‘सिंचन संगणक प्रारूपे’ या विषयावरील एकदिवसीय
प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
राज्यातील कृषी विद्यापीठांतील सिंचन व निचरा
अभियांत्रिकी विभागाने विविध संगणकीय प्रारूपे विकसित केली आहेत. शेतीत पिकास पाणी किती द्यावे, कधी द्यावे व कसे द्यावे या विषयीचे काटेकोर पाणी व्यवस्थापनात तांत्रिक ज्ञान
गरजेचे असून त्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे, असे प्रतिपादन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलू
यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व
तंत्रज्ञान महाविद्यालयात दि. २३ मे रोजी ‘सिंचन संगणक प्रारूपे’ या विषयावरील
एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर शिक्षण
संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, राहुरी येथील महात्मा
फुले कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. सुनील गोरंटीवार, डॉ. अकोला येथील पंजाबराव
देशमुख कृषी विद्यापीठाचे डॉ. सुधीर वडतकर, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. अशोक
कडाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण व संशोधन
संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनीही प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले. तांत्रिक
सत्रात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील डॉ. सुनील गोरंटीवार आणि
त्यांच्या सहकार्यांनी फुले जल, फुले इरिगेशन शे डूलर, फुले शेततळे ताळेबंद संगणक
प्रणाली, जलसिंचन व्यवस्थापन निर्णय प्रणाली या सिंचन संगणक प्रारूपांची माहिती दिली.
कार्यशाळेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी
विद्यापीठ अकोला, वसंतराव नाईक मराठवाडा महात्मा फुले कृषी विद्यापीठ, परभणी येथील
शास्त्रज्ञ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ अशोक कडाळे यांनी केले.
सूत्रसंचालन प्रा. मधुकर मोरे व प्रा. सुमंत जाधव यांनी केले तर प्रा. हरीश आवारी
व डॉ. विशाल इंगळे यांनी आभार मानले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी प्रा. हरीश आवारी, प्रा.
सुमंत जाधव, डॉ. विशाल इंगळे, प्रा. संजय पवार आदींसह महाविद्यालयातील प्राध्यापक,
अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.