मेळाव्याचे उद्घाटन करतांना कुलगुरू मा डॉ बी व्यंकटेश्वरलु, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, डॉ अशोक कडाळे आदी. |
शेतीमध्ये प्रगती
साधन्याकरिता आदिवासी शेतक-यांनी यांत्रिकीकरण, उत्तम दर्जाची पीकांची वाण व
विविध शेती निवीष्ठांचा अवलंब विद्यापीठ शास्त्रज्ञांच्या शिफारशीप्रमाणे करावा
व आधुनिकतेची कास धरावी, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ बी व्यंकटेश्वरलु यांनी
केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अखिल भारतीय
समन्वीत सिंचन पाणी व्यवस्थापन संशोधनेव्दारे आदिवासी उपयोजनेंतर्गत हिंगोली
जिल्हयातील कळमनुरी तालुक्यातील मौजे वाई येथील आदिवासी शेतक-यांना बहुउपयोगी
खते व बियाणे पेरणी यंत्र वाटप कार्यक्रम व शेतकरी मेळाव्याचे आयोजन दि ३१ मार्च
रोजी करण्यात आले होते, त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद
वासकर, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, योजनेचे प्रभारी
अधिकारी डॉ अशोक कडाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या योजनेतंर्गत ९० निवडक आदिवासी
शेतक-यांना बहुउपयोगी खते व बियाणे पेरणी यंत्र वाटप करण्यात आले.
कुलगुरू मा डॉ बी व्यंकटेश्वरलु
पुढे म्हणाले की, आदिवासी शेतक-यांनच्या सर्वंकष विकासासाठी विद्यापीठाने सातत्याने
शेतक-यांच्या संपर्कात राहुन त्यांच्या गरजेनुसार संशोधन करून कृषि विस्तार
कार्यक्रम राबवावा. संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर आपल्या भाषणात म्हणाले
की, वाई येथील आदिवासी शेतक-यांनी कृषि विद्यापीठाच्या विविध उपक्रमास मोठा सकारत्मक
प्रतिसाद दिला असुन आदिवासी उपयोजनेतंर्गत सिंचन पाणी व्यवस्थापन योजनेने चांगला
पुढाकार घेतले आहे, याचा आदिवासी शेतक-यांना निश्चितच लाभ होईल.
प्रास्ताविकात डॉ अशोक कडाळे यांनी आदिवासी
उपयोजनेंतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमात
हरिभाऊ दुधाळकर, मारोतराव धनवे, संभाजी खुडे, उकंडी कबले, अशोक डाखुरे, गंगाबाई
मुकाडे यांना मान्यवरांच्या हस्ते बहुउपयोगी खते व बियाणे पेरणी यंत्र वाटप
करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ गजानन गडदे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ
किरण जाधव यांनी केले. याप्रसंगी डॉ एस बी मेहत्रे, डॉ सी बी लटपटे, डॉ किरण जाधव
यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा कराड, श्री
गिराम, श्री कांबळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास सह्योगी अधिष्ठाता डॉ धर्मराज
गोखले, डॉ उदय खोडके आदीसह विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व वाई गांवचे आदिवासी
शेतकरी मोठया संख्येने उपस्थिती होते.