Pages

Thursday, January 22, 2015

महाविद्यालयीन विद्यार्थांनी रस्ता सुरक्षेचे दूत म्हणून कार्य करावे – प्राचार्य डॉ. उदय खोडके

छायाचित्रात प्राचार्य डॉ. उदय खोडके, निरीक्षक तानाजी धुमाळ, विनोद चौधरी, प्रा. मिलिंद साळवी, प्रा. विवेकानंद भोसले, रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. रवींद्र शिंदे व विद्यार्थी दिसत आहेत.  
***************************
वसंतराव नाईक कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्‍या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व उपप्रादेशिक परिवहन विभाग परभणी यांच्या संयुक्‍त विद्यमाने दि २१ जानेवारी रोजी २६ व्या रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. उदय खोडके तर उपप्रादेशीक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक तानाजी धुमाळ, विनोद चौधरी, प्रा. मिलिंद साळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करतांना प्राचार्य डॉ. उदय खोडके म्‍हणाले, की विद्यार्थ्‍यांनी वाहने चालवितांना वेग मर्यादा पाळावी व रस्ता सुरक्षेचे दूत म्हणून कार्य करावे तर मोटार वाहन निरीक्षक तानाजी धुमाळ आपल्‍या मार्गदर्शनात म्हणाले कि, आज तरुणांकडून वेगाचे भान न राखता दुचाकीचा वापर होत असुन त्यामुळे छोटे-मोठे अपघात घडतात व परिणामी शरीराचे अवयव निकामी होण्याबरोबरच जीव दगावण्याची सुद्धा शक्यता असते. 
विनोद चौधरी यांनी विद्यार्थ्यांना वाहन चालकांच्‍या नियमावलीची माहिती देऊन अपघात झाल्याचे पाहिल्यास शासकीय रुग्णवाहिकासाठी तातडीने १०८ या क्रमांकावर संपर्क करावा असे सुचविले. प्रा. मिलिंद साळवी यांनी दुचाकीवर जात असताना हेल्मेट व चारचाकी वाहनातून प्रवास करताना सीट बेल्टाचा वापर करण्‍याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद फुलारी यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाधिकारी प्रा. रवींद्र शिंदे यांनी केले. कार्यक्रमास विभाग प्रमुख प्रा. विवेकानंद भोसले, श्री. संजय पवार, प्रा. पंडित मुंढे, प्रा.गोपाल शिंदे, प्रा. मधुकर मोरे, प्रा. प्रमोदिनी मोरे आदींसह महाविद्यालयातील विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रवीण तौर, नवनाथ घोडके, सागर झावरे, कल्पना भोसले, वृषाली खाकाळ, मयुरी काळे, अर्चना कार्णले, मायावती मोरे, स्नेहल कदम, वैशाली संगेकर आदींनी परिश्रम घेतले.