Pages

Thursday, February 26, 2015

फिरत्या माती परीक्षण प्रयोगशाळेव्दारे सेलु तालुक्यातील दिडशे शेतक-यांचे माती परीक्षण

वनामकृविच्‍या मृद विज्ञान व कृषि रसायनशास्‍त्र विभागाचे जमिनीचे आरोग्‍य जागृती अभियान
जमिनीचे आरोग्‍य जागृती अभियानांतर्गत सहभागी मृदाशास्‍त्रज्ञ डॉ ह‍रिहर कौसडीकर, डॉ अनिल धमक, शेतकरी व अनुभवाधारित शिक्षणाचे विद्यार्थी 

परभणी: संयुक्‍त राष्‍ट्र संघाने २०१५ हे वर्ष आंतरराष्‍ट्रीय मृदा वर्ष म्‍हणुन घोषीत केले असुन यानिमित्‍त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विघ्‍यापीठाच्‍या मृद विज्ञान व कृषि रसायनशास्‍त्र विभागातर्फे विभाग प्रमुख डॉ विलास पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली जमिनीचे आरोग्‍य जागृती अभियान राबविण्‍यात येत आहे. या अभियानांतर्गत सेलु तालुक्‍यामध्‍ये धनेगाव व कुंडी येथे दि २४ फेब्रुवारी रोजी फिरती माती परीक्षण प्रयोगशाळेचे एक दिवशीय माती परीक्षण शिबीर व शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. या उपक्रमात परीसरातील १५० शेतक-यांनी सहभाग नोंदविला.  यावेळी मृदाशास्‍त्रज्ञ डॉ हरिहर कौसडीकर व डॉ अनिल धमक यांच्यासह पदवीपुर्व अनुभवाधारित शिक्षण अभ्‍यासक्रमाच्‍या दहा विध्‍यार्थनी शिवारातील शेतक-यांच्‍या शेतावर जाउन मातीचे नमुने गोळा केले. शेतकरी मेळाव्‍यात मृदाशास्‍त्रज्ञ डॉ हरिहर कौसडीकर यांनी संतुलीत पिक पोषणासाठी माती परिक्षणाचे महत्‍व व त्यानुसार द्यावयाच्‍या खताच्या शिफारसाठी याबाबत तर डॉ अनिल धमक मृदशास्‍त्रज्ञ यांनी माती परीक्षण व पीक व्‍यवस्‍थापन यावर मार्गदर्शन केले. मृदाशास्‍त्र विभागातील अनुभवाधारित शिक्षण प्रकल्‍पाचे विद्यार्थी सतीश कटारे, शिवप्रसाद संगेकर, आकाश देशमुख, गणेश कटुले, पुरूषौत्‍तम गाडेकर, वसंत जाधव, विलास झाटे, आकाश सुर्यवंशी, प्रदिप राठोड, राहुल पाथरकर, मयुर हालनौर यांच्‍यासह ग्रामस्‍थांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास जगन्‍नाथराव कटारे, किशोर जोशी, किरण कुंडीकर, जावळेकर, उध्‍दवराव कटारे, सुभाष कटारे, अंकुश मोगल, शरद मोगल, अजय मोगल आदीसह गावातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.