पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन
मराठवाडयातील कोरडवाहु क्षेत्रात शेतीशी निगडीत
पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, रेशीम उदयोग, कुक्कुटपालन आदी उदयोगांची उभारणी
करणे श्क्य असुन शेतक-यांच्या आर्थिक उन्नतीसाठी या उदयोगांची सांगड घालणे
आवश्यक आहे. शेतक-यांनी दुग्धव्यवसाय हा गट उदयोगाच्या माध्यमातुन केल्यास निश्चितच
यश प्राप्त होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मा. सचिंन्द्र प्रताप सिंह यांनी
केले.
महाराष्ट्र
उद्योजकता विकास केंद्र, परभणी आयोजित जिल्हा उद्योग केंद्र व वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग यांच्या संयुक्त
विद्यमाने पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
दि 29 डिसेंबर ते 3 जानेवारी दरम्यान करण्यात आले असुन या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या
उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संचालक तथा
अधिष्ठाता (कृषि) डॉ अशोक ढवण हे
होते तर परभणीचे प्रसिध्द उद्योजक श्री ओमप्रकाश डागा, एमसीईडीचे विभागीय अधिकारी श्री विलास आहेर, गोळेगाव कृषि
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विलास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी
मा. सचिंन्द्र प्रताप सिंह पुढे म्हणाले की, परभणी जिल्हयात दुग्ध उत्पादनास मोठा
वाव असुन जिल्हा दुग्ध उत्पादनात स्वयंपुर्ण होऊ शकतो. दुग्ध व्यवसाय हा शेतक-यांच्या
आर्थिक स्थैर्यतेसाठी महत्वाचा दुवा ठरु शकतो. यासाठी दुध व दुग्धजन्य पदार्थ
निर्मिती, दुधाचे मुल्यवर्धन, टिकवण क्षमता व दुधाची बाजारपेठ या क्षेत्रात कार्य
करणे आवश्यक आहे. मराठवाडयातील पशुधन जसे देवणी व लाल कंधारी गोवंश, होलदेव संकरित
गोवंश, मराठवाडी म्हैस व उस्मानाबादी शेळी यांचे सवंर्धन, संशोधन व विकासाचे
कार्य होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
शिक्षण
संचालक तथा अधिष्ठाता (कृषि) डॉ अशोक ढवण आपल्या
भाषणात म्हणाले की, मराठवाडयातील टंचाईग्रस्त भागात कमी पाण्यावर येणारी चारा
पिके शेतक-यांनी घ्यावीत. शेतक-यांनी दुग्धव्यवसाय शास्त्रोक्त पध्दतीने करुन
रोजगार निर्मिती करावी. मानवाच्या समतोल आहारासाठी पशुधन संगापेपणचा व्यवसाय महत्वाचा
असुन मानवाची पेाषण समस्या सोडविण्यास दुग्धव्यवसाय हा मैलाचा दगड ठरेल.
या
प्रसंगी गोळेगांव कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास पाटील यांनी आपल्या भाषणात
कृषि पर्यटनावर भर दिला तर एमसीईडीचे विभागीय अधिकारी विलास आहेर यांनी बंदिस्त
शेळीपालन करण्याचा सल्ला आपल्या भाषणात शेतक-यांना दिला. उदयोजक श्री ओमप्रकाश
डागा आपल्या मार्गदर्शनात यशस्वी उदयोजक होण्यासाठी धाडस ठेवणे आवश्यक असल्याचे
सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे विभाग
प्रमुख तथा प्रशिक्षण समन्वयक डॉ बाबासाहेब ठोंबरे यांनी केले तर सुत्रसंचालन उदय
वाईकर व आभार प्रदर्शन प्रकल्प अधिकारी शंकर पवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी
डॉ. आनंद शिंदे डॉ. शंकर नरवाडे प्रा. दत्ता बैनवाड व श्री. प्रभाकर भोसले आदींनी
परिश्रम घेतले. कार्यक्रमास विविध विभागाचे विभाग प्रमुख, प्रभारी अधिकारी,
विदयापीठ अधिकरी व कर्मचारी शेतकरी पशुपालक व विदयार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
सहा दिवस
चालण-या या प्रशिक्षण कार्यक्रमात परभणी जिल्हयातील 45 शेतकरी पशुपालकांचा सहभाग
असुन टंचाईग्रस्त परिस्थिातीत चारा पिकांचे व्यवस्थापन, अपारंपारिक पशुखादयाचा
वापर, देशी गोवंश संवर्धन, पशुंचे पैदास, आहार, व्यवस्थापन व आरोग्य, दुध व
दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, पशुधनाचे लसिकरण, बंदिस्त शेळीपालन व कुक्कुट
पालन आदी विषयांवर विदयापीठातील शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
|