Pages

Friday, June 30, 2017

वनामकृवितील परभणी कृषि महाविद्यालयात शेतकरी आत्महत्याच्या बाबींची मिमांसा प्रकल्पातंर्गत एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

वसंतराव नार्इक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालय आणि राष्‍ट्रीय कृषि विज्ञान निधी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने राबविण्‍यात येत असलेला 'शेतकरी कुटुबांच्‍या सामर्थ्‍य निर्मितीतुन शेतकरी आत्‍महत्‍याच्‍या बाबींची मिमांसा' या प्रकल्‍पांतर्गत स्‍वयंसेवकांसाठी दिनांक 29 जुन रोजी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी विस्‍तार शिक्षणाचे विभाग प्रमुख  डॉ. आर. डी. अहिरे, डॉ. जे. व्‍ही. एकाळे, डॉ. पी. एस. कापसे, डॉ एम व्‍ही कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेत पतियाला येथील पंजाब विद्यापीठाचे वरिष्‍ठ संशोधन छात्र डॉ. अमनदिप सिंग यांनी तणावग्रस्‍त शेतक-यांचे मानसशास्‍त्र याविषयावर स्‍वयंसेवकांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेत डॉ. आर. डी. आहिरे यांनी शेतकरी आत्‍महत्‍या आणि कारणेया विषयावर विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन केले. सदरिल प्रकल्‍प प्राचार्य डॉ. डी .एन. गोखले यांच्‍या मार्गदर्शनाखाली राबविण्‍यात येत आहे. या प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन ग्रामीण भागातील महाविद्यालयीन युवकांच्‍या सामर्थ्‍य निर्मितीवर भर देण्‍यात येणार असुन तणावग्रस्‍त शेतक-यांचा संशोधनात्‍मक अभ्‍यास करण्‍यात येणार आहे. यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांतुन स्‍वयंसेवकाची निवड करून त्‍यांना प्रशिक्षीत करण्‍यात येणार आहे. या कार्यशाळेत कृषि पदवीच्‍या चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्‍यीनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदविला होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. पी. एस. कापसे यांनी तर आभार डॉ जी बी अडसुळ यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी श्री चंद्रशेखर नखाते, श्री खताळ, श्री वैजनाथ दुधारे आदींनी परीश्रम घेतले.