वनामकृवित कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आजी व माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहदीप मेळावा उत्साहात संपन्न
सद्य परिस्थितीत कृषिक्षेत्राच्या
विकासासाठी कृषी यांत्रिकीकरण, कृषी प्रक्रिया, मृद व जलसंधारण, पाणी व्यवस्थापन आदीं
कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञानाची सर्वसामान्य शेतकऱ्याना अत्यंत आवश्यकता असुन कृषी
अभियंतांनी याचा प्रसार करावा, असे आवाहन कुलगुरू मा डॉ. बी. व्यंकटेश्वरलू यांनी
व्यक्त केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्या कृषी
अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय आणि वनामकृवि कृषी अभियांत्रिकी माजी
विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १६ ऑगस्ट रोजी आयोजीत कृषी
अभियांत्रिकी आजी व माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहदीप मेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी
ते बोलत होते.
कार्यक्रमाचे
प्रमुख पाहुणे माजी कुलगुरू मा डॉ. के. पी. गोरे हे उपस्थित होते तर व्यासपीठावर
विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य मा. श्री. अनंतराव चोंदे, शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन
संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालाक डॉ. बी बी भोसले, कुलसचिव डॉ
दिनकर जाधव, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उदय खोडके, कृषि
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन गोखले, कृषी अभियांत्रिकी माजी विद्यार्थी
संघटनेचे अध्यक्ष प्रा. दयानंद टेकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी माजी
कुलगुरू डॉ के. पी. गोरे, शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, कुलसचिव डॉ दिनकर जाधव
आदींनी मार्गदर्शन केले.
मेळाव्यात
माजी विद्यार्थी प्रभाकर भालेराव, यशवंत गोस्वामी, रविंद्र गुरव, राजेंद्र कदम,
पंडित वासरे, भालचंद्र पेडगावकर, माणिक जाधव, योगेश मुळजे, अमिता तागडे, रमाकांत
चापके, दीपक भापकर, विकास पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. तसेच महेश हावळ, मनोज
लटपटे, दत्तात्रय मोरे, विकास पाटील, विजय आग्रे, राहुल वळसे या माजी विद्यार्थ्यांनी
आपले अनुभव कथन करून आजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
मेळाव्यास
परभणी येथील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातुन पदवी संपादन करून शासकीय सेवा, नामांकित
कंपन्या, उद्योग, स्वयंसेवी संस्था, राष्ट्रीयकृत बँका, संशोधन संस्था, कृषी
विद्यापीठे अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेले सुमारे १५० कृषि अभियंते सहभागी झाले
होते. तसेच माजी प्राचार्य आणि प्राध्यापक प्रा व्ही. जी. वैष्णव, प्रा. एल. एन. डीग्रसे,
प्रा. बापू अडकीने, डॉ. आर. जी. नादरे, डॉ. एस. बी. सोनी, प्रा. बी. बी.
सूर्यवंशी, प्रा. आर. आर. लोहेकर, प्रा.पी. बी. कदम, प्रा. व्ही. बी. बोथरा आदीं
मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात प्राचार्य डॉ उद्य खोडके यांनी कृषी
अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविदायालायाच्या वाटचालीचा आढावा घेतला तर प्रास्ताविक
प्रा डी डी टेकाळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मधुकर मोरे व
राजेंद्र पवार यांनी तर राजेश पांगरकर यांनी आभार मानले. विविध सत्रासाठी संकलक
म्हणून प्रा. लक्ष्मीकांत राउतमारे यांनी काम पाहिले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील
सर्व प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.