वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठातील सामाजिक विज्ञान महाविद्यालयाच्या एलपीपी स्कृलद्वारे बालविकासात
पालकांची भूमिका याविषयी विशेष पालक कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी पालकांना मानव विकास विभागातर्फे
निर्मिती करण्यात आलेले दर्जेदार पुस्तक “बालविकासची उत्कृष्ट तंत्रे” उपलब्ध करुन देण्यात येऊन त्याचा त्यांना सखोल अभ्यास करण्यास प्रेरीत
करण्यात आले. या पुस्तकातील प्रकरणांमधून त्यांनी कोणत्या बाबी अवगत केल्या याविषयी त्यांचे विचार मांडण्याची व त्यांच्या
बालकांचे संगोपन करतांना, या पुस्तकातील विविध बाबींचा त्यांना काय उपयोग होणार आहे. याविषयी सादरीकरण करण्याची या
कार्यशाळेत संधी देण्यात
आली. याप्रसंगी उत्कृष्ट सादरीकरण केलेल्या विजेत्या पालकांना “ बालसंगोपनाविषयी उत्कृष्ट जाणकार” हे पारितोषिक जाहीर करण्यात आले. या अभिनव कार्यशाळेचे आयोजन बाल विकासा शास्त्रज्ञ व प्राचार्या प्रा. विशाला पटनम यांच्या संकल्पनेतून
करण्यात आले. कार्यशाळेत एलपीपी स्कूलचे माजी पालक डॉ. गजेंद्र आणि श्रीमती वर्षा लोंढे, ज्यांनी की, शाळेतर्फे घेण्यात आलेल्या पालक कार्याशाळेचा व विविध उपक्रमांचा पुरेपुर लाभ घेऊन तथा-सतत प्रयत्नशील राहून त्यांचा पाल्यचि अभिनव
लोंढे याचा उत्कृष्ट सर्वांगीण विकास साधलयामुळे, त्यांचेही उपास्थिंना मार्गदर्शन लाभावे म्हणून त्यांना आमंत्रित केले होते. या शाळेतर्फे घेण्यात येणा-या कार्याशाळांचा तसेच विविध उपक्रमांचा लाभ सर्व पालकांनी घेऊन आपल्या पाल्याचा विकास
साधावा असे आवाहान त्यांनी उपस्थित पालकांना केले. या प्रसंगी डॉ. गजेंद्र लोंढे
यांनी नुकताच विद्यापीठातील कुलसचिव पदाचा कार्यभार स्वीकारल्याबद्दल महविद्यालयाच्या वतीने
प्राचार्यांनी सत्कार केला. सुत्रसंचालन डॉ. जया बंगाळे यांनी केले. कार्यशाळेच्या पूर्व तयारीसाठी एलपीपी शिक्षिका संजीवनी रेंगे व मीना
जाधव यांचे सहकार्य लाभले. यावेळी पालक, शिक्षक तथा विभागातील पदवीपूर्व
विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.