|
मार्गदर्शन करतांना शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण |
|
मार्गदर्शन करतांना विस्तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले |
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या वतीने ट्रॅक्टर
मालक शेतकरी व त्यांच्या चालकांकरिता बीबीएफ तंत्रज्ञानाविषयी तज्ञाव्दारे एक
दिवसीय प्रशिक्षणाचे दिनांक १५ जुन रोजी आयोजन करण्यात आले होते. कमी पर्जन्यमानात रूंद वरंबा व सरी पध्दती - बीबीएफव्दारेच सोयाबीन, मुग, उडीद
सारख्या पिकांची लागवड करून चांगले उत्पादन काढु शकतो. शेतक-यांव्दारे बीबीएफ
यंत्र वापरतांना ज्या त्रुटी आढळुन येतात किंवा काही तांत्रिक अडचणीमुळे बरेच
शेतकरी बीबीएफ यंत्राचा वापर करीत नाहीत. सदरिल अडचणी दुर करण्यासाठी व
तांत्रिकदृष्टया बीबीएफचा योग्य वापर करण्याकरिता हे प्रशिक्षण खास ट्रॅक्टर
मालक व चालकाकरिता आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षणात शेतक-यांना प्रात्यक्षिकाव्दारे
या यंत्राचा वापराबाबत मार्गदर्शन करून शेतक-यांच्या शंकाचे समाधान करण्यात आले.
प्रशिक्षणाच्या उदघाटनाास शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ. ए. एस. ढवण, विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, जिल्हा
अधिक्षक कृषि अधिकारी श्री. एस. के. दिवेकर, कृषि अभियांत्रिकी महाविदयालयाचे
प्राचार्य डॉ. यु. एम. खोडके, उपसंचालक कु. रक्षा शिंदे,
विभाग प्रमुख डॉ. बी. व्ही. आसेवार, प्रगतशिल शेतकरी श्री. रंधवे
श्री. निरस, श्री.जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करतांना शिक्षण
संचालक डॉ. ए. एस. ढवण म्हणाले की, बीबीएफ सारख्या तंत्राचा वापर ही काळाची गरज असुन
शेतक-यांनी हया तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्पादनात वाढ करावी. तर विस्तार शिक्षण
संचालक डॉ. बी. बी. भोसले आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, ज्या शेतक-यांनी मागच्या वर्षी बीबीएफ वर पेरणी केली त्या शेतक-यांना
इतर शेतक-यापेक्षा अधिक उत्पन्न मिळाले व या तंत्राव्दारेच सोयाबीन पेरण्याचे
आवाहन त्यांनी केले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. एस. के. दिवेकर यांनी
यावेळी शेतक-यांना कृषि विभागाच्या योजनाविषयी माहिती दिली तर कृषि अभियांत्रिकी
महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. यु. एम. खोडके यांनी अभियांत्रिकी महाविदयालयातर्फे
बीबीएफच्या अडचणी सोडविण्याकरीता सर्वोतोपरी मदत करण्यात येईल असे सांगितले. उस्मानाबाद
येथील शेतकरी श्री. रंधवे यांनी त्यांच्या बीबीएफ पेरणी विषयी त्यांचे अनुभव
शेतक-यांना सांगितले.
प्रशिक्षणात डॉ. स्मिता सोळंखी व डॉ.दयानंद टेकाळे यांनी शेतक-यांना प्रात्यक्षिकाव्दारे बीबीएफ यंत्राचा वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. यु. एन. आळसे यांनी तर सुत्रसंचालन प्रा. डी. डी. पटाईत यांनी केले. कार्यक्रमास डॉ. पी. आर. देशमुख, प्रा. पी. एस. चव्हाण, प्रा. आर. एस. बोराडे, प्रा. अे. टी. शिंदे आदीसह प्रशिक्षणात परभणी जिल्हयातुन ७० शेतकरी उपस्थित होते.
|
प्रशिक्षणात मार्गदर्शन करतांना विद्यापीठ शास्त्रज्ञ डॉ स्मिता सोळुंकी |