Pages

Tuesday, April 12, 2016

वनामकृवित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योेतिबा फुले यांच्याे संयुक्त जयंती निमित्त अठरा तास अभ्या‍समालिका


वसंतराव नार्इक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्‍मा ज्‍योतिबा फुले यांच्‍या संयुक्‍त जयंती निमित्‍त अठरा तास अभ्‍यासमालिकेचे आयोजन दिनांक ११ एप्रिल रोजी करण्‍यात आले होते, या अभ्‍यासमालिकेचे उदघाटन सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. धर्मराज गोखले यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. अठरा तास अभ्‍यासवर्गाच्‍या उपक्रमात कृषि महाविद्यालयाचे तीनशे विद्यार्थी व विद्यार्थींनीनी सहभाग नोंदविला. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब ठोंबरे, डॉ. व्‍ही. जी. मुळेकर, डॉ. व्‍ही. एस. खंदारे, डॉ. जे. व्‍ही. एकाळे, डॉ. एस. एल. बडगुजर, विद्यापीठ ग्रंथपाल डॉ. जी. पी. जगताप, डॉ. ए. टि. शिंदे, डॉ. एस. जी. नरवाडे, प्रा. एन. एम. तांबोळी, डॉ. पी. के. वाघमारे, डॉ मीना वानखडे, श्री चंद्रशेखर नखाते आदिसह विद्यार्थ्‍यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यापीठातील विद्यार्थी, विद्यार्थीनी, प्राध्‍यापक व कर्मचारी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.