Pages

Monday, March 9, 2015

वनामकृवित मृदविज्ञान विषयावर विविध मान्‍यवर शास्‍त्रज्ञांच्‍या व्‍याख्‍यानमालाचे आयोजन

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या मृदविज्ञान व कृषि रसायनशास्‍त्र विभाग व भारतीय मृद विज्ञान संस्‍था शाखा परभणी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने कृषि व मृदा संशोधनातील नाविण्‍यपुर्ण क्षेत्र’’ या विषयावर दि. १० ते १२ मार्च दरम्‍यान देशातील प्रमुख मृदाशास्‍त्राज्ञांच्‍या व्‍याख्‍यानमालेचे आयोजन कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात करण्‍यात आले आहे. व्‍याख्‍यानमालेचे उद्घाटन दि. १० मार्च रोजी नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि अनुसंधान संस्‍थेचे मृदाशास्‍त्रज्ञ डॉ. पी. के. छोंकर यांच्‍या हस्‍ते होणार असुन अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्वरलु तर प्रमुख पाहूणे म्‍हणुन शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण व सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. डी. एन. गोखले यांच्‍या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे.
व्‍याख्‍यानमालेत उच्‍च ध्‍येय साध्‍य करण्‍यासाठी सकारात्‍मक दृष्टिकोनाचा विकास आणि कृषि व मृदविज्ञानातील एकविसाव्‍या शतकातील आव्‍हाणे व संशोधन संधी यावर मृदाशास्‍त्रज्ञ डॉ. पी. के. छोंकर तर जमिनीच्‍या आरोग्‍यासाठी जैविक कच-याचे व्‍यवस्‍थापन यावर भोपाळ येथील भारतीय मृदविज्ञान संस्‍थेचे शास्‍त्रज्ञ डॉ एम. सी. मन्‍ना मार्गदर्शन करणार आहेत. भारतीय मृदविज्ञान संस्‍थेचे डॉ. तपण अधिकारी हे पीक पोषणासाठी नॅनो तंत्रज्ञानयावर तर औरंगाबाद येथील वाल्‍मीचे माजी उपसंचालक डॉ. एस. बी. वराडे हे सद्याच्‍या कृषि विकासात मातीचे भविष्य या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. फलोत्‍पादनात पीक पोषणाचे महत्‍व या विषयावर नागपुर येथील राष्‍ट्रीय मोसंबी संशोधन संस्‍थेचे डॉ. ए. के. श्रीवास्‍तव यांचे व्‍याख्‍यान होणार आहे. व्‍याख्‍यानमालेचा समग्र आढावा शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण व विभाग प्रमुख डॉ. विलास पाटील हे घेणार आहेत. 
या व्‍याख्‍यानमालेचा लाभ कृषि विद्यापीठातील प्राध्‍यापक, अधिकारी, शास्‍त्रज्ञ, पदव्‍युत्‍तर विद्यार्थी घ्‍यावा,  असे आवाहन व्‍याख्‍यानमालेचे संयोजक तथा विभाग प्रमुख डॉ. विलास पाटील व सहसंयोजक डॉ. अनिल धमक यांनी केले.