Pages

Monday, July 4, 2016

वृक्ष लागवड व संवर्धन हा पर्यावरण संवर्धनाचा मंत्र...... कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्‍वरुलू

कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम
चालू शतकातील जागतीक तापमानवाढ व वातावरणातील बदल या सारख्या मनुष्यनिर्मित समस्येला तोंड देण्यासाठी सामुदायिकरित्या प्रयत्न करणे आवश्यक आहे. भविष्यकाळात पर्यावरण असमतोलाचे दुष्परिणाम उद्भवू नयेत यासाठी लोकसहभागातून वृक्षलागवड व संवर्धन अत्यंत महत्वाचे असल्याचे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्‍वरुलू यांनी केले. कृषी दिन व वसंतराव नाईक जयंती निमित्त कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात दिनांक 1 जुलै रोजी आयोजित वृक्षारोपनाचा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, प्राचार्य डॉ उद्य खोडके, प्राचार्य डॉ.दि.एन गोखले, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. दि. बी. देवसरकर आदीसह अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते. प्रसंगी संचालक शिक्षण डॉ. अशोक ढवण यांनी उपस्थित विद्यार्थी व कर्मचार्यांना वृक्ष प्रतिज्ञा दिली. उपस्थित मान्‍यवरांच्‍या हस्ते महाविद्यालय, वसतिगृह व उर्जा उदयान परिसरात कडूनिंब, गुलमोहर, रेन ट्री, वड इत्यादी रोपांची लागवड करण्यात आली. वृक्षलागवडीसाठी कृषी यंत्रशक्ती विभागाचे डॉ. गोपाल शिंदे यांनी विकसित केलेल्या इंजीन व ट्रॉली चलित ऑगर मशीन द्वारे १५० खड्डे पाडण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. संजय पवार यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. रवींद्र शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता प्रा.राहुल रामटेके, प्रा.विवेकानंद भोसले, प्रा.स्मिता खोडके, प्रा.भास्कर भुईभार, प्रा.स्मिता सोलंकी, प्रा.हरीश आवारी, प्रा.दयानंद टेकाळे, प्रा. पंडित मुंढे, प्रा. सुहास जाधव, प्रा. सुमंत जाधव, प्रा. सुभाष विखे, प्रा. संदीप पायाळ, प्रा. मधुकर मोरे, प्रा. प्रमोदिनी मोरे, शंकर शिवणकर, लक्ष्मण गिरी, जितेंद्र खिल्लारे, उत्तम कापसे, भारत रनेर, एकनाथ रनेर आदी कर्मचार्यांनी मोलाची मदत केली.