Pages

Tuesday, October 25, 2016

मौजे बाभुळगांव येथे रबी शेतकरी मेळावा संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमातंर्गत अखिल भारतीय समन्‍वयीत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्‍प येथे कार्यरत असलेल्‍या कृषिकन्‍यानी मौजे बाभुळगांव येथे दिनांक २४ ऑक्‍टोबर रोजी रबी शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्राचार्य डॉ धर्मराज गोखले हे होते तर संरपचा श्रीमती कुंदाताई पारधे, उपसरपंच असगर पठाण, प्रगतशील शेतकरी ज्ञानोबा पारधे, डॉ बी एम ठोंबरे, डॉ बी व्‍ही आसेवार, डॉ डि आर कदम, डॉ. पी एस कापसे, डॉ पी के वाघमारे, प्रा. मेधा सुर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी अध्‍यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ धर्मराज गोखले म्‍हणाले की, विविध पिकांत कीडींचे व्‍यवस्‍थापन करतांना योग्‍य वेळी, योग्‍य मात्रेत किडकनाशकांची फवारणी केल्‍यास कमी खर्चात कीड नियंत्रणात येते. रबी पिकांत विद्यापीठाने  विकसित केलेल्‍या सुधारित वाणाचा वापर करावा. यावेळी पशुसंगोपनावर डॉ बी एम ठोंबरे, कोरडवाहु शेती पध्‍दतीवर डॉ बी व्‍ही आसेवार, किड व्‍यवस्‍थापनावर डॉ डि आर कदम, रबी पिक लागवडीवर डॉ पी के वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात गिरीश पारधे व ज्ञानोबा गायकवाड यांनी मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ पी एस कापसे यांनी केले. सुत्रसंचालन उषा घनवट व शेख शबाना हिने केले तर आभार प्रियांका वालकर हिने केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी कृषिकन्‍या व गांवकरी मंडळीनी परिश्रम घेतले.