Pages

Friday, April 1, 2016

वनामकृविच्या माती परिक्षण प्रयोग शाळेव्दारे १०३६ शेतक-यांच्या मातीचे परिक्षण

दिनांक ५ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय मृदा दिनी प्रतिनिधीक स्वरूपात मृदा आरोग्य पत्रिकेचे वापट करतांना 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणीच्या माती परिक्षण प्रयोगशाळेव्दारे २०१५ - १६ यावर्षात मृदा आरोग्य जागृती अभियान राबवुन जिल्हयातील ३७ विविध गावात शिबीर आयोजीत करुन १०३६ मातीचे प्रतिनिधीक नमुणे गोळा करुन माती परिक्षण अहवाल शेतकऱ्यांना सादर करण्यात आले. सदरील शिबीरात शेतकऱ्यांना माती परिक्षण अहवाला प्रमाण पिकांस योग्‍य खतांची मात्राची शिफारसी बाबत मार्गदर्शन करण्‍यात आले. हा कार्यक्रम विभाग प्रमुख डॉ. व्हि. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. अे. एल. धमक व श्री सय्यद जावेद जानी यांच्‍यासह विभागातील सर्व अधिकारी-कर्मचारी व संबंधीत गावातील गावकरी मंडळीनी परिश्रम घेतले.