परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार
शिक्षण संचालनालय मार्फत राष्ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत रब्बी हंगाम २०१४ मध्ये
एकात्मिक पीक व्यवस्थापन तंत्रज्ञान प्रसार प्रकल्प संपूर्ण मराठवाडा विभागात
कुलगुरू मा डॉ बी व्यंकटेश्वरलु व विस्तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांच्या
मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. यात विभागातील आठही जिल्हयात हरभरा पिकात १६० एकर क्षेत्रावर
व रब्बी ज्वार पिकात २०० एकर क्षेत्रावर प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले
आहे. हा उपक्रम विद्यापीठाच्या विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्राच्या माध्यमातुन
व कृषि विभागाच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. प्रकल्पातंर्गत कृषि
तंत्रज्ञान माहिती केंद्रातर्फे हिंगोली जिल्हयातील धारखेडा येथे ४० प्रात्यक्षिके
देण्यात आली असुन यासाठी बियाणे, बीजप्रक्रियेसाठीचे बुरशीनाशके, जिवाणु
संवर्धने, मित्र बुरशी संवर्धने शेतक-यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्या
अनुषंगाने दि २२ ऑक्टोबर रोजी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्यंकटेश्वरलु
यांच्या हस्ते लाभार्थी शेतक-यांना हरभरा पिकाच्या आकाश व विजय या वाणांच्या
बियाण्याचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यापीठ निर्मित रायझोबीयम व पीएसबी जिवाणु
संवर्धके व ट्रायकोडर्मा मित्रबुरशीचे वाटप करण्यात आले. यावेळी कुलगुरू मा डॉ बी
व्यंकटेश्वरलु यांनी उपस्थित शेतकरी बांधवानी बीजप्रक्रिया करूनच रब्बी पिकांची
पेरणी करवी व उपलब्ध सिंचन कार्यक्षम पध्दतीने वापर करावा, जमिनीतील ओलावा दिर्घकाळ
टिकवुन ठेवण्यासाठी आंतरमशागत, मातीचे व इतर आच्छादनाचा वापर करण्याचा सल्ला
दिला. विस्तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी एकात्मिक किड व्यवस्थापनाबाबत
माहिती दिली तसेच सापळा पिके, पक्षी थांबे व जैविक किटकनाशकांचा वापर शेतक-यांनी करावा
असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी कुलसचिव डॉ डी एल जाधव, तंत्र अधिकारी डॉ के
व्ही देशमुख, विस्तार कृषिविद्यावेत्ता डॉ आनंद गोर, तालुका कृषि अधिकारी डॉ डी
बी काळे, शेतकरी अशोक क-हाळे, रामप्रसाद क-हाळे, शिवाजी क-हाळे हे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ आनंद गोरे, उदय वाईकर, अशोक पंडीत गणेश कटारे आदींनी
परिश्रम घेतले.
Public Relations Officer, Directorate of Extension Education, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani - 431 402 (M.S.) (Maharashtra) INDIA
Pages
▼
Saturday, October 25, 2014
Thursday, October 23, 2014
करडईच्या परभणी कुसुम वाणासह हरभरा व गहाच्या विविध वाणाचे बियाणे उपलब्ध
परभणी : रब्बी हंगामातील
गळीत धान्याचे पीक म्हणुन करडईला महत्व असुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने
करडईचे परभणी-१२ (परभणी कुसुम) हे वाण प्रसारित केला असुन या वाणाचे महाराष्ट्र,
कर्नाटक, आंध्रप्रदेश, छतीसगड, गुजरात या राज्यांतील शेतक-यांच्या पसंतीस उतरला
आहे. हा वाण मर व पानावरील ठिपके रोगास प्रतिकारक असुन मावा किडीस कमी बळी पडतो. गतवर्षी
कृषि विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर या वाणाच्या बीजोत्पादनाचा कार्यक्रम यशस्वीपणे
राबविण्यात आला असुन याही वर्षी राबविण्यात येत आहे. सद्य:स्थितीत या वाणाचे
बियाणे विद्यापीठाकडे मोठया प्रमाणावर उपलब्ध आहे. रब्बी हंगामातील लागवडीसाठी
हे वाण अत्यंत उपयुक्त असुन पुरेसा ओलावा असलेल्या जमिनीत पेरणीकरिता शेतक-यांनी
या वाणाचे बियाणे वापरावे, असे आवाहन विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद
वासकर यांनी केले आहे. परभणी-१२ या करडईच्या वाणाची सत्यतादर्शक बियाणाच्या पाच
किलो वजनाच्या पिशवीची किंमत ३७५ रूपये आहे. तसेच हरभरा पीकाचे आकाश व विजय या
वाणाचे व गहु पिकात त्र्यंबक व लोक-१ वाणाचे बियाणे विद्यापीठाकडे विक्रीसाठी
उपलब्ध आहे. बियाणे खरेदीसाठी बीजोत्पादन अधिकारी डॉ एस बी घुगे यांच्याशी
संपर्क करावा. संपर्कसाठी दुरध्वनी क्रमांक ०२४५२-२२०८९९.
Saturday, October 18, 2014
Saturday, October 4, 2014
गांधी जयंती दिनी स्वच्छ भारत अभियानास प्रारंभ
परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्या कृषि महाविद्यालयच्या राष्ट्रीय सेवा योजनाच्या वतीने दि २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली तसेच शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ अशोक ढवण यांच्या हस्ते स्वच्छ भारत अभियानास प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एन गोखले होते तर सहयोगी अधिष्ठाता (निम्नस्तर शिक्षण) डॉ डि बी देवसरकर, कुलसचिव डॉ डि एल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले तसेच शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ अशोक ढवण म्हणाले की, राष्ट्रीय स्वच्छता अभियान संपुर्ण भारतात पुढील पाच वर्ष राबविण्यात येणार असुन तरूणांनी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेबाबत जागरूक राहीले पाहीजे. संपुर्ण देश स्वच्छता अभियानात सामील होत असुन तरूणांनी यात आपले योगदान दयावे. महात्मा गांधी यांनी आधी स्वत: चांगल्या गोष्टी आचरणात आणल्या व नंतर सांगितल्या हे लक्षात ठेवा. या स्वच्छता अभियानाची सुरूवात वैयक्तीक स्वच्छते होते यांची जाण ठेवावी, असा सल्ला त्यांनी दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा अनिस कांबळे यांनी केले तर सुत्रसंचालन प्रविण तिडके यांनी केले. अभियानानिमित्त विद्यापीठ परिसरात रॅली काढण्यात येऊन विद्यापीठातील विद्यार्थी-विद्यार्थीनी व अधिकारी-कर्मचारी यांनी श्रमदान करून विद्यपीठ परिसर स्वच्छ करण्यात आला.
Friday, October 3, 2014
Thursday, October 2, 2014
एरंडेश्वर येथील कृषिकन्यांच्या शेतकरी मेळाव्यास मोठा प्रतिसाद
मार्गदर्शन करतांना कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन गोखले, व्यासपीठावर डॉ आर बी काळे, डॉ व्ही एन नारखेडे, डॉ एस एल बडगुजर, डॉ आर बी चांगुले, डॉ धीरज कदम आदी. |
परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठांतर्गत असलेल्या एकात्मिक शेती पध्दती केंद्रात कार्यरत ग्रामीण कृषि
कार्यानुभवाच्या कृषिकन्यांनी एरंडेश्वर येथे शेतकरी मेळाव्याचे दिनांक ३० सप्टेबर
रोजी आयोजन केले होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कृषि महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ डी एन गोखले होते तर डॉ आर बी काळे, प्रगतशील शेतकरी बालासाहेब काळे,
डॉ व्ही एन नारखेडे, डॉ धीरज कदम, डॉ आर बी चांगुले, डॉ एस एल बडगुजर, डॉ जयश्री
एकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन
करतांना कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एन गोखले म्हणाले की, कृषि
विद्यापीठाने संशोधनाच्या आधारे शेतक-यांना उपयुक्त अशी अनेक पीकांची वाणे व तंत्रज्ञान
विकसित केले असुन त्याचा शेतक-यांनी अवलंब करावा. शेतक-यांनी नियमितपणे कृषि
विद्यापीठाच्या संपर्कात राहावे, असा सल्ला त्यांनी दिला. किड व्यवस्थापनाबाबत
डॉ धीरज कदम यांनी तर रोग व्यवस्थापनावर डॉ एस एल बडगुजर यांनी मार्गदर्शन केले
तसेच एकात्मिक शेती पध्दतीवर डॉ व्ही एन नारखेडे यांनी तर शेतीतील अर्थशास्त्र
यावर डॉ आर बी चांगुले व शेतीतील महिलांचा सहभाग यावर डॉ जयश्री एकाळे यांनी
मार्गदर्शन केले.
मेळाव्याचे प्रास्ताविक मुक्ता
तांबे हीने केले तर सुत्रसंचालन प्रिया शेळके व ज्योती जळकुटे हीने केले तसेच आभार
प्रदर्शन सुजाता काळदाते हीने केले. कार्याक्रमात कृषिकंन्यानी गेल्या तीन महिण्यात
एरंडेश्वर येथे घेण्यात आलेल्या विविध प्रात्याक्षिकाच्या छायाचित्राच्या संकलीत
भितीपत्रकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामीण कृषि
कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमास समन्वयक डॉ राकेश आहीरे व प्रभारी
अधिकारी डॉ राजेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत आहेत.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषिकन्या
सुषमा नान्नजकर, सुवर्णा पानझाडे, पुजा पवळ, राधा तिपटे, प्रियंका कदम, वनिता सस्ते,
केतकी नवगिरे, दिपाली कांदे, जयश्री कदम, रोहिणी कदम, आश्विनी सिरसाठ, वैशाली खिल्लारे,
सुप्रिया कदम, कोमल शिंदे, मनिषा भोईवार, मिनाक्षी डाळ, कविता आढे, प्रिती थोरात,
सविता ढगे, कल्याणी दावणे, प्रियंका भारती, सोनिया खताळ, सत्वशीला लोणकर, सोनी
वाघ, सुरेखा गरूड, दिपाली लंगोटे, योगिता साळुंके, आश्विनी गोट्टमवाड, शारदा वाघ,
कोमल खिल्लारे, आश्विनी खिल्लारे, चैताली चव्हाण, प्रियंका रेंगे यांनी परिश्रम
घेतले. मेळाव्यास गावातील शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.