Pages

Saturday, November 29, 2014

पुणे येथे कृषि उद्योजकता विषयावर राष्‍ट्रीय परिसंवादाचे आयोजन

कृषि पदवीधर उद्योजकांच्‍या नावाची डिरेक्‍टरी होणार प्रसारित
राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठे आणि जर्नल ऑफ अॅ‍ग्रिकल्‍चर रिसर्च अँड टेक्‍नॉलॉजी यांच्‍या सयुक्‍त विद्यमाने पुणे, बिबवेवाडी येथील लोकशाहीर साठे नाटयगृहात १५ व १६ डिसेंबर २०१४ दरम्‍यान चारही कृषि विद्यापीठांच्‍या कुलगुंरूच्‍यामार्गदर्शनाखाली कृषि उद्योजगता, व्‍यापारातील जागतिक संधी या विषयावर राष्‍ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्‍यात आले आहे. या राष्‍ट्रीय परिसंवादामध्‍ये कृषि व्‍यवसाय व औद्योगिक क्षेत्रात उल्‍लेखनिय कार्य करणारे कृषि पदवीधर, कृषि संशोधक, कृषि शास्‍त्रज्ञ व विद्यार्थी मोठया संख्‍येने सहभागी होणार आहेत. शेती व्‍यवसाय व कृषि उद्योगांच्‍या अनुषंगाने झालेल्‍या कामाचा मागोवा व कृषि उद्योग व्‍यवसायांना नवी दिशा देण्‍याच्‍या उद्देशाने या परिसंवादाचे आयोजन करण्‍यात आले आहे. या परिसंवादात कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन, कृषि निविष्‍ठा उद्योग, कृषि पणन, मुल्‍यवर्धन तंत्रज्ञान व कृषि उद्योजगता इत्‍यादी विषयांवर चर्चासत्रात भर देण्‍यात येणार आहे. कृषि क्षेत्राला कृषि व्‍यवसायाचे स्‍वरूप प्राप्‍त करून देण्‍यासाठी, कृषि व्‍यवसायांमध्‍ये कृषि पद‍वीधरांना असलेल्‍या संधी व वाव, कृषि व्‍यवसायांमध्‍ये कृषि पदवीधरांना आकर्षित करण्‍यासाठी उपाययोजना यावर अधिक भर या परिसंवादात दिला जाणार आहे. या राष्‍ट्रीय परिसंवादाचे औचित्‍य साधुन कृषि पदवीधर व्‍यावसायिकांची डिरेक्‍टरी / सुची प्रकाशीत करण्‍यात येणार आहे. राज्‍यातील ज्‍या कृषि पदवीधरांनी स्‍वत:चा कृषि व्‍यवसाय सुरू केलेला असेल त्‍यांचे नाव, पत्‍ता, कृषि व्‍यवसायाचे स्‍वरूप, संपर्क क्रमांक, ईमेल, वेबसाईट इत्‍यादी माहितीचा या डिरेक्‍टरी / सुचीमध्‍ये समावेश केला जाणार आहे. यामुळे कृषि व्‍यवसायात असलेल्‍या राज्‍यातील कृषि पदवीधरांची संपुर्ण माहितीची यादी एकाच ठिकाणी उपलब्‍ध होणार आहे. 
    राज्‍यातील सर्व कृषि पदवीधरांना आवाहन करण्‍यात येते की, ज्‍या कृषि पदवीधरानी स्‍वत:चा कृषि व्‍यवसाय सुरू केलेला आहे, त्‍यांनी या डिरेक्‍टरीमध्‍ये आपल्‍या नावाची नोंद करावी. या डिरेक्‍टरीमध्‍ये आपल्‍या नावाचा व व्‍यवसायाच्‍या माहितीचा समावेश करण्‍यासाठी www.sauagribusiness.com या संकेतस्‍थळावर जावुन आपली माहिती भरावी तसेच आपल्‍या कृषि महाविद्यालयाशी किंवा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत येणा-या कृषि पदवीधरांनी जनसंपर्क अधिकारी डॉ प्रविण कापसे यांच्‍याशी संपर्क साधावा, असे आवाहन महात्‍मा फुले कृषि विद्यापीठाचे कृषि अधिष्‍ठाता डॉ भीमराव उल्‍मेक व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी केले आहे. 

Monday, November 24, 2014

राष्‍ट्रीय छात्रसेना दिवस उत्‍साहात संपन्‍न

वनामक़वित राष्‍ट्रीय छात्रसेना दिवस निमित्‍त स्‍वच्‍छता मोहिमेचा प्रारंभ करतांना कुलसचिव डॉ दिनकर जाधव, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे, छात्रसेना अधिकारी डॉ अशिष बागडे, प्रा अनिस कांबळे व छात्र सैनिक
सौजन्‍य
डॉ अशिष बागडे, छात्रसेना अधिकारी

Monday, November 17, 2014

मराठवाडयातील हवामान व पाऊस रब्‍बी हंगामासाठी पोषक

परभणी : मागील काही दिवसांपासुन राज्‍यात तसेच मराठवाडयातील काही भागात बेमोसमी पाऊस पडला आहे. ज्‍या भागात जमिनीतील ओलाव्‍यात वाढ झाली, त्‍याभागात रब्‍बी हंगामातील गहु, करडई व हरभरा पिकासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. करडई हे पीक कमी पाण्‍यावर तसेच जमिनीतील उपलब्‍ध ओलाव्‍यावर घेऊन सद्यस्थितीत पडणा-या अवकाळी पावसाचा करडई पीकाला फायदा होऊ शकतो. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने प्रसारित केलेल्‍या करडईच्‍या परभणी-१२ (परभणी कुसुम) व परभणी-४० या वाणांचा उशिरा पेरणीसाठी वापर करता येतो. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाकडे परभणी-१२ या करडईच्‍या सुधारित वाणाचे बियाणे उपलब्‍ध असुन शेतकरी बांधवांनी सदरिल वाणाची पेरणी करावी व पडलेल्‍या पावसाचा फायदा घ्‍यावा, असे आवाहन संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी केले आहे. परभणी-१२  या करडईच्‍या वाणाची सत्‍यतादर्शक बियाणाच्‍या पाच किलो वजनाच्‍या पिशवीची किंमत ३७५ रूपये आहे. तसेच हरभरा पीकाचे आकाश व विजय या वाणाचे व गहु पिकात लोकवन वाणाचे बियाणे विद्यापीठाकडे विक्रीसाठी उपलब्‍ध आहे. बियाणे खरेदीसाठी बीजोत्‍पादन अधिकारी डॉ एस बी घुगे (९४२१४६०१४३) यांच्‍याशी संपर्क करावा.

Friday, November 14, 2014

शेतक-यांनी जलसंधारणावर भर द्यावा ...... कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु

 कापुस संशोधन केंद्र, नांदेड 








सौजन्‍य
प्रा अरविंद पाडांगळे
कापुस संशोधन केंद्र , नांदेड

Tuesday, November 11, 2014

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कला क्षेत्रात मानाचा तुरा

इंद्रधनुष्‍य युवक महोत्‍सवात लोकनृत्‍य व कोलाजमध्‍ये सुवर्णपदक
नृत्‍य सादर करतांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा संघ 
पुरस्‍कार स्‍वीकारतांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा संघ 

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे दिनांक ५ ते ९ नोव्‍हेंबर दरम्‍यान बाराव्‍या इंद्रधनुष्‍य युवक महोत्‍सव संपन्‍न झाला. या युवक महोत्‍सवात राज्‍यातील २० विद्यापीठाच्‍या संघासह वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या चमुने सहभाग घेतला होता. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या संघाने लोकनृत्‍या या कला प्रकारात सुवर्ण पदक व फिरता चषक पटकाविला तर कोलाज या कला प्रकारात सुवर्णपदक प्राप्‍त करून विद्यापीठाच्‍या कला क्षेत्रात मानाचा तुरा रोवला. विद्यापीठ स्‍थापन झाल्‍यापासुन लोकनृत्‍य कला प्रकाराचा फिरता चषक सर्वप्रथमच विद्यापीठास प्राप्‍त झाला आहे. विद्यापीठच्‍या संघाने कर्नाटकी लोकनृत्‍य पुजा कुनिया हे सादर केले. या नृत्‍याने सर्व प्रेक्षकांचे मन भारावुन गेले.
    लोकनृत्‍य संघात प्रविण मांजरे, शुभम सुर्यवंशी, प्रविण जाधव, संकेत शिंदे, मुदीराज, ढालकरी ऐश्‍वर्या, क्षिरसागर, बिंड, अधिरा रवींद्रन, मयूर देशमुख, रेणुका पवार यांच्‍या समावेश होता तर कोलाजमध्‍ये सुवर्ण पदक विजेती शिवशक्‍ती गोडसेलवार हीचा समावेश होता. संघ व्‍यवस्‍थापक म्‍हणुन सांस्‍कृतीक प्रभारी अधिकारी डॉ आशा देशमुख व किशन सुर्यवंशी यांनी काम पाहीले तर संघाला मधुकुमार व खद्राराज यांनी मार्गदर्शन केले. संघाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ एम के खेडकर यांच्‍या हस्‍ते पुरस्‍कार देण्‍यात आले.
    या यशाबाबत विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी विद्यार्थ्‍यांचे अभिनंदन केले तसेच शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ डि एल जाधव, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, सहयोगी अधिष्‍ठाता प्रा विशाला पट्टणम, प्रा गुळभिले, प्रा राठोड, प्रा चव्‍हाण, डॉ व्‍ही डी पायाळ यांनीही अभिनंदन केले. 

Monday, November 10, 2014

आंतरराष्‍ट्रीय परिषदेत सिमा आरबाड यांच्या पोस्‍टरला उत्‍कृष्‍ट पोस्‍टर पुरस्‍कार

पोस्‍टरचे सादरीकरण करतांना सिमा आरबाड, निरिक्षक इजिप्‍तचे शास्‍त्रज्ञ डॉ रेदा रगब शाहीन व डॉ डि बी देवसरकर 

हैद्राबाद येथील आंतरराष्‍ट्रीय संस्‍था ओमेक्‍स ग्रुपच्‍या वतीने कृषि व उद्यानविद्या विषयावरील तिस-या आंतरराष्‍ट्रीय परिषदेचे आयोजन दिनांक २७ ते २९ ऑक्‍टोबर रोजी करण्‍यात आले होते. यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कृषि वनस्‍पतीशास्‍त्र विभागाच्‍या विद्यार्थीनी श्रीमती सिमा केशवराव आरबाड हिने कोरडवाहु कापुस विषयावर विभाग प्रमुख डॉ डि बी देवसरकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली शोध निबंधाचे सादरीकरण पोस्‍टर व्‍दारे केले होते. या पोस्‍टरची उत्‍कृष्‍ट पोस्‍टर म्‍हणुन निवड करण्‍यात आली. याप्रसंगी श्रीमती सिमा आरबाड यांना शास्‍त्रज्ञ डॉ एम पी श्रीवास्‍तव यांच्‍या हस्‍ते प्रमाणपत्र देऊन सन्‍मानित करण्‍यात आले. या परिषदेत जगातील विविध देशातील अनेक कृषि शास्‍त्रज्ञांनी सहभाग नोंदविला होता.

Monday, November 3, 2014

मराठवाडयातील मोसंबीने पटकाविला राष्ट्रीय स्‍तरावर प्रथम व व्दितीय पारितोषिक

जालना जिल्‍हयातील जाफ्राबाद तालुक्‍यातील जवखेडा या गांवचे पंढरीनाथ फदाट पारितोषिक स्‍वीकारतांना 
*****************************************
नागपुर येथे १३ वा राष्‍ट्रीय किसान मेळाव्‍याचे आयोजन राष्‍ट्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन केंद्रातर्फे दि ३० व ३१ ऑक्‍टोबर रोजी करण्‍यात आले होते. या मेळाव्‍याचे प्रमुख पाहुणे म्‍हणुन माजी कुलगुरू डॉ चारूदत्‍त मायी होते तर अध्‍यक्षस्थानी भारतीय कृषि संशोधन परिषदेचे उपमहानिर्देशक डॉ एन के कृष्‍णकुमार हे होते. या मेळाव्‍यात मराठवाडयातील मोसंबी उत्‍पादकांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या लिंबुवर्गीय फळपिकावर मराठवाडयाकरिता तंत्रज्ञान अभियान योजनेच्‍या वतीने सहभागी करण्‍यात आले. या मेळाव्‍यात राष्‍ट्रीय स्‍तरावरील लिंबुवर्गीय फळ प्रदर्शनाचे आयोजन करण्‍यात आले होते. या प्रदर्शनात मोसबी या फळासाठी जालना जिल्‍हयातील जाफ्राबाद तालुक्‍यातील जवखेडा या गांवचे पंढरीनाथ फदाट यांच्‍या मोसबीने प्रथम तर आंबड तालुक्‍यातील पिंपरखेड गांवचे रविंद्र बाबासाहेब गोल्‍डे यांच्‍या मोसबीने व्दितीय पारितोषिक पटकविला. त्‍यांना मेळाव्‍याच्‍या समारोप कार्यक्रमात डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ एस ए निंबाळकर यांच्‍या हस्‍ते गौरवीण्‍यात आले. या मेळाव्‍यात देशभरातील लिंबुवर्गीय उत्‍पादक शेतक-यांनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदवीला होता. या मेळाव्‍यात विविध विषयावर विकसित तंत्रज्ञानावर आधारीत मार्गदर्शन नागपुर येथील राष्‍ट्रीय लिंबुवर्गी फळसंशोधन केंद्राचे डॉ एम एस लदानिया व इतर शास्‍त्रज्ञांनी केले तसेच शेतक-यांच्‍या विविध समस्‍यांचे शंका समाधान करण्‍यात आले. या मेळाव्‍यासाठी मराठवाडयातील २५ शेतक-यांसह वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील लिंबुवर्गीय फळपिकावर मराठवाडयाकरिता तंत्रज्ञान अभियान योजनेचे विषय विशेषज्ञ डॉ एम बी सरकटे, डॉ पी डब्‍ल्‍यु एंगडे, डॉ एस पी जिंतुरकर, डॉ पी ए ठोंबरे, डॉ एन डी देशमुख व प्रा एस एच जेधे यांनी सहभाग घेतला. या पारितोषिक विजेत्‍या शेतक-यांचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु व विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी अभिनंदन केले.