Pages

Saturday, January 24, 2015

ई-निविदामुळे विद्यापीठाच्‍या आर्थिक कामकाजात अधिक पारदर्शकता येईल

वनामकृवित ई-निविदाबाबत प्रशिक्षण कार्यक्रमात कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांचे प्रतिपादन

परभणी, ता. २३: ई-निविदेव्‍दारे निविदा मागविल्‍यामुळे विद्यापीठातील आर्थिक कामकाजात अधिक पारदर्शकता येऊन शासनाव्‍दारे प्राप्‍त निधीचा योग्‍य प्रकारे विनियोग होण्‍यास मदत होईल, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या नियंत्रक कार्यालयाच्‍या वतीने दि २३ जानेवारी रोजी ई-निविदेबाबत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते, या कार्यक्रमाच्‍या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ. डि. एल. जाधव, विद्यापीठ नियंत्रक श्री अप्‍पासाहेब चाटे, उपकुलसचिव श्री आर. व्‍ही. जुक्‍टे, विद्यापीठ अभियंता श्री अब्‍दुल रहिम यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरु मा. डॉ. बी व्‍यंकटेश्‍वरलू पुढे म्‍हणाले, की विद्यापीठात ई-निविदेची प्रक्रिया विद्यापीठ अभियंता कार्यालयाने यशस्‍वीपणे राबविण्‍यात आलेली असुन ई-निविदेव्‍दारे रु. ३ लक्ष पेक्षा जास्‍त रक्‍कमेंच्‍या सर्व निविदा मागविल्‍यामुळे विद्यापीठातील आर्थिक प्रशासनात अधिक सु-सुत्रतता येईल.
कार्यक्रमाच्‍या प्रस्‍ताविकात विद्यापीठ नियंत्रक श्री अप्‍पासाहेब चाटे यांनी ई-निविदेचे महत्‍व सांगीतले. प्रशिक्षण कार्यक्रमात ई-निविदा सुलभतेने राबविण्‍याकरीता सिफी नेक्‍स इंडिया प्रा. लि. या संस्‍थेचे तांत्रीक सल्‍लागार श्री परितोष मान्‍जुरे यांनी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचा-यांना मार्गदर्शन केले. सदरील प्रशिक्षणात नवीन निविदा तयार करणे, प्रसिध्‍दी देणे, उघडणे व बंद करणे या बाबतची सविस्‍तर माहिती देण्‍यात आली तसेच ई-निविदा ही https:/maharashtra.etenders.in या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आल्‍याचे सांगितले. 
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सहाय्यक नियंत्रक श्री जी. बी. ऊबाळे यांनी केले तर कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी सुधीर खंदाडे, गजानन रापते, किशोर शिंदे, तुकाराम शिंदे आदींनी परिश्रम घेतले. प्रशिक्षण कार्यक्रमात विद्यापीठातील विविध कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.