Pages

Tuesday, January 10, 2017

वनस्‍पती ऊती संवर्धन व मॉलेक्‍युलार तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन पिक सुधार प्रशिक्षण कार्यक्रमाची सांगता

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालयांतर्गत असलेल्‍या कृषि वनस्‍पतीशास्‍त्राच्‍या वतीने दिनांक २७ डिसेंबर २०१६ ते ९ जानेवारी २०१७ दरम्‍यान वनस्‍पती ऊती संवर्धन व मॉलेक्‍युलार तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन पिक सुधार या विषयावर चौदा दिवशीय प्रशिक्षण आयोजित करण्‍यात आले होते. प्रशिक्षण कार्यक्रमाची सांगता दिनांक ९ जानेवारी रोजी झाली. सांगता कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन भारतीय कृषि संशोधन परिषदेचे माजी सहाय्यक महासंचालक (बियाणे) डॉ. एन. डी. जांभळे हे उपस्थित होते तर व्‍यासपीठावर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, प्रशिक्षणाचे आयोजक तथा विभाग प्रमुख डॉ डि बी देवसरकर, प्राचार्य डॉ अशोक कडाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी डॉ. एन. डी. जांभळे आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, विविध पिकांच्‍या चांगल्‍या वाण निर्मितीसाठी पारंपारीक पैदास पध्‍दती सोबतच जैविक तंत्रज्ञानाचा संशोधकांनी वापर करावा. विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांनी सदरिल प्रशिक्षण यशस्‍वीरित्‍या राबविल्‍याबाबत आयोजकांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विभाग प्रमुख डॉ डि बी देवसरकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मीना वानखडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. एल. एन. जावळे यांनी केले. याप्रसंगी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वितरण करण्‍यात आले. प्रशिक्षणास राज्‍यातील विविध महाविद्यालय व संशोधन केंद्राातील २२ प्रशिक्षणार्थीनी सहभागी झाले होते. प्रशिक्षण कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी प्रा. एस. व्‍ही. कल्‍याणकर, डॉ. जी. डी. देशमुख, प्रा. के एम शर्मा, डॉ. ए. बी. बागडे, डॉ. डी. जी. दळवी, प्रा. एच एच भदरगे, के एल सांगळे आदींनी परिश्रम घेतले.