Pages

Wednesday, February 22, 2017

कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रात कृषि अधिका-यांचे प्रशिक्षण संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहीती केंद्र आणि महाराष्‍ट्र शासनाचा कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमाने कृषि विभागातील अधिका-यांचे प्रशिक्षण दिनांक 21 फेब्रुवारी रोजी संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विस्तार शिक्षण संचालक डॉ बी. बी. भोसले होते तर प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. बी. आर. शिंदे कृषि उपसंचालक डॉ. रक्षा शिंदे, कृषि विकास अधिकारी श्री. बी. एस. कच्छवे, आत्माचे  प्रकल्प संचालक श्री. एम. एल. चपले, विस्‍तार कृषि विद्यावेत्‍ता डॉ. यु. एन. आळसे, मधवर्ती रोपवाटीकाचे प्रभारी अधिकारी प्रा. आर. एस. बोराडे, श्री. आर. टी. सुखदेव आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रशिक्षणाकपाशीवरील शेंदरी बोंडअळीचे व्‍यवस्‍थापनावर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, खरिप पूर्व तयारी याबाबत डॉ. यु.एन. आळसे यांनी तर हुमणी अळीचे व्यवस्थापनावर प्रा. डि. डी. पटाईत यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. बी. आर शिंदे यांनी जिल्हयातील कृषि विषयक माहीती ग्राफिक्सद्वारे दिली तर श्री. बी. एस. कच्छवे आणि श्री. एम. एल. चपळे यांनीही मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपामध्ये डॉ. बी.बी. भोसले यांनी कृषि विद्यापीठ, कृषि विभाग, आत्मा आणि जिल्हा परिषदेच्या कृषि विभागातील अधिकारी आणि कर्मचा-यांनी शेतक-यांसाठी अधिकाधिक विस्‍तार कार्यक्रमांचे नियोजन करुन मार्गदर्शन करण्‍याचा सल्‍ला दिला.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ. यु.एन. आळसे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. एस. जी. पुरी यांनी केले तर आभार प्रा. डि. डी. पटाईत यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. यु. एन. आळसे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ . एस. जी. पुरी, प्रा. डि. डी. पटाईत, श्री. सुदर्शन बोराडे श्री. गणेश कटारे, श्री. बेद्रे, श्री. पांडुरंग डिकळे, श्री. शिंदे आणि दिपक वाघ यांनी परिश्रम घेतले.  प्रशिक्षणाचा कृषि विभाग आणि आत्मा कार्यालयातील तीस अधिका-यांनी सहभाग नोंदविला.