परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा
कृषी विद्यापीठाचा विसावा दीक्षान्त समारंभ दि ५ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता
विद्यापीठाच्या मुख्य प्रांगणात संपन्न होणार असुन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती महामहिम श्री. चेन्नमनेनी
विद्यासागर राव भूषविणार असुन दीक्षान्त भाषण अणुउर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष तथा
राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष मा. डॉ. अनिल काकोडकर करणार
आहेत. महाराष्ट्र राज्याचे कृषि व फलोत्पादन, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय
मंत्री तथा विद्यापीठाचे प्रति कुलपती मा. ना. श्री. एकनाथराव खडसे यांची प्रमुख
उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी.
व्यंकटेश्वरलु यांच्यासमवेत कार्यकारी परिषदेचे सन्माननीय सदस्यांसह अनेक
मान्यवर उपस्थित राहणार आहेत, असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनकर जाधव यांनी
कळविले आहे.