Pages

Thursday, February 9, 2017

मराठवाडयात ऊस लागवडीकरिता ठिबक सिंचन पध्‍दतीचाच वापर करावा....कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

वनामकृवित कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या वतीने आयोजित एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
मराठवाडयात कोरडवाहु क्षेत्र मोठया प्रमाणात असुन शेतक-यांनी ऊस लागवडीकरिता ठिबक सिंचनाच वापर करावा, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या वतीने दिनांक 9 फेब्रुवारी रोजी आयोजित एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाच्‍या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, ऊस संशोधन केंद्र, पाडेगांव येथील शास्त्रज्ञ डॉ. धर्मेंद्रकुमार फाळके, विस्‍तार कृषि विद्यावेत्‍ता डॉ. यु. एन. आळसे, डॉ. बी. व्ही. आसेवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, शेतक-यांनी शेतीमधील पालापाचोळा जाळु नये, यामुळे पर्यावरणाचा -हास होतो, त्‍याचा खत म्‍हणुन वापर करावा. विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांनी विद्यापीठातील तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती उत्पन्न वाढवावे, असे नमुद केले.
प्रशिक्षणात ऊस लागवड तंत्रज्ञानावर शास्त्रज्ञ डॉ. धर्मेंद्रकुमार फाळके, हरभरा लागवडीवर डॉ. यु. एन. आळसे, कोरडवाहू शेती लागवड तंत्रज्ञानावर डॉ. बी. व्ही. आसेवार यांनी, कापुस लागवडीवर डॉ. ए. जी. पंडागळे यांनी तर हुमणी किड व्यवस्थापनावर प्रा. डी. डी. पटाईत यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डी. डी. पटाईत यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. एस. जी. पुरी यांनी मानले. याप्रसंगी मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. पी. आर. देशमुख, विस्तार शिक्षण अधिकारी प्रा. पी. एस. चव्हाण हे उपस्थित होते. प्रशिक्षणात परिसरातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. यु. एन. आळसे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. एस. जी. पुरी, प्रा. डी. डी. पटाईत, के. डी. कौसडीकर, एस. बी. जाधव, सुदर्शन बोराडे, हनुमान बनसोडे, गणेश कटारे, एकनाथ डिकळे, मुरलीधर शिंदे, दिपक वाघ आदींनी परिश्रम घेतले.