Pages

Monday, February 1, 2016

वनामकृविचे डॉ शामराव घुगे यांची भारतीय तेलबिया संशोधन संस्‍थेच्‍या कार्यकारणीवर निवड

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या अखिल भारतीय करडई संशोधन प्रकल्‍पाचे प्रभारी अधिकारी डॉ शामराव घुगे यांची हैद्राबाद येथील भारतीय तेलबिया संशोधन संस्‍थेच्‍या अखिल भारतीय कार्यकारणी परिषदेवर पश्चिम विभागामधुन सदस्‍य म्‍हणुन निवड झाली आहे. डॉ घुगे यांनी करडई संशोधनावर दहा वर्षाचा अनुभव असुन विद्यापीठाच्‍या करडईच्‍या वाण निर्मिती व प्रसारणामध्‍ये योगदान आहे. विशेषत: विद्यापीठाची परभणी-१२ या करडईच्‍या विविध राज्‍यातील प्रसारात त्‍यांचे योगदान आहे. भारतीय तेलबिया संशोधन संस्‍थेव्‍दारे 'जर्नल ऑफ ऑईलसीड रिसर्च' हे संशोधन त्रैमासिक प्रसिध्‍द होते.