Pages

Friday, March 10, 2017

वनामकृविच्‍या मुलींच्‍या वसतीगृहात विदयार्थीनीनी साजरा केला जागतिक महिला दिन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मुलींच्‍या वसतीगृहातील पदवी व पदव्‍युत्‍तर विदयार्थीनीनी दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला. कार्यक्रमाच्‍या प्रमुख पाहुणे म्‍हणून गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या प्राचार्या प्रा. विशाला पटणम उपस्थित होत्‍या तर वसतीगृह अधिक्षिका प्रा. निता गायकवाड, डॉ. विजया पवार, डॉ. जयश्री एकाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. अध्‍यक्षीय भाषणात प्राचार्या प्रा. विशाला पटणम म्‍हणाल्‍या की, विदयार्थीनीनी महाविद्यालयीन जीवनात स्‍वत:चा व्‍यक्‍तीमत्‍व घडवितांना इंग्रजी भाषाचा न्‍युनगंड न बाळगता रोजच्‍या संवाद इंग्रजीत करावा, वेळेचे महत्‍व ओळखुन वेळाचा उपयोग विधायक कार्यासाठी करावा, मोबाईलचा उपयोग शिक्षणासाठी करावा, आरोग्‍यदायी आहाराची घेण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला. कार्यक्रमात राजमाता जिजाऊ, राजमाता आहिल्‍याबाई होळकर व क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले या थोर महिलांच्‍या प्रतिमेस अभिवादन करण्‍यात आले. हम होंगे कामयाब हया सामूहिक गीताच्‍या गायन करण्‍यात आले. यावेळी विदयार्थी प्रतिनिधींनी महिला सक्षमीकरण्‍यासाठी विविध पैलूवर आपली मते मांडली. विविध वसतीगृहाच्‍या जनरल सेक्‍टेरीची भुमिका यशस्‍वीरितीने पार पाडलेल्‍या विद्यार्थीनीनी दिपाली संगेकर, प्रतिमा ठोंबरे, मोहीनी गोरे, अपूर्वा पोलासवार, अश्विनी कोळी, शितल पांचाल, रुपाली जाधव आदींचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. बहुमताने जनरल सेक्‍टरी म्‍हणून निवडलेल्‍या सुप्रिया सिंघम, लदैपी, अल्‍का पवळे, सुनिता हुंबाड, सोनाली उन्‍हाळे, प्रिया वाघमारे, अंकिता सुतार, शितल शेटे आदींचे स्‍वागत करण्‍यात आले. सुत्रसंचालन अश्विनी कोळी, अंजुम शेख व पल्‍लवी कांबळे यांनी केले. कार्यक्रमात वर्षा वसतीगृह, उत्‍तरा वसतीगृह, दिवाकर रावते वसतीगृह व राजमाता जिजाऊ वसतीगृहातील पदवी व पदव्‍युत्‍तर विदयार्थीनीनीचा सहभाग नोंदविला. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी हॉस्‍टेल सुपरवायझरर्स अशोक पतंगे, रेखा लाड, ज्ञानेश्‍वर जाधव, सुनिल शिंदे आदींनी सहकार्य केले.