Pages

Thursday, October 2, 2014

एरंडेश्‍वर येथील कृषिकन्‍यांच्‍या शेतकरी मेळाव्‍यास मोठा प्रतिसाद

मार्गदर्शन करतांना कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन गोखले, व्‍यासपीठावर डॉ आर बी काळे, डॉ व्‍ही एन नारखेडे, डॉ एस एल बडगुजर, डॉ आर बी चांगुले, डॉ धीरज कदम आदी. 
परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या एकात्मिक शेती पध्‍दती केंद्रात कार्यरत ग्रामीण कृषि कार्यानुभवाच्‍या कृषिकन्‍यांनी एरंडेश्‍वर येथे शेतकरी मेळाव्‍याचे दिनांक ३० सप्‍टेबर रोजी आयोजन केले होते. या मेळाव्‍याच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एन गोखले होते तर डॉ आर बी काळे, प्रगतशील शेतकरी बालासाहेब काळे, डॉ व्‍ही एन नारखेडे, डॉ धीरज कदम, डॉ आर बी चांगुले, डॉ एस एल बडगुजर, डॉ जयश्री एकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
      अध्‍यक्षीय भाषणात मार्गदर्शन करतांना कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एन गोखले म्‍हणाले की, कृषि विद्यापीठाने संशोधनाच्‍या आधारे शेतक-यांना उपयुक्‍त अशी अनेक पीकांची वाणे व तंत्रज्ञान विकसित केले असुन त्‍याचा शेतक-यांनी अवलंब करावा. शेतक-यांनी नियमितपणे कृषि विद्यापीठाच्‍या संपर्कात राहावे, असा सल्‍ला त्‍यांनी दिला. किड व्‍यवस्‍थापनाबाबत डॉ धीरज कदम यांनी तर रोग व्‍यवस्‍थापनावर डॉ एस एल बडगुजर यांनी मार्गदर्शन केले तसेच एकात्मिक शेती पध्‍दतीवर डॉ व्‍ही एन नारखेडे यांनी तर शेतीतील अर्थशास्‍त्र यावर डॉ आर बी चांगुले व शेतीतील महिलांचा सहभाग यावर डॉ जयश्री एकाळे यांनी मार्गदर्शन केले.
      मेळाव्‍याचे प्रास्‍ताविक मुक्‍ता तांबे हीने केले तर सुत्रसंचालन प्रिया शेळके व ज्‍योती जळकुटे हीने केले तसेच आभार प्रदर्शन सुजाता काळदाते हीने केले. कार्याक्रमात कृषिकंन्‍यानी गेल्‍या तीन महिण्‍यात एरंडेश्‍वर येथे घेण्‍यात आलेल्‍या विविध प्रात्‍याक्षिकाच्‍या छायाचित्राच्‍या संकलीत भितीपत्रकाचे विमोचन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमास समन्‍वयक डॉ राकेश आहीरे व प्रभारी अधिकारी डॉ राजेश कदम यांच्‍या मार्गदर्शनाखाली घेण्‍यात येत आहेत.
      कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी कृषिकन्‍या सुषमा नान्‍नजकर, सुवर्णा पानझाडे, पुजा पवळ, राधा तिपटे, प्रियंका कदम, वनिता सस्‍ते, केतकी नवगिरे, दिपाली कांदे, जयश्री कदम, रोहिणी कदम, आश्विनी सिरसाठ, वैशाली खिल्‍लारे, सुप्रिया कदम, कोमल शिंदे, मनिषा भोईवार, मिनाक्षी डाळ, कविता आढे, प्रिती थोरात, सविता ढगे, कल्‍याणी दावणे, प्रियंका भारती, सोनिया खताळ, सत्‍वशीला लोणकर, सोनी वाघ, सुरेखा गरूड, दिपाली लंगोटे, योगिता साळुंके, आश्विनी गोट्टमवाड, शारदा वाघ, कोमल खिल्‍लारे, आश्विनी खिल्‍लारे, चैताली चव्‍हाण, प्रियंका रेंगे यांनी परिश्रम घेतले. मेळाव्‍यास गावातील शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थित होते.

मेळाव्‍यात कृषिकंन्‍यानी गेल्‍या तीन महिण्‍यात एरंडेश्‍वर येथे घेण्‍यात आलेल्‍या विविध प्रात्‍याक्षिकाच्‍या छायाचित्राच्‍या संकलीत भितीपत्रकाचे विमोचन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले त्‍याप्रसंगी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन गोखले, व्‍यासपीठावर डॉ आर बी काळे, डॉ व्‍ही एन नारखेडे, डॉ एस एल बडगुजर, डॉ आर बी चांगुले, डॉ धीरज कदम, डॉ जयश्री ऐकाळे आदी.