Pages

Friday, July 24, 2015

कला व क्रीडा क्षेत्रात वनामकृविच्या विद्यार्थ्यांची दर्जात्मक वाढ होत आहे.......कुलगूरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु

वनामकृवित विद्यार्थ्‍यांचा गुणगौरव सोहळा संपन्‍न
गुणगौरव सोहळयात मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, क्रीडाधिकारी प्रा जी ए गुळभिले आदी
गुणगौरव सोहळयात कोलाज या कला प्रकार सुवर्ण पदक प्राप्‍त केल्‍याबद्दल शिवशक्‍ती गोडसलवार हिचा सत्‍कार करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, सोबत शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, क्रीडाधिकारी प्रा जी ए गुळभिले आदी
*****************
गतवर्षी कर्नल व अमरावती येथे पार पडलेल्‍या युवक महोत्‍सवात विद्यापीठाच्‍या संघानी विविध कला प्रकारात चार सुवर्ण व तीन कास्‍य पदके प्राप्‍त करून विद्यार्थ्‍यांनी राज्‍य व देश पातळी चांगले यश मिळवीले, यावरून विद्यापीठाच्‍या विद्यार्थ्‍यांची कला व क्रीडा क्षेत्रातील दर्जात्‍मक वाढ होत असल्‍याचे सिध्‍द होते, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगूरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या विद्यार्थी कल्‍याण अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने आयोजित विद्यापीठ खेळाडु, अधिकारी व कर्मचारी यांचा गुणगौरव सोहळा दि २३ जुलै रोजी संपन्‍न झाला, या सोहळयाच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, क्रीडाधिकारी प्रा जी ए गुळभिले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
     कुलगूरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, स्‍पर्धेा व खेळ हा विद्यार्थी जीवनातील  अविभाज्‍य घटक झाला पाहिजे, विद्यार्थ्‍यी जीवन हे उत्‍पादक जीवन असुन त्‍यांना प्रोत्‍साहन देणे गरजे आहे. विद्यार्थ्‍यांच्‍या विकासासाठी विद्यापीठातंर्गत असलेल्‍या महाविद्यालयांनी कला व क्रीडा क्षेत्रात अद्यावत दर्जाच्‍या सुविधा पुरविल्‍या पाहिजे जेणे करून त्‍यांच्‍यातील कौशल्‍यांना वाव मिळेल. या सुविधांमुळे मराठवाड्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी ही या क्षेत्रात चांगली का‍मगिरी करून शकतील, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.   
     शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण आपल्‍या मनोगतात म्‍हणाले की, विद्यापीठाच्‍या विजयी संघात विविध राज्‍यातील, भागातील तसेच विविध संस्‍कृती व पार्श्‍वभुमी लाभलेले विद्यार्थी प्रतिनिधीत्‍व करीत असुन त्‍यांना अधिकाधिक सुविधा पुरविण्‍यास सर्व महाविद्यालयांने प्रयत्‍न करावेत. कार्यक्रमात प्राचार्य डॉ विलास पाटील, डॉ विजया नलावडे, प्रा सुनील तुरकमाने व विद्यार्थ्‍यांनी अथीरा रवींद्रन यांनी मनोगत व्‍यक्‍त केले.  
    गुणगौरव सोहळयात सन २०१४-१५ मध्‍ये विविध क्रीडा व सांस्‍कृतिक स्‍पर्धेत प्राविण्‍य मिळविलेल्‍या विद्यार्थी व विद्यार्थीनीं तसेच विविध क्रीडा प्रकारातील संघ व्‍यवस्‍थापक, प्रशिक्षक व परिक्षक यांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करून प्रशस्‍तीपत्र देण्‍यात आले. कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख यांनी सन २०१६ मध्‍ये अश्‍वमेध क्रीडा स्‍पर्धा व २०१७ मधील इंद्रधनुष्‍य क्रीडा स्‍पर्धेचे आयोजन विद्यापीठात होणार असल्‍याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ आशाताई देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. शाहू चौहान यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठांतर्गत असलेल्‍या मराठवाडा विभागातील संलग्‍न व घटक महाविद्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्‍यी-विद्यार्थ्‍यीनी व पालक मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी प्रा. डी एफ राठोड, रामा खोबे, किशोर शिंदे, श्री जगताप, श्री सुर्यवंशी, अन्‍वरमिया आदींनी परिश्रम घेतले.
गुणगौरव सोहळयात सत्‍कार झालेले विद्यापीठ खेळाडू
     अमरावती येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात पार पडलेल्‍या इंद्रधनुष्‍य या बारावी महा‍राष्‍ट्र राज्‍य आंतर विद्यापीठ युवक महोत्‍सवात कोलाज या कला प्रकारात शिवशक्‍ती गोडसलवार हिने सुवर्ण पदक तर विद्यापीठाच्‍या संघास लोकनृत्‍यात सुवर्ण पदक प्राप्‍त केले, या संघात प्रविण मांजरे, अथीरा रवींद्रन, ऐश्‍वर्या ढालकरी, मृनाली बिंद, पुनम क्षीरसागर, मयुर देशमुख, चंद्रकांत मुदिराज, संकेत शिंदे, रेणुका पवार, प्रविण जाधव, शुभम सुर्यवंशी या विद्यार्थ्‍यांचा समावेश होता. कर्नल येथील राष्‍ट्रीय दुग्‍ध संस्‍था येथे पार पडलेलया अखिल भारतीय आंतर कृषि विद्यापीठ युवक स्‍पर्धेत विद्यापीठाच्‍या संघास लोकनृत्‍यात सुवर्ण पदक, भारतीय समुह गीतात सुवर्ण पदक, देश भक्‍तीपर गीत प्रकारात कास्‍य पदक तर कला प्रकार कास्‍यपदक प्राप्‍त केले. लोकनृत्‍य संघात सहभागी विद्यार्थ्‍यीनी मृनाली बिंद, अथीरा रवींद्रन, बी पी कुरवाळे, एस यु अंबोरे, पी जी शिरसे, सावळे पी व्‍ही, पुनम क्षीरसागर, अंजली वाघमारे, के एम केळकर, पी एस सरदार यांचा तसेच भारतीय समुह गीत स्‍पर्धेत सुवर्ण पदक प्राप्‍त केले, या संघात एस यु अंबोरे, एस एस सेलुकर, एस बी कसबे, एस एस संत, एस पी पुंगळे, एस एस कादरी यांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. देश भक्‍तीपर गीत संघात एस यु अंबोरे, एस एस सेलुकर, एस बी कसबे, एस एस संत, एस पी पुंगळे, एस एस कादरी यांचा समावेश होता तर कोलाज या कलाप्रकारात शिवशक्‍ती गोडसलवार हिने व स्‍पॉट पेंटिग मध्‍ये जे एम गरूड हिने कास्‍यपदक प्राप्‍त केले. यासर्व विद्यार्थ्‍यांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला­. 
     राष्‍ट्रीय सेवा योजनेतील उत्‍कृष्‍ठ स्‍वयंसेवक म्‍हणुन निवड झालेल्‍या कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी रमाकांत कारेगांवकर, रासेयोचे उत्‍कृष्‍ठ कार्यक्रमाधिकारी प्रा रविंद्र शिंदे तसेच उत्‍कृष्‍ठ महाविद्यालय म्‍हणुन कृषि अभियांत्रिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उदय खोडके यांचा सत्‍कार करण्‍यात आला. आंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्‍त घेण्‍यात आलेल्‍या निबंध स्‍पर्धेत प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक प्राप्‍त केल्‍याबाबत रूचिता भालेराव, श्री सम्‍मेटा व रमाकांत कारेगांवकर यांचाही सत्‍कार करण्‍यात आला.
    कार्यक्रमात विद्यापीठातील कला व क्रीडा क्षेत्राच्‍या विकासात योगदान दिल्‍याबद्दल प्राचार्य डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ उद्य खोडके, डॉ विजया नलावडे, प्रा विशाल अवसरमल, विजय सावंत, डॉ प्रशांत करंदिकर, श्रीमती भार्गव, प्रा नागभिडे, दत्‍ता चव्‍हाण, पंकज खेडकर, मिलिंद बामणीकर, सुनिल तुरूकमाने, औंढेकर सर, प्रा खंदारे आदींचाही सत्‍कार करण्‍यात आला.