Pages

Thursday, January 29, 2015

कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात “मुलभुत कर्तव्य व तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम” या विषयावर जनजागृती शिबीर संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्‍या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्‍या राष्ट्रीय सेवा योजना व परभणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने “मुलभुत कर्तव्‍य व तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम” या विषयावर जनजागृती शिबीराचे आयोजन दि २८ जानेवारी रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्राचार्य डॉ उदय खोडके हे होते तर व्यासपीठावर सहदिवाणी न्यायधीश पी. एस. भंडारी, डॉ. एस. डी. रामढवे, अॅड. जीवन पेडगावकर, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महेश देशमुख यांची उपस्थिती होती.
अध्‍यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. उदय खोडके म्‍हणाले की, व्यक्तीकडे इच्छाशक्ती असेल तर व्यसनावर मात करू शकतो. प्रत्येक व्यक्ती संविधानातील मुलभूत अधिकाराचाच विचार करतो, मात्र मुलभूत कर्तव्याचा त्‍यास विसर पाडतो. प्रत्येक व्‍यक्‍तीने नैतिक कर्तव्ये पार पडल्यास स्वतः सोबतच आपले कुटुंब, महाविद्यालय व समाज यांच्या प्रगतीस चालना मिळेल, असे मत त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केले.      
सहदिवाणी न्यायधीश पी. एस. भंडारी आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, समाजात कायदेविषयक जनजागृतीसाठी सर्व महाविद्यालयांनी राष्‍ट्रीय सेवा योजनेतंर्गत असे उपक्रम घेण्‍याची आवश्‍यकता असुन विद्यार्थ्‍याच्‍या महाविद्यालयीन वयात आपल्या मुलभूत कर्तव्याची जाणीव होईल.
आरोग्‍यतज्ञ डॉ. एस. डी. रामढवे म्‍हणाले की, व्‍यसनी व्‍यक्‍तींना व्‍यसनमुक्‍तीसाठी अनेक उपचार पध्‍दती उपलब्‍ध असुन याबाबत योग्‍य समुपदेश्‍न होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच व्‍यायाम व योग्य आहारावर लक्ष दिल्यास सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल असे प्रतिपादन विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महेश देशमुख यांनी केले.
या प्रसंगी व्‍यसनमुक्‍तीवर आधारित प्रदर्शनीचे आयोजन करण्‍यात आले होते. डॉ एस डी रामढवे यांनी दृक्श्राव्य माध्यमाचा वापर करून तंबाखूचे व्यसनाचे दुष्‍परिणामबाबत माहिती दिली तसेच सर्व विद्यार्थ्यांनी भविष्‍यात कुठलेही वाईट व्यसन करणार नाही अशी शपथ घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद फुलारी याने केले तर आभार प्रदर्शन कार्याक्रमाधिकारी प्रा. रवींद्र शिंदे यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा. सुमंत जाधव, प्रा. स्मिता खोडके, प्रा. मधुकर मोरे, प्रा. विवेकानंद भोसले, श्री. संजय पवार, प्रा. संदीप पायाळ, श्री. लक्ष्‍मीकांत राऊतमारे हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी कल्पना भोसले, वृषाली खाकाळ, जान्हवी जोशी, हर्षदा जाधव, नवनाथ घोडके, सागर झावरे, प्रवीण तौर, सुनील शिंदे, निर्मल सिंघाडीया, पंकज भोसले आदी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.