम कृषि विश्‍वविद्यालय येथे झालेल्‍या अखिल भारतीय आंतर कृषि विद्यापीठ क्रीडास्‍पर्धेत व्‍हॉलीबॉल मध्‍ये मुलींच्‍या गटास सुवर्ण पदक प्राप्‍त केले. या संघात सहभागी विद्यार्थ्‍यीनी संजिवनी बारंगुळे, अमिता कांबळे, शारदा चोपडे, अयोध्‍या गायकवाड, सविता दाभाडे, एस टी दासरवाड यांचा तसेच मैदानी स्‍पर्धेत कास्‍य पदक विजेता हटटा येथील कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थ्‍यी ए डी जाधव सत्‍कार करण्‍यात आला­. बेंगलोर येथील कृषि विज्ञान विश्‍वविद्यालयात झालेल्‍या अखिल भारतीय आंतर कृषि विद्यापीठ युवक महोत्‍सवात लोकनृत्‍यात रौप पदक प्राप्‍त केलेल्‍या संघातील सायली भडके, टी एस भोयर, निवेदीता परघने, श्रीदेवी स्‍वामी, देवयानी शिंदे, सम्‍यका अंभोरे, योगेश्‍वरी पवार, अंकीता डोंबे, शारदा चोपडे, संध्‍या बनसोडे यांचा सत्‍कार करण्‍यात आला तसेच कोल्‍हापुर येथे झालेल्‍या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ युवक महोत्‍सवात रांगोळी कला प्रकारात कास्‍य पदक व पोस्‍टर मेकींग मध्‍ये रजत पदक प्राप्‍त गृहविज्ञान महाविद्यालयाची एस डी गोडसलवार हीचा सत्‍कार करण्‍यात आला. संगीत विभागातील सुवर्ण पदक विजेता सिध्‍दीकांत देशमुख यांचा सत्‍कार मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. तसेच समुहगीत स्‍पर्धेत चतुर्थ क्रमांक प्राप्‍त केलेल्‍या संघातील विद्यार्थ्‍यी निवेदीता परघने, टी एस भोयर, सम्‍यका अंभोरे, प्रेरणा देशपांडे, सायली भडके, शारदा चोपडे यांचा तर वादविवाद स्‍पर्धेतील विद्यार्थ्यी वसीम पठाण यांचा सत्‍कार करण्‍यात आला. राष्‍ट्रीय सेवा योजनेतील उत्‍कृष्‍ठ स्‍वयंसेवक म्‍हणुन निवड झालेली विद्यार्थ्‍यींनी परभणी कृषि महाविद्यालयाची अनुराधा पाटेखेडे हीचा सत्‍कार करण्‍यात आला.