Pages

Tuesday, January 20, 2015

स्‍वच्‍छता ही सवयीचा भाग झाला पाहिजे........ कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

वनामकृवित स्‍वच्‍छ भारत अभियानातंर्गत स्‍वच्‍छता मोहिमेस प्रारंभ
परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने स्‍वच्‍छ भारत अभियांनाचा भाग म्‍हणुन दि २० ते २८ जानेवारी दरम्‍यान स्‍वच्‍छता मोहिम राबविण्‍यात येणार असुन याची सुरूवात कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते नागनाथ वसतीगृहात करण्‍यात आली, त्‍यावेळी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव डॉ डी एल जाधव, प्राचार्य डॉ डी एन गोखले, प्राचार्य डॉ व्‍ही डी पाटील, विभाग प्रमुख डॉ बी एम ठोबंरे आदींसह सहभागी विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी.
*************************************
महात्‍मा गांधींचे स्‍वच्‍छ भारताचे स्‍वप्‍न पुर्ण करण्‍यासाठी महात्‍मा गांधीच्‍या जंयतीस संपुर्ण देशात स्‍वच्छ भारत अभियानास सुरूवात झाली, प्रत्‍येक भारतीयांनी यात सहभाग नोंदवीला पाहीजे, विशेषता युवकांनी यात पुढाकार घ्‍यावा. स्‍वच्‍छता ही अभियानापुरतेच मर्यादित न राहता, स्‍वच्‍छता ही सवयीचा भाग झाला पाहिजे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले.
     परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने स्‍वच्‍छ भारत अभियांनाचा भाग म्‍हणुन दि २० ते २८ जानेवारी दरम्‍यान स्‍वच्‍छता मोहिम राबविण्‍यात येणार असुन याची सुरूवात आज दि २० जानेवारी रोजी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते नागनाथ वसतीगृहात करण्‍यात आली, त्‍यावेळी ते बोलत होते. यावेळी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव डॉ डी एल जाधव, कृषि म‍‍‍हाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एन गोखले, गोळेगांव कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्‍ही डी पाटील, विभाग प्रमुख डॉ बी एम ठोबंरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
     कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले, की आपण ज्‍या ठिकाणी राहतो तो परिसर स्‍वच्छ राहण्‍यासाठी कचराच होऊ नये यासाठी आपण कटीबध्‍द राहीले पाहिजे, स्‍वच्‍छता ही अविरतपणे चालणारी मोहिम ठर‍ली पाहिजे.
    यावेळी राष्‍ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रमाधिकारी प्रा अनिल कांबळे व राष्‍ट्रीय छात्रसेनेचे अधिकारी प्रा अशिष बागडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली स्‍वयंसेवकासह नागनाथ वसतिगृहतील विद्यार्थ्‍यानी परिसर स्‍वच्‍छ केला. या मोहिमे कृषि महाविद्यालयातील विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.
मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, सोबत शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव डॉ डि एल जाधव, प्राचार्य डॉ डि एन गोखले, डॉ व्हि डि पाटील, डॉ बी एम ठोंबरे आदीसह विद्यार्थी