मृदविज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभाग आणि भारतीय मृदविज्ञान संस्था शाखा परभणीच्या वतीने आयोजीत वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात प्रतिपादन
परभणी
: वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मृदविज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभाग आणि भारतीय मृदविज्ञान संस्था शाखा परभणीच्या
वतीने डॉ.
ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवस १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात
आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु मा. डॉ.
बी. व्यंकटेश्वरलू हे होते. प्रमुख वक्ते म्हणुन डॉ. मनोहर नलावडे
तर विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य मा. रविंद्र देशमुख, विभाग प्रमुख डॉ.
विलास पाटील, डॉ. सय्यद
इस्माईल यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय
भाषणात कुलगुरु मा डॉ बी व्यंकटेश्वरलु यांनी
डॉ. ए. पी. जे.
अब्दुल कलाम यांच्या हैद्राबाद येथील सहवासातील आठवंणीना उजाळा
देऊन एक शास्त्रज्ञ
ते राष्ट्रपती या प्रवासातील त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. वाचनाने व्यक्तीमत्व
प्रगल्भ होते असे
प्रतिपादन केले. प्रमुख वक्ते डॉ.
मनोहर नलावडे यांनी डॉ ए पी जे अब्दुल कलाम, प्रेमचंद व डॉ. आंबेडकर
यांच्या साहित्य वाचनाने अंतरीक प्रेरणा मिळते. पुस्तकाने व्यक्ती विनयशील
होतो.
आदर्श व्यक्ती बनन्यासाठी वाचन संस्कृती जपणे आवश्यक आहे, असे नमुद केले. कार्यकारी परिषद सदस्य रविंद्र देशमुख यांनीही
आपले विचार यावेळी
व्यक्त केले. याप्रसंगी
संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना व मान्यवरांना महात्मा गांधी यांचे आत्मचरीत्र व महात्मा फुले यांचे शेतकऱ्यांचा
आसुडही पुस्तके भेट देण्यात आली. तसेच डॉ. अब्दुल कलाम यांच्या जीवनवरील
माहीती चित्रफीत सादर करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विलास पाटील यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. पपिता गौरखेडे तर आभार प्रदर्शन डॉ. महेश देशमुख यांनी केले. कार्यक्रमास डॉ. हरिहर कौसडीकर, डॉ. अनिल
धमक,
डॉ. सुरेश वाईकर, डॉ.
शिराळे, डॉ. खंदारे, श्री अनिल मोरे यांच्यासह पदव्युत्तर विद्यार्थी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.